पश्चिम बंगालच्या जलपायगुडी जिल्ह्यात करीमुल हक चहाच्या मळ्यात काम करतात - आणि स्वत:च्या मोटारसायकलवर लोकांना धालाबारी आणि नजिकच्या इतर गावांमधून हॉस्पिटल किंवा दवाखान्यांमध्ये विनामूल्य घेऊन जातात. धालाबारीपासून सुमारे सहा किलोमीटरवर क्रांती इथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. पण तिथे थोड्याच सुविधा आहेत. या भागात एकही नियमित चारचाकी रूग्णवाहिका सेवा नाही.
करीमुलची अनोखी 'दुचाकी रूग्णवाहिका' आणि वैद्यकीय मदतीची गरज असलेल्यांना संपर्क करता यावा यासाठीचा मोबाईल नंबर इथल्या गावांमध्ये खूपच लोकप्रिय झालेला आहे. त्यांची सेवा स्थानिक डॉक्टर, पोलिस आणि अगदी तालुका अधिकाऱ्यांपर्यंत पोचली आहे.
चहाच्या मळ्यात त्यांना महिन्याला रू. ४००० मिळतात. बाईकचं इंधन आणि इतर खर्चासाठी ते त्यांच्या पगारातली २५ टक्के रक्कम बाजूला ठेवतात. इतर २५ टक्के बँकेकडून घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी जातात. करिमुल जास्त पैशासाठी धडपडत नाहीत. अल्ला त्यांना त्यांच्या कामासाठी बक्षीस देईल असा त्यांचा विश्वास आहे.
विश्व-भारती विद्यापीठ, शांतीनिकेतन येथील सेंटर फॉर जर्नलिझम अॅँड मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांनी, २०१६ च्या सुरूवातीला, त्यांच्या प्रथम सत्रात, एका फटक्यात ही फिल्म चित्रित केली. त्यानंतर अनेकांनी याच थीमवर आधारित, करीमुल हक यांच्या कामाची नोंद घेतली आहे. एक तर एका मोठ्या मोटारकंपनीची जाहिरातच म्हणता येईल. या वर्षी जानेवारीत, हक यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या फिल्मसाठी संगीतकार होर्हे मेंडेज यांनी आपल्या 'कोल्ड' या सुंदर चालीतील काही तुकडे वापरण्यास संमती दिल्याबद्दल पारी त्यांचे आभार मानते.
अनसुया चौधरीने टीमची करीमुल हक यांच्याशी ओळख करून दिली आणि या फिल्मसाठी स्थळ व्यवस्थापक म्हणून काम केले; मौमिता पुरोकायस्थ या फिल्मच्या ध्वनी व्यवस्थापक आहेत.
या दोघींसह, तिसरे दिग्दर्शक म्हणजे विश्व-भारती विद्यापीठ, शांतीकेतन इथले, जर्नलिझम अॅँड मास कम्युनिकेशनच्या चौथ्या सत्रातील पदव्युत्तर विद्यार्थी. त्यांची माहिती पुढीलप्रमाणे