सुमारे २०० वर्षांहून पुरातन वास्तूच्या पायऱ्या आम्ही उतरू लागलो आणि श्री भदरिया माता जी मंदिराच्या प्रवेशद्वारावरच्या गाणाऱ्यांचा आवाज हळूहळू क्षीण होत गेला. एका क्षणी  आवाज पूर्णपणे थांबला. आता आम्ही जमिनीच्या सुमारे २० फूट खाली पोहोचलो आहोत.

१५,००० चौ.फूट जागेत विस्तारलेलं वाचनालयाचं दालन आमच्या समोर खुलं झालं.  पुस्तकांच्या ५६२ फडताळांची रचना अशी की मधून जाणारा केवळ एक अरुंद मार्ग. ठराविक अंतरावर ठेवलेल्या या फडताळांमध्ये २ लाखांहून अधिक पुस्तकं विसावलेली आहेत. यात  चामड्याचं वेष्टन असलेले ग्रंथ, झाडांच्या सालींवर लिहिली गेलेली हस्तलिखितं, जुन्या ग्रंथांच्या  आवृत्त्या आणि हिंदू धर्म, इस्लाम, ख्रिस्ती धर्म अशा विषयांवरील लिखाण यात समाविष्ट आहे. या  ग्रंथांव्यतिरिक्त  कायदा आणि औषध विज्ञान, तत्त्वज्ञान, भूगोल, इतिहास आणि न जाणो कितीतरी विषयांवर लिहिलेली पुस्तके इथे पाहता येऊ शकतात.  साहित्यातल्या अजरामर कलाकृतींसोबत अलिकडच्या काही वर्षांत लिहिलेल्या कादंबऱ्यांनी साहित्य विभाग संपन्न झाला आहे.  वाचनालयातील बहुतांश पुस्तकं हिंदी भाषेतली आहेत. यात काही   इंग्रजी आणि संस्कृत भाषेतील ग्रंथही आहेत.

हे वाचनालय उभारण्याची कल्पना  पंजाबचे धार्मिक चिंतनकर्ते हरिवंश सिंग निर्मल यांची होती. मंदिर परिसरात असणाऱ्या एका गुहेत २५ वर्षे ते एकट्याने राहिल्याचं सांगितलं जातं. आणि तिथे त्यांनी हे वाचनालय उभारण्याचं ठरवलं. निर्मल यांचा २०१० साली मृत्यू झाला परंतु त्याच्या बऱ्याच आधीपासून शिक्षण आणि पशुकल्याण विषयक कामांसाठी निधी जमवण्याचं काम त्यांनी सुरु केलं होतं.

“ते पक्के मानवतावादी होते. सगळ्या  धर्माांचा  संदेश एकच आहे: माणसाची त्वचा आणि केसांचा रंग वेगवेगळा असू शकतो. मात्र, आतून आपण सगळे एकसारखेच असतो,” जुगल किशोर सांगतात. मंदिर आणि वाचनालयाचं काम पाहणाऱ्या श्री जगदंबा सेवा समिती या न्यासाचे ते सचिव आहेत.  हाच न्यास गोशाळेची व्यवस्थाही पाहतो. इथे ४०,००० हून अधिक गायी-गुरं आहेत.

The underground library at  Shri Bhadriya Mata Ji temple near Dholiya in Jaisalmer district of Rajasthan
PHOTO • Urja

श्री भदरिया माता जी मंदीराच्या तळघरात असणारं हे ग्रंथालय राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील ढोलिया गावाजवळ आहे

Left:  The late Shri Harvansh Singh Nirmal, was a religious scholar who founded the library.
PHOTO • Urja
Right: Jugal Kishore, Secretary of the Shri Jagdamba Seva Samiti, a trust that runs the temple, library and cow shelter
PHOTO • Urja

डावीकडे स्वर्गवासी हरिवंश सिंग निर्मल हे धार्मिक चिंतनकर्ते होते . यांनी या ग्रंथालयाची स्थापना केली . उजवीकडे : श्री जगदंबा सेवा समितीचे सचिव जुगल किशीर, हा न्यास मंदिरासोबत ग्रंथालय आणि एका गोशाळेचं कामही पाहतो

वाचनालयाच्या निर्मितीचे काम १९८३ मध्ये सुरु झालं.  याची रचना १९९८ मध्ये तयार झाली. यानंतर ग्रंथालयातली पुस्तकं गोळा करण्याचं काम सुरु झालं. “त्यांना (निर्मल) हे वाचनालय ज्ञानाचं केंद्र आणि विश्वविद्यालयाच्या रुपात विकसित करायचं होतं,” किशोर सांगतात. “महाराजजींना वाटत होतं की लोकांनी दूरदूरून या ठिकाणी  यावं. ज्ञानाच्या शोधात भटकणाऱ्यांना इथे त्यांना हवे ते मिळावं.”

