थोडी नोटाबंदी आणि चिमूटभर कीटकनाशक मिसळलेलं एक कालवण
भारतातलं ८६ टक्के चलन सरकारने बेकायदेशीर ठरवलं तेव्हा तेलंगणच्या धर्मारम गावच्या वरदा बालय्यांचं कर्ज फेडण्यासाठी जमीन विकून पैसा उभा करण्याचं स्वप्न मातीमोल झालं. त्यांनी आत्महत्या केली आणि आपल्या कुटुंबालाही विष पाजलं.