छळ, अत्याचार, युद्ध आणि रक्तपाताच्या या युगात आपण नेहमीच जागतिक शांतीबद्दल बोलत असतो. पण मुळात जी संस्कृती ईर्ष्या, हाव, हेवेदावे, मत्सर, तिरस्कार आणि हिंसेच्या मुळांवर पोसली गेलीये ती शांती म्हणजे काय हे कधी समजून घेऊ शकेल का? माझी मुळं जिथे आहेत तिथे ही अशी संस्कृती मी पाहिलीच नाहीये. एखादी संस्कृती म्हणजे काय याची आम्हा आदिवासींची एक वेगळी समज आहे. शिकल्या सवरल्या माणसाने रात्रीच्या अंधारात कचरा करावा आणि एखाद्या निरक्षराने तो सकाळच्या उजेडात साफ करावा हे आम्हाला मान्य नाही. आम्ही याला संस्कृती म्हणत नाही आणि अशा कुठल्याच संस्कृतीचा आम्हाला भाग व्हायचं नाहीये. आम्ही नदीकाठी शौचाला जात नाही. झाडाची कच्ची फळं तोडत नाही. होळी जवळ आली की आम्ही जमिनीची मशागत सुद्धा करत नाही. आमच्या जमिनी आम्ही ओरबाडत नाही. वर्षभर, न थकता या वसुंधरेने आम्हाला सतत काही देत रहावं अशी आमची अपेक्षाच नसते. आम्ही तिला आराम करू देतो. श्वास घ्यायची सवड देतो. पुनरुज्जीवित होण्यासाठी वेळ देतो. आम्हाला मानवी जिवाचं जितकं मोल आहे ना तितकाच आदर या निसर्गाप्रतीही आहे.

देहवाली भिलीमध्ये जितेंद्र वसावा यांच्या आवाजात ही कविता ऐका

कवितेचा इंग्रजी अनुवाद प्रतिष्ठा पंड्या यांच्या आवाजात

तियाह्ल जोंगलुम्ने फाचे नाहां आलें आमुहूं

आमांडा याह्न तुमुहूं
लाक्षागृहुम बाली देदें
आर दांता आकडावाड़ी लेदा
काहिंता पावुहू पावुहू नें चुलावी माअया
काहिं सोवता आथुकी सोवता पोगें फुकाव्यें
तुमां खूनी सभ्यता आखो तोरना करूप साहेब,
तियाह्ल जोंगलुम्ने फाचे नाहाँ आलें आमुहूं।

चाडूपनें पान पाकी, एहेंड़ो टूटी पोड़े कादुमें
इंज मातु दोरसोन हाय आमां
आमुहुँ देवूहुने वादलाम नेंय
अनुभोव केअतेहें कुदरोतु बाठा आंगुम
विगोरजीवु कोल्पना नाहाँ आमां जीवणाम
कुदरोतु ज जीवोनु होरोग हाय
कुदरोतु विरोद, नोरोक हाय
आजादी आमां जीवोनु धोरोम हाय
तुमुहुँ गुलामी जालूल धोरोम आखि बोठा
तुमां खूनी सभ्यताआ खोतोरनाक रूप साहेब,
तियाह्ल जोंगलुम्ने फाचे नाहाँ आलें आमुहूं।

भूमिसेना हाय आमुहुँ साहेब
आमां अस्तित्वा खातर
सोवताल नाहाँ वाचावतें आमुहुँ
जल, जंगल, जमीन, जन, जनावर
अस्तित्वा मूलाधार हाय आमां
तुमुहुँ आमां डायाह्ने
तोपु मूयूँरी बांदी देदें
चाडूहूं पे टांगिन एठा आग बाली
पल्टन बोनावी आमां, आम्नेहें ज माराव्या
कुदरती ताकातुल खोतोम करां
तुमुहुँ चोर, लुटारु, हुवरें, बोदमास
काय काय नाहाँ आख्या आम्नेहें
कागला की बी तुमुहुँ आम्नेहें माई सकता हा
तुमां खूनी सभ्यताआ खोतोरनाक रूप साहेब,
तियाह्ल जोंगलुम्ने फाचे नाहाँ आलें आमुहूं।

तुमुहुँ तुमां जीवोनुल बाजार बोणावी देदो
लेखार्याहा पे सोवता डोआँ नाहा रिया
साहेब तुमां शिक्षण
आमां अस्तित्वालु ज वेची मारी
बाजारुम उबें केरी आम्नेहें बाठाह्न
सांस्कृतिक सभ्यता नांवुपे तुमुहुँ
असभ्यताआ मोड़ा मोड़ा डोगु बोणावी लेदा
परत्येक आदमी एक बिजारी नोफरोत केए
इंज तुमां नवयुगू निर्माण हाय?
बन्दूक, बोंबू की तुमुहुँ
विश्वशांति लावां मागताहा
तुमां खूनी सभ्यताआ खोतोरनाक रूप साहेब,
तियाह्ल जोंगलुम्ने फाचे नाहाँ आलें आमुहूं।

आणि आम्ही जंगलातून बाहेरच आलो नाही

तुम्ही आमच्या पूर्वजांना
लाक्षागृहात जाळलंत
कित्येकांचा अंगठा घेतलात कापून
भावा-भावांत भांडणं लावलीत तुम्ही
कुठे आपल्याच हातांनी घरं जाळायला लावलीत
साहेब, पाहिली तुमची जीवघेणी संस्कृती
आणि आम्ही जंगलातून बाहेरच आलो नाही.

