कर्नाटकाच्या किनारी भागात विविध सणसमारंभांमध्ये गरनाल सायबेर किंवा फटाक्यांची आतषबाजी करणाऱ्या कलकारांना मोठी मागणी असते. भुता कोला, सण, समारंभ, लग्नं, वाढदिवस किंवा वास्तुशांत आणि अगदी मृत्यूनंतर दफनविधीवेळी देखील त्यांचा सहभाग फार महत्त्वाचा मानला जातो.

गरनाल म्हणजे फटाका आणि सायबेर हा या भागात मुस्लिम व्यक्तीसाठी वापरला जाणारा शब्द.

आमीर हुसैन मुल्की शहरातला गरनाल सायबेर आहे. तो सांगतो की त्याच्या वडलांनी त्याला ही कला शिकवली आणि हा वारसा एका पिढीकडून पुढच्या पिढीला सुपूर्द केला जातो.

“फटाक्यांचं, ते हवेत फेकण्याचं काम तसं जोखमीचं आहे, खास करून मोठी आतषबाजी तर नक्कीच,” नितेश आंचन म्हणतात. ते कर्नाटकातील मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन इथे संशोधक आहेत.

मुश्ताक अथराडी, उडुपी जिल्ह्यातल्या अथराडी गावचा रहिवासी. तो गरनाल तयार करतो आणि भुता उत्सवांमध्ये ते आकाशात फेकण्याचं काम करतो. त्याची खासियत म्हणजे तो काडोणी म्हणून ओळखला जाणारा सगळ्यात मोठा धमाका करणारा गरनाल तयार करू शकतो. “वेगवेगळ्या प्रकारची दारू किंवा रसायनं विशिष्ट पद्धतीने एकत्र करून काडोणी तयार केला जातो,” तो सांगतो. काडोणी जिथे फोडला जातो तिथली जमीन देखील हादरते असं लोक सांगतात.

तुलुनाडूचे गरनाल सायबेर हि फिल्म पहा

भुता कोलामधली फटाक्यांची आतषबाजी पाहणं हा नयनरम्य सोहळा असतो. तुलुनाडूमध्ये भुता किंवा विविध आत्म्यांची उपासना अनेक शतकांपासून सुरू आहे. कोला म्हणजे भुता परंपरेचा एक आविष्कार. नादस्वरम, तासे (ताशा) आणि इतर पारंपरिक वाद्यांचे नाद आणि गरनालचा धमाका या विधींचं महत्त्वाचं अंग. कोला सुरू होतो तेव्हा गरनाल सायबेर मोठमोठे फटाके आकाशात फेकतात. तिथे रंगणारी आतषबाजी पाहण्यासारखी असते. पहाः तुलुनाडूची 'भुतं': समन्वयाची अशीही संस्कृती

भुता कोला मध्ये अनेक समुदाय एकत्र येतात, प्रा. प्रवीण शेट्टी सांगतात, “आज तुलुनाडूमध्ये भुता कोलामध्ये कुणी काय करायचं याचे ठरलेले नियम आहेत. आणि शक्यतो हे हिंदूंना लागू होतात. पण गंमत म्हणजे कालौघात भुता कोलामध्ये मुस्लिम समुदायाचा स्वीकार केला गेला. वादन किंवा फटाके फोडण्याचं काम खास करून त्यांना देण्यात आलं.”

“फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली तेव्हापासून भुता कोला विधींनी वेगळीच उंची गाठलीये, आणि ते अधिकच देखणे झालेत,” प्रा. शेट्टी म्हणतात. ते उडुपीच्या मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन इथे तुलु संस्कृतीचे गाढे अभ्यासक आहेत.

शतकानुशतकं सुरू असलेली मेलजोल आणि समन्वयाची संस्कृती पुढे नेणारे, आपल्या आतषबाजीने आकाश उजळून टाकणारे आमीर आणि मुश्ताक हे गरनाल सायबेर तुम्हाला या फिल्ममध्ये भेटतील.

या वार्तांकनाला मृणालिनी मुखर्जी फौंडेशनचे सहाय्य लाभले आहे.

कव्हर डिझाइनः सिद्धिता सोनवणे

Faisal Ahmed

ਫੈਜ਼ਲ ਅਹਿਮਦ ਇੱਕ ਦਸਤਾਵੇਜ਼ੀ ਫਿਲਮ ਨਿਰਮਾਤਾ ਹਨ, ਜੋ ਇਸ ਸਮੇਂ ਆਪਣੇ ਜੱਦੀ ਸ਼ਹਿਰ ਮਾਲਪੇ ਵਿੱਚ ਰਹਿੰਦੇ ਹਨ ਜੋ ਤੱਟਵਰਤੀ ਕਰਨਾਟਕ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਮਨੀਪਾਲ ਅਕੈਡਮੀ ਆਫ ਹਾਇਰ ਐਜੂਕੇਸ਼ਨ ਨਾਲ਼ ਕੰਮ ਕੀਤਾ, ਜਿੱਥੇ ਉਨ੍ਹਾਂ ਤੁਲੁਨਾਡੂ ਦੇ ਜੀਵੰਤ ਸਭਿਆਚਾਰਾਂ ਬਾਰੇ ਦਸਤਾਵੇਜ਼ੀ ਫਿਲਮਾਂ ਦਾ ਨਿਰਦੇਸ਼ਨ ਕੀਤਾ। ਉਹ ਇੱਕ ਐੱਮਐੱਮਐੱਫ-ਪਾਰੀ ਫੈਲੋ (2022-23) ਹਨ।

Other stories by Faisal Ahmed
Text Editor : Siddhita Sonavane

ਸਿੱਧੀਤਾ ਸੋਨਾਵਨੇ ਪੀਪਲਜ਼ ਆਰਕਾਈਵ ਆਫ ਰੂਰਲ ਇੰਡੀਆ ਵਿਖੇ ਇੱਕ ਪੱਤਰਕਾਰ ਅਤੇ ਸਮੱਗਰੀ ਸੰਪਾਦਕ ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ 2022 ਵਿੱਚ ਐੱਸਐੱਨਡੀਟੀ ਮਹਿਲਾ ਯੂਨੀਵਰਸਿਟੀ, ਮੁੰਬਈ ਤੋਂ ਆਪਣੀ ਮਾਸਟਰ ਡਿਗਰੀ ਪੂਰੀ ਕੀਤੀ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਹੀ ਅੰਗਰੇਜ਼ੀ ਵਿਭਾਗ ਵਿੱਚ ਇੱਕ ਵਿਜ਼ਿਟਿੰਗ ਫੈਕਲਟੀ ਹਨ।

Other stories by Siddhita Sonavane
Translator : Medha Kale

ਮੇਧਾ ਕਾਲੇ ਪੂਨਾ ਅਧਾਰਤ ਹਨ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਔਰਤਾਂ ਅਤੇ ਸਿਹਤ ਸਬੰਧੀ ਖੇਤਰਾਂ ਵਿੱਚ ਕੰਮ ਕੀਤਾ ਹੈ। ਉਹ ਪਾਰੀ (PARI) ਲਈ ਇੱਕ ਤਰਜ਼ਮਾਕਾਰ ਵੀ ਹਨ।

Other stories by Medha Kale