‘ते घर होय?’ ते समुद्राच्या पोटात गेलंय – पार तिथे!’

आंध्र प्रदेशाच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातल्या उप्पाडा गावातल्या रहिवाशांना समुद्र आता कशाचा घास घेणार हे आपसूकच समजतं. किनारा आत सरकत चालल्यामुळे त्यांच्या उपजीविकांवर परिणाम झालाय, नातेसंबंध विस्कटलेत आणि समूहस्मृतीही देखील

राहुल एम. | २८ फेब्रुवारी, २०२२

वातावरण बदलाच्या रणांगणात कीटकांचा लढा

भारतात स्थानिक कीटकांच्या प्रजाती झपाट्याने नष्ट होत आहेत – आणि यातल्या अनेक आपल्या अन्न सुरक्षेसाठी मोलाच्या आहेत. पण माणसाला केसाळ प्राण्यांप्रती वाटतं तसं प्रेम या किड्यांसाठी वाटू लागेल हे मात्र अवघड काम आहे

प्रीती डेव्हिड । ४ ऑक्टोबर, २०२०

ठाण्यामध्ये पाऊस  बिथरलाय

धर्मा गरेल किंवा शहापूरमधल्या आदिवासी पाड्यांवरच्या इतरांना ‘वातावरण बदल’, ही संज्ञा माहित नसेलही पण या बदलांचा ते रोजच त्यांचा सामना करतायत, लहरी पाऊस असो किंवा पिकाचा घटता उतारा

ज्योती शिनोळी । २३ सप्टेंबर २०२०

लक्षद्वीप बेटं - प्रवाळाची आणि दुःखाची

भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश, समुद्रपातळीच्या सरासरी १-२ मीटरच वर – आणि जिथे दर सातवी व्यक्ती मच्छिमार आहे, अशा बेटांवर विविध पद्धतीने होणाऱ्या वातावरणातल्या बदलांमुळे प्रवाळ कमी होत चाललंय

१७ सप्टेंबर, २०२० । श्वेता डागा

चुरुः कधी गार, कधी गरम – बहुतेक गरमच

२०१९ साली जून महिन्यात राजस्थानच्या चुरुमध्ये तापमानाचा जागतिक उच्चांक गाठला गेला – ५१ अंश सेल्सियस. पण बहुतेक लोकांसाठी लांबत चाललेला उन्हाळा आणि इतर अनेक बदल थेट वातावरणातल्या बदलांकडे बोट दाखवतात

२० जुलै, २०२० । शर्मिला जोशी

जेव्हा यमुनेतले ‘मेलेले मासे जरासे ताजे असतील’

दिल्लीची ही जीवनदायिनी आता सांडपाणी आणि अनास्थेमुळे गटार झाली आहे. दर वर्षी हजारो मासे मरतायत आणि यमुनेच्या या मूळ संरक्षकांपुढे कुठे जायचं हा प्रश्न उभा ठाकलाय. हे सगळंच वातावरणावरच्या अरिष्टात भर घालतंय

२४ जानेवारी, २०२० । शालिनी सिंग

महानगर, छोटे शेतकरी आणि एक मरणासन्न नदी

शहरी शेतकरी? हो, तसंच काही तरी – तेही देशाच्या राजधानीत. मरणपंथाला लागलेली यमुना आणि तिचे ध्वस्त किनारे यामुळे इथे वातावरणावर अरिष्ट आलंय आणि लोकांच्या उपजीविका ऱ्हास पावतायत

६ जानेवारी, २०२० । शालिनी सिंग

मुंबईत मोठा पापलेट घावंना

वरसोव्याच्या कोळीवाड्यातले अनेक जण मासळी कशी घटत चाललीये याच्या कहाण्या सांगतात – स्थानिक स्तरावरचं प्रदूषण ते जागतिक तापमान वाढ अशी अनेक कारणं याच्या मागे आहेत. दोन्ही घटकांचा एकत्रित परिणाम होऊन वातावरण बदलाचे वारे आता या शहराच्या किनाऱ्यावर येऊन थडकले आहेत

