पारीवर प्रकाशित होणारी प्रत्येक गोष्ट १४ भाषांमध्ये अवतरते. या सगळ्या प्रक्रियेतली गंमत आणि झगडा मात्र फार कधी कुणाला कळत नाही. ३० सप्टेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अनुवाद दिनाच्या निमित्ताने भारतीय भाषांचे संपादक-अनुवादक त्यांचे अनुभव एका संभाषणातून मांडतायत
मातृभाषेत वार्तांकन आणि पारीवर प्रकाशित होणाऱ्या लेखांचे अनेक भाषांमध्ये अनुवाद असं दुपेडी काम करणारा आमचा अनोखा प्रकल्प म्हणजे पारीभाषा. पारीवरच्या प्रत्येक लेखासाठी अनुवाद ही कळीची प्रक्रिया आहे. आमच्यासोबत काम करणारे संपादक, अनुवादक आणि सेवाभावी मित्रपरिवार विभिन्न सामाजिक, सांस्कृतिक आणि भाषिक पार्श्वभूमीतून येतात आणि आपल्या अनुवादांद्वारे पारीवर प्रकाशित होणाऱ्या कहाण्या ज्यांच्या आहेत त्यांच्यापर्यत त्यांच्याच भाषेत पोचवण्याचं काम करतात.
See more stories
Illustrations
Labani Jangi
मूळची पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातल्या छोट्या खेड्यातली लाबोनी जांगी कोलकात्याच्या सेंटर फॉर स्टडीज इन सोशल सायन्सेसमध्ये बंगाली श्रमिकांचे स्थलांतर या विषयात पीएचडीचे शिक्षण घेत आहे. ती स्वयंभू चित्रकार असून तिला प्रवासाची आवड आहे.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.