वाचनालयाच्या स्थापनेसाठी तळघरातील या जागेची निवड करण्यात आली त्याचं मुख्य कारण धूळ आणि इतर नुकसान कमी व्हावं हेच असल्याचं वाचनालयाचे प्रशासक सांगतात. भारतीय सैन्याचं गोळीबाराचं सराव मैदान  पोखरण, इथून केवळ १० किमी अंतरावर आहे. जेंव्हा राजस्थानाच्या माळरानांवर सोसाट्याचा वारा सुटतो तेंव्हा सर्वत्र धूळ पसरते.

अशोक कुमार देवपाल ग्रंथालयाच्या  देखभालीचं काम करतात. ते सांगतात, या वाचनालयात सहा मोठाले एक्झॉस्ट पंखे आहेत. त्याद्वारे आतलं हवामान कोरडं ठेवलं जातं. त्यासाठी नियमितपणे कापूरही जाळला जातो. बुरशीपासून वाचण्यासाठी, “आम्ही पुस्तकांना वेळोवेळी मोकळी हवा मिळावी अशी तजवीज करतो. आमच्यातील सात- आठ जण दोन महिन्यांपेक्षाही अधिक काळ हेच काम करत असतात.”

Left: Collections of books.
PHOTO • Priti David
Right: Ashok Kumar Devpal works in the library maintenance team
PHOTO • Urja

डावीकडे : ग्रंथसंग्रह . उजवीकडे : ग्रंथालयाच्या देखभालीसाठी काम करणारे अशोक कुमार देवपाल

मंदिराच्या न्यासाकडे सव्वा लाख बिघा ( म्हणजेच साधारण २०,००० एकर ) जमिनीची मालकी आहे. भदरिया ओरण (पवित्र वनराई) परंपरेनुसार इथे “झाडाची फांदीही कापली जात नाही.” गोशाळेतील ४०,००० हून अधिक गायी-गुरांच्या देखभालीसाठी काम करणारे सत्तरीतील किशोर सांगतात. इथे दरवर्षी साधारण २-३ लाख लोक येतात. शिवाय, वर्षातून चार वेळा होणाऱ्या  उत्सवादरम्यान  राजपूत, बिश्णोई आणि जैन समुदायातूनही बरेच लोक इथे जमतात. वाचनालयाचं उदघाटन झालेलं नसलं तरी पर्यटकांना खाली उतरून सहज फिरण्याची परवानगी असते.

वाचनालयाशिवाय इथे एक विशाल गोशाळा आहे. गीर, थारपारकर, राठी आणि नागौरी अशा प्रजातींच्या हजारो गायी आणि बैलांची देखभाल या गोशाळेत केली जाते. त्यासाठी १५० कर्मचाऱ्यांचा एक वेगळा गट आहे. ”ओरण हे पशु- पक्ष्यासांठीच आहे,” न्यासाचे प्रशासक अशोक सोदाणी सांगतात. इथे येणारी गुरं भाकड झालेली असतात.  ९० टक्के बैल आहेत. आमच्या गोशाळेत १४ विंधन विहिरी  आहेत. न्यास दर वर्षी प्राण्यांच्या चाऱ्यावर  साधारण २५ कोटी रुपये खर्च करतो. सोदाणी सांगतात, “हरियाणा, पंजाब आणि मध्यप्रदेश सारख्या दूरच्या राज्यातून चाऱ्याने भरलेले ३- ४ ट्रक दररोज इथे येतात,” ते सांगतात. यासाठी लागणारा पैसा देणगीतून उभा राहतो.

जमिनीच्या खालून आम्ही वर स्वच्छ सूर्यप्रकाशात आलो तेव्हा ढोली समुदायाचे प्रेम चौहान आणि लक्ष्मण चौहान पेटी वाजवत होते. भदरिया  देवीच्या भजनांचा आवाज निनादत होता.  श्री भदरिया माता केवळ या मंदिराची अधिष्ठातीच नाही तर या आजूबाजूच्या संपूर्ण क्षेत्रावर आणि सभोवतालही  तिचीच  हुकूमत असल्याचे त्यांच्या गाण्यात वर्णिलेलं होतं.

The temple attracts many devotees through the year, and some of them also visit the library
PHOTO • Urja

मंदिरात दरवर्षी असंख्य भाविक येतात . त्यातले काही लोक ग्रंथालय पाहण्यासाठीही जातात


At the entrance to the Shri Bhadriya Mata Ji temple in Jaisalmer district of Rajasthan
PHOTO • Urja

राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यात असणाऱ्या श्री भदरिया माता जी मंदिराचे प्रवेशद्वार


Visitors to the temple also drop into the library, now a tourist attraction as well
PHOTO • Priti David

मंदिरात येणाऱ्या भाविकांपैकी अनेक लोक ग्रंथालय पाहण्यासाठीही येतात. त्यामुळं  आता हे एक पर्यटन स्थळच  बनलं आहे


The library is spread across 15,000 square feet; its narrow corridors are lined with 562 cupboards that hold over two lakh books
PHOTO • Urja