६ डिसेंबर २०१९ । सुबुही जिवानी

तमिळ नाडूच्या समुद्री शेवाळ संग्राहक खोल गर्तेत

तमिळ नाडूच्या भारतीनगरमधल्या मच्छिमार बाया असं एक काम करतात की ज्यात त्या नावांपेक्षा पाण्यात जास्त वेळ असतात. मात्र वातावरणातले बदल आणि सागरी संपत्तीचा बेमाप वापर यामुळे त्यांच्या उपजीविकेचा ऱ्हास होत चाललाय

१ नोव्हेंबर, २०१९ । एम. पलानी कुमार

भंडाऱ्यात पावसाची ओढ आणि ओढगस्तीतले शेतकरी

विदर्भातल्या या जिल्ह्यामध्ये मुबलक पाणी उपलब्ध होतं, आता तिथे पावसाचं वागणं बदलत चाललंय. सध्या ‘वातावरणीय घडामोडींचा केंद्रबिंदू’ म्हणून गणल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यातल्या या बदलांमुळे धान शेतकरी अनिश्चिततेच्या आणि नुकसानीच्या गर्तेत सापडले आहेत

ऑक्टोबर २६, २०१९ । जयदीप हर्डीकर

‘कापूस म्हणजे आता डोकेदुखीच झालाय’

रसायनांचा बेमाप वापर करावी लागणारी बीटी कपाशीची एकपिकी शेती ओडिशाच्या रायगडा जिल्ह्यात फोफावतीये – ज्याचे आरोग्यावर परिणाम होतायत, कर्जं वाढतायत, पारंपरिक ज्ञान लोप पावतंय आणि वातावरणावरच्या अरिष्टाचं बी मूळ धरतंय

ऑक्टोबर ८, २०१९ अनिकेत आगा व चित्रांगदा चौधरी

ओडिशात वातावरणावरच्या अरिष्टाचं बी रुजतंय

ओडिशाच्या रायगडामध्ये बीटी कपाशीचा पेरा गेल्या १६ वर्षात ५,२०० टक्क्यांनी वाढला आहे. परिणामः स्थानिक तृणधान्यं, तांदळाचे वाण आणि वनान्नांनी समृद्ध असणारी जैवविविधतेची ही भूमी आता परिसंस्थेमधली मोठी उलथापालथ अनुभवत आहे

ऑक्टोबर ६, २०१९ चित्रांगदा चौधरी व अनिकेत आगा

गुजरातची घटती गायरानं आणि मेंढरांचा घोर

गुजरातेत आपल्या मेंढरांसाठी कुरणांच्या शोधात कच्छचे मेंढपाळ प्रचंड अंतर पायी तुडवतात, कारण चराईसाठी कुरणंच नाहिशी होतायत, आहेत ती वापरता येत नाहीयेत आणि वातावरण तर जास्तच लहरी होत चाललंय

सप्टेंबर २५, २०१९ नमिता वाईकर

सुंदरबनः ‘गवताचं साधं पातंही उगवलं नाही...’

पश्चिम बंगालच्या सुंदरबनमधे वर्षानुवर्षं बिकट स्थितीत राहणाऱ्या लोकांना बदलतं पर्यावरण, वारंवार येणारी चक्रीवादळं, लहरी पाऊस, वाढता उष्मा, विरळत चाललेली खारफुटीची वनं आणि इतरही अनेक बदलांना तोंड द्यावं लागत आहे

सप्टेंबर १६, २०१९ ऊर्वशी सरकार

‘सुखाचे दिवस आता फक्त स्मरणरंजनापुरते’

अरुणाचल प्रदेशाच्या पूर्व हिमालयाच्या उत्तुंग पर्वतराजींमध्ये भटक्या ब्रोकपा समुदायाने वातावरणातील बदल ओळखलेत आणि आपल्या पारंपरिक ज्ञानाच्या आधारावर ते त्याचा मुकाबला करण्याचे मार्ग चोखाळतायत

सप्टेंबर ३, २०१९ रितायन मुखर्जी

४३ डिग्री तापमानात लातूरमध्ये गारांचा मारा

महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातले गावकरी गेल्या दशकापासून उन्हाळ्यात होणाऱ्या गारपिटीमुळे चक्रावून गेले आहेत. काही शेतकरी तर आता फळबागांचा नाद सोडून देण्याच्या विचारात आहेत

ऑगस्ट २७, २०१९ पार्थ एम. एन.

