विशेष तपास पथक अहवालः अळीचा हल्ला अभूतपूर्व आणि भयंकर
२०१७ सालच्या विषबाधेच्या या घटना दोन गोष्टींकडे बोट दाखवतात - यवतमाळमध्ये कीटकनाशकांचा बेसुमार वापर होतोय आणि विदर्भातले शेतकरी हातघाईवर आले आहेत. तीन लेखांच्या मालिकेतल्या या तिसऱ्या लेखात विशेष तपास पथकाला काय निदर्शनास आलं याचा पारीने घेतलेला हा मागोवा.