१५००० वर्गफूट क्षेत्रात हे ग्रंथालय विस्तारलं आहे.  चिंचोळ्या जागेत ५६२ फडताळांमध्ये दोन लाखांहून अधिक ग्रंथांचा संग्रह आहे


Old editions are kept under lock and key
PHOTO • Urja

ग्रंथांच्या जुन्या आवृत्त्याही काळजीपूर्वक, कुलुपबंद कपाटांमध्ये ठेवल्या आहेत


A few 1,000-year-old manuscripts are kept in boxes that only library staff can access
PHOTO • Urja

काही पुरातन, १,००० वर्षे जुनी हस्तलिखितं बंद खोक्यात ठेवण्यात आली आहेत . ग्रंथालयाचे कर्मचारीच ती हाताळू शकतात

Religious texts on Hinduism, Islam, Christianity and other religions
PHOTO • Urja

अशा ग्रंथांमध्ये हिंदू धर्म , इस्लाम , ख्रिश्चन आणि इतर धर्माचं साहित्य आणि ग्रंथही आहेत


Copies of the Quran and other books written Hindi, Urdu and English
PHOTO • Priti David

हिंदी , उर्दू आणि इंग्रजी भाषेत कुराण आणि इतर ग्रंथांच्या प्रती उपलब्ध आहेत

A collection of Premchand’s books
PHOTO • Urja

प्रेमचंद यांची पुस्तके

Books on the history of America and the history of England
PHOTO • Urja

अमेरिकी आणि ब्रिटिश इतिहासावरचे ग्रंथ


Books on media and journalism
PHOTO • Urja

माध्यमे आणि पत्रकारितेच्या संबंधित पुस्तकांचा संग्रह


The Samadhi shrine of the founder of the library, Harvansh Singh Nirmal
PHOTO • Urja

ग्रंथालयाचे संस्थापक हरिवंश सिंग निर्मल यांचे समाधी स्थळ


A letter signed by library founder, Harvansh Singh Nirmal is displayed prominently
PHOTO • Urja

ग्रंथालयाचे संस्थापक हरिवंश सिंग निर्मल यांच्या हस्ताक्षरातील एक पत्र सर्वांना दिसेल अशा रितीने ठेवण्यात आले आहे


The gaushala (cow shelter) houses  roughly 44,000 cows and bulls of different breeds – Gir, Tharparkar, Rathi and Nagori
PHOTO • Priti David

गोशाळेत गीर , थारपारकर , राठी आणि नागौरी अशा विविध प्रजातींची जवळपास ४४ , ००० गायी गुरं आहेत


There is small bustling market outside the temple selling items for pujas, toys and snacks
PHOTO • Urja

मंदिराच्या बाहेर एक गजबजलेला पण छोटास बाजार आहे . इथे पूजा - पाठ करण्यासाठीच्या वस्तू , खेळणी आणि खाण्या - पिण्याच्या गोष्टी विकल्या जातात


உர்ஜா, பாரியின் மூத்த உதவி காணொளி தொகுப்பாளர். ஆவணப்பட இயக்குநரான அவர் கைவினையையும் வாழ்க்கைகளையும் சூழலையும் ஆவணப்படுத்துவதில் ஆர்வம் கொண்டிருக்கிறார். பாரியின் சமூக ஊடகக் குழுவிலும் இயங்குகிறார்.

Other stories by Urja
Priti David

ப்ரிதி டேவிட் பாரியின் நிர்வாக ஆசிரியர் ஆவார். பத்திரிகையாளரும் ஆசிரியருமான அவர் பாரியின் கல்விப் பகுதிக்கும் தலைமை வகிக்கிறார். கிராமப்புற பிரச்சினைகளை வகுப்பறைக்குள்ளும் பாடத்திட்டத்துக்குள்ளும் கொண்டு வர பள்ளிகள் மற்றும் கல்லூரிகளுடன் இயங்குகிறார். நம் காலத்தைய பிரச்சினைகளை ஆவணப்படுத்த இளையோருடனும் இயங்குகிறார்.

Other stories by Priti David
Editor : Riya Behl

ரியா பெல், பாலினம் மற்றும் கல்வி சார்ந்து எழுதும் ஒரு பல்லூடக பத்திரிகையாளர். பாரியின் முன்னாள் மூத்த உதவி ஆசிரியராக இருந்த அவர், வகுப்பறைகளுக்குள் பாரியை கொண்டு செல்ல, மாணவர்கள் மற்றும் கல்வியாளர்களுடன் இணைந்து பணியாற்றுகிறார்.

Other stories by Riya Behl
Photo Editor : Binaifer Bharucha

பினாஃபர் பருச்சா மும்பையை தளமாகக் கொண்ட பகுதி நேரப் புகைப்படக் கலைஞர். PARI-ன் புகைப்பட ஆசிரியராகவும் உள்ளார்.

Other stories by Binaifer Bharucha