‘पान फिरलं, उपारतं झालं’ मु. पो. सांगोला

महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यातल्या गावांमध्ये चांगला पाऊस आणि दुष्काळ अशी साखळी आता मोडत चालल्याच्या किती तरी कहाण्या ऐकायला मिळतात – सोबत हे का घडतंय, त्याचे परिणाम काय हेही

ऑगस्ट २१, २०१९ मेधा काळे

‘आताशा ते मासे डिस्कव्हरी चॅनेलवरच पहायचे’

कादल ओसई, तमिळ नाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यातल्या पाम्बन बेटावरच्या मच्छिमारांनी त्यांच्यासाठीच चालवलेल्या कम्युनिटी रेडिओला या आठवड्यात तीन वर्षं पूर्ण होतील. त्याची बरीच वाहवा होतीये – कारण सध्या भर आहे वातावरण बदलांवर

ऑगस्ट १३, २०१९ कविता मुरलीधरन

‘वातावरण असं बदलतंय तरी का?’

केरळच्या वायनाडमधे वाढतं तापमान आणि लहरी पावसामुळे केळी आणि कॉफी शेतकरी घाट्यात आले आहेत, कधी काळी याच जिल्ह्यातल्या रहिवाशांना तिथल्या ‘वातानुकुलित हवे’चा अभिमान होता

ऑगस्ट ५, २०१९ विशाखा जॉर्ज

‘आम्ही डोंगरदेवाचा रोष ओढवून घेतलाय बहुतेक’

लडाखच्या पर्वतराजींच्या अतिशय बिकट परिसंस्थांमधलं वातावरण झपाट्याने बदलत असल्याने तिथल्या उंचावरच्या भटक्या चांगपा पशुपालकांची याक आधारित अर्थव्यवस्था गर्तेत सापडली आहे

जुलै २५, २०१९ रितायन मुखर्जी

बदलत्या वातावरणामुळे कोल्हापुरात गव्यांशी गाठ

कोल्हापूरच्या राधानगरीमध्ये मानव-वन्यजीव संघर्ष वाढत चालला आहे, गवे आसपासच्या शेतात धुडगूस घालतायत. जंगलतोड, पीकपद्धतीत बदल, दुष्काळ आणि लहरी हवामान याचा हा परिपाक आहे

जुलै १७, २०१९ संकेत जैन

रायलसीमातला रेतीचा पाऊस

पीक पद्धतीतले बदल, घटतं वन आच्छादन, बोअरवेलचा जणू विस्फोट, एका नदीचा अंत आणि इतरही अनेक घटकांचा एकत्रित नाट्यमय परिणाम आंध्र प्रदेशातल्या अनंतपूरची जमीन, हवा, पाणी, वनं आणि वातावरणावर झाला आहे

जुलै ८, २०१९ । पी. साईनाथ

Translator : Medha Kale

ਮੇਧਾ ਕਾਲੇ ਪੂਨਾ ਅਧਾਰਤ ਹਨ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਔਰਤਾਂ ਅਤੇ ਸਿਹਤ ਸਬੰਧੀ ਖੇਤਰਾਂ ਵਿੱਚ ਕੰਮ ਕੀਤਾ ਹੈ। ਉਹ ਪਾਰੀ (PARI) ਲਈ ਇੱਕ ਤਰਜ਼ਮਾਕਾਰ ਵੀ ਹਨ।

Other stories by Medha Kale