दिवे विझू नये याची खात्री करण्यासाठी एक तरुण पडद्यामागे धावताना दिसतो. या तासाभराच्या सादरीकरणात त्याला अनेकदा ही कसरत करावी लागते. हे सर्व करताना साधनसामग्री आणि त्याच्या सहकाऱ्यांना त्रास होणार नाही याचीदेखील काळजी घ्यावी लागते.

हे सगळे थोलपावकोथ कलाकार असून, ते पडद्याआड राहून ही कला सादर करतात.

एका पांढऱ्या सुती पडद्याच्या आड हे कठपुतळी कलाकार हातात चामड्याचे बाहुले घेऊन सतत फिरताना दिसतात. त्यांच्या पायाजवळ सुमारे ५० ते ६० इतर कठपुतळ्या ठेवलेल्या असतात, ज्या पुढील सादरीकरणासाठी तयार केलेल्या असतात. वक्त्यांद्वारे ही कथा कथन केली जाते आणि सावल्यांद्वारे दाखवली जाते.

या कलेचे स्वरूप असे आहे की, त्याच्या खऱ्या कामाकडे लक्षच जात नाही. म्हणूनच जेव्हा २०२१ मध्ये कठपुतळी कलाकार रामचंद्र पुलावर यांना देशातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजे पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला तेव्हा तो उत्सव साजरा करण्याचे कारण आणि पोचपावती मिळण्याचा दिवस होता. आपल्या भाषणात थोलपावकोथ कलाकार पुलावर म्हणाले, “या पुरस्काराचे सर्व श्रेय या कठपुतळी कलेचे अस्तित्व सुनिश्चित करण्यासाठी कलाकारांच्या पथकाने केलेल्या सामूहिक प्रयत्नांना जाते.”

हे यश म्हणजे पुलावर आणि त्यांच्या संघाच्या कामाची खरी पावती ठरले आहे. समीक्षक आणि भक्तांनी त्यांच्यावर ह्या कलेचे व्यवसायात रुपांतर केल्याचा आरोप केला. रामचंद्रांना मात्र टीकेची फारशी चिंता नाही. “आम्हाला जगण्यासाठी आणि पोट भरण्यासाठी हा व्यवसाय हवा आहे”, असे ते म्हणतात. “जर अभिनेते आणि नर्तक त्यांची कला सादर करण्यासाठी पैसे घेऊ शकतात, तर मग कठपुतळी कलाकार का घेऊ शकत नाहीत?”

PHOTO • Courtesy: Rahul Pulavar
PHOTO • Sangeeth Sankar

डावीकडे : भारतीय अंतराळ मोहिमेवर आधारित थोलपावकोथ कठपुतळी सादरीकरण. एका शाळेच्या वार्षिक कार्यक्रमासाठी रामचंद्र यांच्या पथकाने ते सादर केले होते. उजवीकडे : पडद्यामागील कठपुतळी सादरीकरणात गांधींची कथा सांगण्यात आली

परंपरेने थोलपावकोथ हे केवळ मंदिराच्या आवारात किंवा केरळमधील कापणी उत्सवादरम्यान सादर केले जात असे. पण ६३ वर्षीय रामचंद्र आणि त्यांच्या कवलप्पारा कठपुतळी कला पथकाने पलक्कड जिल्ह्यात गेल्या वीस वर्षांत थोलपावकोथचे सातत्य राखण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. आजवर पडद्यामागील कठपुतळी नाट्यकलेमध्ये शैलीसह बरेच बदल आणि प्रयोग करण्यात आले आहेत. थोलपावकोथ कठपुतळी कलेमधील पारंपरिक उत्सवातील अधिक सादरीकरण थोलपावकोथ छाया-पुतळ्यांचे सर्वसमावेशक खेळ येथे पाहा.

रामचंद्र यांचे वडील कृष्णकुट्टी पुलवार यांनी थोलपावकोथला बाहेरच्या जगात आणण्याचा निर्णय घेतला. कथांच्या विस्तृत श्रेणीचे चित्रण करण्यासाठी रामायणासारख्या हिंदू महाकाव्यांचे पठण करण्यापलीकडे प्रयोग केले गेले. केरळच्या पारंपरिक कठपुतळी शैलीत महात्मा गांधींची कथा ऑक्टोबर २००४ मध्ये एडप्पल येथे सर्वप्रथम सादर करण्यात आली होती. तेव्हापासून ती २२० हून अधिक वेळा सादर केली गेली आहे.

