संपादकाची टीपः
सुप्रसिद्ध इटालियन विद्रोही लोकगीत बेला चाओ (अवलिदा, सुंदरी) याचं हे एक उत्तम पंजाबी रुपांतर आहे. मूळ इटालियन गाणं १८ वं शतक सरत असताना इटलीच्या उत्तरेकडच्या पो खोऱ्यामधल्या शेतकरी बायांनी तयार केलेलं आहे. त्यानंतर कित्येक वर्षांनी इटलीच्या फाशीवाद विरोधी विद्रोह चळवळीच्या सदस्यांनी त्याचे शब्द बदलले आणि मुसोलिनीच्या हुकुमशाहीविरोधातील संघर्षासाठी हे गाणं वापरलं गेलं. त्यानंतर जगभर या गाण्याची विविध रुपं फाशीवादाविरोधात स्वातंत्र्य आणि विद्रोहाचं प्रतीक म्हणून गायलं गेलं आहे.
हे पंजाबी गाणं पूजन साहिल याने लिहिलं आहे आणि अतिशय सुंदर गायलं आहे. आणि हा चित्तवेधक व्हिडिओ कारवां इ मोहब्बतच्या माध्यम गटाने चित्रित, संकलित आणि निर्मित केला आहे. हर्ष मंदर यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेलं कारवां इ मोहब्बत हे आंदोलन भारतीय संविधानातील बंधुभाव, समता, स्वातंत्र्य आणि न्याय या वैश्विक मूल्यांना वाहिलेलं आहे.
गेल्या काही आठवड्यांमध्ये दिल्ली-हरयाणा, पंजाब आणि देशाच्या इतर भागात मोठ्या प्रमाणावर निकराने सुरू असलेलं हे आंदोलन केंद्राने – कृषी हा राज्याच्या यादीतल्या विषय असला तरी - संसदेत रेटून आणलेल्या, शेतकऱ्यांचे अहित साधणाऱ्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आहे. पुढील व्हिडिओ आणि गाण्यामध्ये, हे कायदे रद्द करण्याची या आंदोलनाची मागणी मांडण्यात आली आहेः
अनुवादः मेधा काळे