गावाकडची पाणी टंचाई अनेक नैसर्गिक आणि मानवी घटकांमुळे वाढत चालली आहे – कमी पाऊस, दुष्काळ, खालावत जाणारी भूजलाची पातळी आणि सोबतच यासंबंधीची धोरणं, अपुरं सिंचन, मोठी धरणं, कूपनलिका, पाण्याचं असमान वाटप आणि मोठ्या प्रमाणावर वंचन. पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे पिकं वाळत चालली आहेत, कर्जबाजारीपणा वाढू लागलाय, कित्येकांना स्थलांतर करावं लागतंय आणि आजारपणांमध्ये भर पडतीये. काही काळातच संपूर्ण देशासमोरचं एक मोठं संकट होऊ घातलेल्या या अभूतपूर्व अशा पाणी संकटाबद्दल पारीवर सादर झालेल्या या काही कहाण्या