या नाटकाला मिळालेल्या भरभरीन प्रतिसादामुळे कवलप्पारा पथकासाठी नवीन मार्ग उघडले. त्यांनी पटकथा विकसित करणे, कठपुतळी तयार करण्यासाठी कठपुतळीचे स्केचेस तयार करणे, हाताळणी तंत्रात प्रभूत्व मिळवणे, कथाकथन करणे, स्टुडिओमध्ये गाणी तयार करणे आणि रेकॉर्ड करणे यांसारखी कामे सुरू केली. आजवर या पथकाने येशू ख्रिस्ताचा जन्म, महाबली, पंचतंत्रम इत्यादी विविध कथांच्या स्क्रिप्ट सादर केल्या आहेत.

कवलप्पारा येथील कठपुतळी कलाकारांनी बुद्धाचा अध्यात्मिक प्रभाव दाखवणारी कुमारनाशनची कविता ‘चंडालभिक्षुकी’सारख्या कथांद्वारे सामाजिक जागरुकतादेखील निर्माण केली. त्यानंतर, २००० च्या दशकापासून महत्त्वपूर्ण समस्यांबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी एचआयव्हीबद्दल जागरुकता वाढवणे, जंगलतोड थांबवणे, निवडणूक मोहिमांमध्ये योगदान देणे यासाठी एक उत्तम व्यासपीठ निर्माण केले. कठपुतळी कलाकारांनी विविध कलाप्रकार आणि कलाकारांसोबत काम केले, फ्युजन परफॉर्मन्स तयार केले आहे.

आजच्या जगातील थोलपावकोथच्या नावीन्य आणि चिकाटीपूर्ण प्रवासाची गोष्ट सांगणारी डॉक्युमेंटरी.

पहा: वर्षानुवर्षे चालत आलेली थोलपावकोथ कला

हे वार्तांकन मृणालिनी मुखर्जी फाउंडेशन (MMF) च्या फेलोशिपअंतर्गत करण्यात आले आहे.

Sangeeth Sankar

ਸੰਗੀਤ ਸੰਕਰ ਆਈ.ਡੀ.ਸੀ. ਸਕੂਲ ਆਫ ਡਿਜ਼ਾਈਨ ਵਿੱਚ ਇੱਕ ਖੋਜੀ ਵਿਦਵਾਨ ਹੈ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਨਸਲੀ ਖੋਜ ਦੀ ਬਦੌਲਤ ਹੀ ਕੇਰਲ ਦੀ ਸ਼ੈਡੋ ਕਠਪੁਤਲੀ ਕਲਾ ਵਿੱਚ ਆਈ ਤਬਦੀਲੀ ਸਾਡੇ ਸਾਹਮਣੇ ਆ ਸਕੀ। ਸੰਗੀਤ ਨੂੰ 2022 ਵਿੱਚ ਐੱਮਐੱਮਐੱਫ-ਪਾਰੀ ਫੈਲੋਸ਼ਿਪ ਮਿਲੀ ਸੀ।

Other stories by Sangeeth Sankar
Text Editor : Archana Shukla

ਅਰਚਨਾ ਸ਼ੁਕਲਾ ਪੀਪਲਜ਼ ਆਰਕਾਈਵ ਆਫ਼ ਰੂਰਲ ਇੰਡੀਆ ਵਿਖੇ ਕੰਟੈਂਟ ਸੰਪਾਦਕ ਹਨ। ਉਹ ਪ੍ਰਕਾਸ਼ਨ ਟੀਮ ਨਾਲ਼ ਕਰਦੇ ਹਨ।

Other stories by Archana Shukla
Translator : Ashwini Patil

Ashwini is a journalist based in Nashik with seven years of experience in Marathi print media. She has a keen interest in women and development, cultural studies, youth, finance and media.

Other stories by Ashwini Patil