मी म्हसवडमध्येच लहानाचा मोठा झालो. पाण्यासाठी अगदी रोज करावा लागत असलेला संघर्ष मी स्वतः पाहिलेला आहे.

माणदेशाचा हा पट्टा महाराष्ट्राच्या अगदी मध्यावर आहे. शेकडो वर्षांपासून इथे पशुपालन करणार धनगर राहतायत. दख्खनच्या या कोरड्या पठारांवर जगायचं तर पाण्याचे स्रोत माहीत हवेत. या धनगरांचं जगणं त्यावरच अवलंबून आहे.

हंडे कळशा भरण्यासाठी बायांच्या रांगाच रांगा मी वर्षानुवर्षे पाहतोय. सरकारकडून दर १२ तासांनी एखादा तास पाणी पुरवठा केला जातो. आठवडी बाजारात गेलं तर तिथे शेतकरी पाण्याच्या त्यांच्या व्यथा सांगतात. कितीही खोल विहिरी गेल्या तरी पाण्याचा पत्ता नाही. आणि पाणी आलंच तरी ते अशुद्ध असतं आणि त्यातून किडनीच्या विकारांसारख्या गंभीर समस्या निर्माण होत असल्याचं ते सांगतात.

अशा बिकट परिस्थितीत शेती होतच नाहीये. गावातली तरुण मंडळी मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये कामासाठी स्थलांतरित झाली आहेत.

करखेलच्या शेतकरी असणाऱ्या गायकवाड काकांनी गुरं विकून टाकली आणि फक्त शेरडं ठेवली. रान कोरडं आणि पोरं मजुरीला मुंबईला. साठीचे गायकवाड काका पत्नी आणि नातवंडांसोबत राहतात. डोळे मिटण्याआधी तरी पाणी पहायला मिळू दे अशी त्यांना आशा आहे. अख्खं कुटुंब ज्या पाण्याने अंघोळ करतं तेच पाणी धुण्या-भांड्याला वापरतंय. आणि भांडी घासून झाली की तेच पाणी अंगणातल्या आंब्याला घालायचं.

साताऱ्याच्या माण तालुक्यात जाऊ तिथे पाण्याच्या गंभीर संकटाचा सामना करणारी लोकं आपल्याला पाण्याच्या शोधात या फिल्ममध्ये भेटतात. तेच नाही तर त्यांच्यासोबत त्यांना पाणी पुरवणारे पाणीवालेही तुम्हाला यात दिसतील.

फिल्म पहाः पाण्याच्या शोधात

ਅਚਿਊਤਾਨੰਦ ਦਿਵੇਦੀ ਇੱਕ ਫਿਲਮ ਨਿਰਮਾਤਾ ਅਤੇ ਵਿਗਿਆਪਨ ਨਿਰਦੇਸ਼ਕ ਹੈ, ਅਤੇ ਉਸਨੂੰ ਕਾਨਸ ਫਿਲਮ ਅਵਾਰਡ ਸਮੇਤ ਕਈ ਵੱਕਾਰੀ ਪੁਰਸਕਾਰਾਂ ਨਾਲ ਸਨਮਾਨਿਤ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ।

Other stories by Achyutanand Dwivedi

ਪ੍ਰਭਾਤ ਸਿਨਹਾ ਇੱਕ ਅਥਲੀਟ, ਸਾਬਕਾ ਸਪੋਰਟਸ ਏਜੰਟ, ਲੇਖਕ ਅਤੇ ਖੇਡ ਗੈਰ-ਮੁਨਾਫਾ ਮਾਨ ਦੇਸ਼ੀ ਚੈਂਪੀਅਨਜ਼ ਦਾ ਸੰਸਥਾਪਕ ਹਨ।

Other stories by Prabhat Sinha
Text : Prabhat Sinha

ਪ੍ਰਭਾਤ ਸਿਨਹਾ ਇੱਕ ਅਥਲੀਟ, ਸਾਬਕਾ ਸਪੋਰਟਸ ਏਜੰਟ, ਲੇਖਕ ਅਤੇ ਖੇਡ ਗੈਰ-ਮੁਨਾਫਾ ਮਾਨ ਦੇਸ਼ੀ ਚੈਂਪੀਅਨਜ਼ ਦਾ ਸੰਸਥਾਪਕ ਹਨ।

Other stories by Prabhat Sinha
Translator : Medha Kale

ਮੇਧਾ ਕਾਲੇ ਪੂਨਾ ਅਧਾਰਤ ਹਨ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਔਰਤਾਂ ਅਤੇ ਸਿਹਤ ਸਬੰਧੀ ਖੇਤਰਾਂ ਵਿੱਚ ਕੰਮ ਕੀਤਾ ਹੈ। ਉਹ ਪਾਰੀ (PARI) ਲਈ ਇੱਕ ਤਰਜ਼ਮਾਕਾਰ ਵੀ ਹਨ।

Other stories by Medha Kale