केरळमध्ये नुकत्याच येऊन गेलेल्या महापुरानंतर अळप्पुळा जिल्ह्यातल्या एका मदत शिबिरात मुलांना चित्र काढायला आणि लिहायला पेन आणि रंगीत खडू दिले होते. त्यांच्या मनातली भीती आणि प्रार्थना, त्यांनी काय गमावलं आणि त्यांची सुटका हे सगळं त्यांच्या चित्रांमधून आणि शब्दांतून व्यक्त होतं