आम्ही पाहत होतो, पण आम्हाला खरंच वाटत नव्हतं. आम्ही गाडी त्यांच्याजवळ वळवली, आणि खाली उतरून त्याच्याकडे पाहतच राहिलो. तरी आमचा विश्वास बसेना. रतन बिस्वासकडे पाच बांबू होते, एक-एक बांबू ४०-४५ फूट लांबीचा, आणि ते एकत्र बांधून सायकलीचा तोल सांभाळत ते चालले होते. ही कसरत करत, त्यांच्या घरापासून १७ किलोमीटर दूर असलेल्या त्रिपुराच्या राजधानीत, अगरतलाच्या बाजारात, ते निघाले होते. बांबूची टोकं चुकून जरी रस्त्यावरच्या एखाद्या दगडाला, उंचवट्याला किंवा खड्ड्यात अडकली तर सायकल, सगळे बांबू आणि रतन असे एकत्र खाली कोसळले असते. आणि जबर लागलं असतं. बांबूचं वैशिष्ठ्य असं की ते जितके वजनदार असतात त्यापेक्षा दिसायला बरेच हलके वाटतात. निरखून बघण्याआधी घट्ट बांधलेले पाच बांबू चारच असल्यासारखे वाटत होते. त्यांचं एकत्रित वजन साधारण २०० किलो तरी असावं. बिस्वास यांना अर्थात हे माहित होतं. आमच्याशी ते आनंदाने बोलले. इतकंच नाही त्यांनी स्वतःच्या या पराक्रमाचा फोटोसुद्धा काढू दिला. पण आम्हाला त्यांनी त्यांची सायकल मात्र ढकलू दिली नाही. त्यांना त्यातले कष्टे चांगलेच माहित होते.

आम्ही त्यांना विचारलं, “केवळ पाच फुट लांबीच्या सायकलीवर तुम्ही बांबूचं हे एवढं वजन तोलता तरी कसं?” त्यावर ते हसले आणि त्यांनी आम्हाला सायकलला लावलेल्या काही बांबूच्या फळ्या दाखवल्या. समोरच्या बाजूला दोन उभ्या फळ्या होत्या ज्या सायकलच्या तिरक्या बारला बांधल्या होत्या, आणि त्या सायकलच्या आडव्या बारच्या दोन्ही बाजूने आणून एकत्र बांधल्या होत्या. तसंच दोन फळ्या आडव्या ठेऊन कॅरियरला बांधल्या होत्या.

Ratan Biswas carries five bamboos, each 40-45 feet in length, balanced on and tied to his bicycle.
PHOTO • P. Sainath
Less than a fourth of the total length sticks out at the front of the cycle. The huge, main body protrudes from the back of the cycle. We still couldn’t figure out how and why the rear end did not touch the ground. Biswas smiled patiently at our wonder
PHOTO • P. Sainath

डावीकडे: रतन बिस्वास ४०-४५ फुटी लांबीचे पाच बांबू सायकलवर तोलत बाजारात निघाले आहेत. उजवीकडे: पुढील बाजूला बांबूंचा पावपेक्षा कमी भाग आहे, तर उरलेला सर्व लांब भाग सायकलच्या मागच्या बाजूवरुन बाहेर आलाय. आम्हाला अजूनही कळालं नाहीये की मागची लटकणारी बाजू रस्त्याला टेकत कशी नाही. बिस्वास मात्र शांतपणे हसत आमचे कोड्यात पडलेले चेहरे पाहत असतात

थोडक्यात काय तर, समोरच्या फळ्यांवर दोन बाजूने दोन-दोन बांबूंची समोरची टोकं बांधली होती आणि मागच्या फळ्यांवर सगळे बांबू बांधून ठेवले होते. तीन बांबूंची समोरची बाजू हँन्डल आणि सीटला बांधली होती. बांबू तर अगदी घट्ट बसले होते, पण यामुळे सायकल वळवणं मात्र अगदीच अवघड झालं होतं. हे सगळं अगदी कंबरेचा काटा मोडणारं काम होतं. बिस्वास यांच्याकडे मात्र पर्याय नव्हता. आपल्या संसारासाठी अशी अनेक मेहनतीची कामं करावी लागत होती. “माझं कुटुंब म्हणजे माझी दोन मुलं, माझी पत्नी आणि मी,” ते सांगतात. “आमचं गाव जीरीनिया तालुक्यात आहे (पश्चिम त्रिपुरा जिल्हा). काम असेल तेव्हा मी रोजंदारीवर बांधकामावर कामाला जातो. नाहीतर, हंगामाप्रमाणे शेत मजुरी किंवा हमाली करतो.”

“नाही, मी स्वतः बांबू तोडत नाही. ते खूपच अवघड असतं. आमच्या गावात जे बांबू विकायला आणतात त्यांच्याकडून मी विकत घेतो,” ते सांगतात. सर्व बांबू अगरतला बाजारात विकले गेले तर त्यांना यातून एकूण २०० रु. इतका फायदा होऊ शकतो. माझ्यासोबत त्रिपुरा सेन्ट्रल युनिव्हर्सिटीत पत्रकारिता आणि जनसंवाद विभागात प्राध्यापक असलेले सुनील कलाई होते. ते सांगतात की बिस्वास काही छोट्या रस्त्यांचा वापर करू शकतात. पण कदाचित अशा बारीक रस्त्यांवर बिस्वास यांच्या सायकलीला पुरेशी जागाच मिळत नसावी. आम्ही आमच्या गाडीत बसलो आणि पुढच्या जिल्ह्यातल्या अंबासाकडे निघालो. बिस्वास विरुद्ध दिशेने आपली ४० फुटी शेपूट घेऊन चालू लागले.

Biswas pushes off in the opposite direction, his bicycle's 40-feet tail wagging gently behind him
PHOTO • P. Sainath

बिस्वास आपल्या मार्गावर विरुद्ध दिशेने जात आहेत, आणि त्यांच्या सायकलची ४० फुटी शेपूट त्यांच्या मागून संथपणे डुलते आहे

अनुवाद: अनुजा दाते

பி. சாய்நாத், பாரியின் நிறுவனர் ஆவார். பல்லாண்டுகளாக கிராமப்புற செய்தியாளராக இருக்கும் அவர், ’Everybody Loves a Good Drought' மற்றும் 'The Last Heroes: Foot Soldiers of Indian Freedom' ஆகிய புத்தகங்களை எழுதியிருக்கிறார்.

Other stories by P. Sainath
Translator : Anuja Date

அனுஜா தத்தே பெங்களூருவை சேர்ந்த ஆய்வு மாணவர். காட்டில் வசிப்பவர்களின் உரிமை சார்ந்த பிரச்சினைகளில் இயங்குபவர்.

Other stories by Anuja Date