जिथे बाहेरच्यांना फार प्रवेश नाही अशा उत्तराखंडच्या सातपेरच्या कुरणांपर्यंत पोचण्यासाठी खेचरांच्या वाटेने जात, अगदी चढणीची आणि धोक्याचा २५ किलोमीटरचा टप्पा पार करत आमच्या वार्ताहर लेखिकेने इथल्या गावकऱ्यांची एक कहाणी आपल्यासाठी आणली आहे, ते कीडा जडी नावाची एक बुरशी गोळा करतात आणि सीमेपलिकडे चालणाऱ्या अवैध पण नफ्याच्या धंद्यातून पैसे कमवतात