पिकलं पान झाडावरून हलकेच गळून मातीत पडतं
तितकं सहज असतं आमच्यासाठी मरण
आमचे देव वर आकाशात नाही
निसर्गाच्या कानाकोपऱ्यात जाणवत असतात आम्हाला
निर्जीव ही कल्पनाच अस्तित्वात नाही आमच्या आयुष्यात. निसर्गच स्वर्ग आहे आमचा.
आणि त्याच्या विरोधात जाणं म्हणजे नरक.
स्वातंत्र्य आहे आमचा धर्म.
आणि तुम्ही मात्र गुलामीच्या जाळ्याला धर्माचं नाव दिलंत.
साहेब, पाहिली तुमची जीवघेणी संस्कृती
आणि आम्ही जंगलातून बाहेरच आलो नाही.

आम्ही भूमीसेना आहोत, साहेब
आमच्या अस्तित्वासाठी
आम्ही वाचवत नाही फक्त स्वतःला
जल, जंगल, जमीन, जन, जनावर
आहेत आमच्या अस्तित्वाचा मूलाधार.
तुम्ही दिलंत आम्हाला तोफेच्या तोंडी
झाडाला लटकवलंत
आणि आग पेटवलीत खालून
आमचंच सैन्य बनवलंत आणि आम्हालाच मारलंत
निसर्गाची ताकद संपावी म्हणून
आम्हाला ठरवलंत चोर, लुटारू, दरोडेखोर आणि बदमाश
कागदाच्या जोरावरही घेऊ शकता तुम्ही आमचा जीव
साहेब, पाहिली तुमची ही जीवघेणी संस्कृती
आणि आम्ही जंगलातून बाहेरच आलो नाही.

तुमच्या आयुष्याचा बाजार मांडलाय तुम्ही
शिकलेल्याकडेही नाही राहिली स्वतःची दृष्टी
साहेब, तुमचं हे शिक्षण
आमचं अस्तित्वच काढेल विकायला
आणि आम्हा सगळ्यांना उभं करेल बाजारात
संस्कृती, सभ्यतेच्या नावाखाली
असभ्यतेचे डोंगर उभे केलेत तुम्ही
प्रत्येक जण करतोय दुसऱ्याचा द्वेष
असं नवयुग निर्माण करायचंय तुम्हाला?
बंदुकीच्या टोकावर, स्फोटकांच्या जोरावर
तुम्हाला विश्वशांती साकारायची आहे, म्हणे.
साहेब, तुमची ही जीवघेणी संस्कृती पाहिली
आणि आम्ही जंगलातून बाहेरच आलो नाही.

देहवाली भिली व हिंदीतून इंग्रजी अनुवादः प्रतिष्ठा पंड्या

मराठी अनुवादः मेधा काळे

Poem and Text : Jitendra Vasava

குஜராத்தின் நர்மதா மாவட்டத்தில் உள்ள மஹுபாதாவைச் சேர்ந்த ஜிதேந்திர வாசவா, தெஹ்வாலி பிலி மொழியில் எழுதும் கவிஞர். ஆதிவாசி சாகித்ய அகாடமியின் (2014) நிறுவனத் தலைவரும், பழங்குடியினரின் குரல்களுக்காக அர்ப்பணிக்கப்பட்ட கவிதை இதழான லகராவின் ஆசிரியருமான இவர், ஆதிவாசி வாய்மொழி இலக்கியம் குறித்த நான்கு புத்தகங்களை வெளியிட்டுள்ளார். அவரது முனைவர் பட்ட ஆய்வு நர்மதா மாவட்டத்தைச் சேர்ந்த பில்களின் வாய்வழி நாட்டுப்புறக் கதைகளின் கலாச்சார மற்றும் புராண அம்சங்களில் கவனம் செலுத்துகிறது. PARI-ல் வெளியிடப்பட்ட கவிதைகள் அவரது வரவிருக்கும் முதல் கவிதைத் தொகுப்பின் ஒரு பகுதியாகும்.

Other stories by Jitendra Vasava
Painting : Labani Jangi

லபானி ஜங்கி 2020ம் ஆண்டில் PARI மானியப் பணியில் இணைந்தவர். மேற்கு வங்கத்தின் நாடியா மாவட்டத்தைச் சேர்ந்தவர். சுயாதீன ஓவியர். தொழிலாளர் இடப்பெயர்வுகள் பற்றிய ஆய்வுப்படிப்பை கொல்கத்தாவின் சமூக அறிவியல்களுக்கான கல்வி மையத்தில் படித்துக் கொண்டிருப்பவர்.

Other stories by Labani Jangi