आपल्या शाही बिछान्यात सुलतान जागेपणीच लोळत होता, त्याच्या हृदयासारखाच त्याच्या शाही राजवाड्यावरचा झेंडा जोरात फडफडत होता. एका शाही घराण्याची सत्ता संपवून तो गादीवर बसला खरा, एका मागो माग उठावांना त्याने तोंड दिलं होतं. त्याच्या शक्तीबद्दल तो ठाम होता आणि कोणतंही अस्त्र न घेता उघड्या छाताडाने तो रणांगणात उतरला होता. भक्षक श्वापदांचे कळपच्या कळप त्याने जवळ जवळ एकट्यानेच कापून काढले होते. हे तर फालतू कीटक आहेत, त्याला वाटलं होतं. पण त्याला वाटलं त्यापेक्षा ही कीड जास्तीच जोमाने पसरत होती. त्याची कल्पनाशक्ती खरंच अद्भुत होती आणि तिच्या जोरावर त्याने त्यांचा हल्ला दर वेळी परतून लावला होता. पण या डिसेंबर महिन्याचं वारं निष्ठुर होतं.

या मेटारायझीयम ॲंनीसोप्लीचा साठा वाढवायला पाहिजे. मातीतच वाढणारी ही कीडनाशक बुरशी किड्यांचा नाश करते. वरिष्ठ तज्ज्ञांच्या समितीने जाहीर केलं होतं की त्यांच्यामध्येच बुरशीचा प्रसार करून त्यांचा खातमा करणं हे स्वस्त, अधिक प्रभावी आणि दीर्घकाळ टिकणारा उपाय ठरेल. आपल्या श्रीमंत मित्रांपाशी आधीपासूनच या साठ्याची सोय केलेली आहे. आता आव्हान हे आहे की यातले तरुण कीटकांचे थवे शोधायचे आणि त्यांच्यावर या जैविक कीटकनाशकाचा फवारा करायचा.

संध्याकाळ झालीसुद्धा आणि सुलतान थकून गेला. आपलं मन काबूत रहावं, शांत व्हावं अशी त्याची मनापासून इच्छा होती. या आंदोलन करणाऱ्या टोळांच्या आरोळ्या हवेत भरून राहिल्या होत्या आणि त्या असह्य होऊ लागल्या होत्या. पण इतकंच नव्हतं. असंही काही होतं जे त्याला आतून खात होतं. त्याचा अहंकार होता का? तो खरंच घाबरला होता का? का येणारी रात्र  काय घेऊन येणार आहे याचा घोर त्याला लागला होता? आपली पकड सुटत चाललीये हे आता त्याला जाणवायला लागलं होतं का? हे अशी आत्मचिकित्सा वेदनादायी होती. त्याने बाहेर सहज एक नजर टाकली आणि आपलं मन खिडकीबाहेर मोकळं सोडलं. गडद होत चाललेल्या क्षितिजावरचा मावळता सूर्य अभद्राचे संकेत देत होता.

सुधन्वा देशपांडेंच्या आवाजात ही कविता ऐका

llustration: Labani Jangi, originally from a small town of West Bengal's Nadia district, is working towards a PhD degree on Bengali labour migration at the Centre for Studies in Social Sciences, Kolkata. She is a self-taught painter and loves to travel.
PHOTO • Labani Jangi

चित्रः लाबोनी जांगी. पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातल्या छोट्या खेड्यातली लाबोनी कोलकात्याच्या सेंटर फॉर स्टडीज इन सोशल सायन्सेसमध्ये बंगाली श्रमिकांचे स्थलांतर या विषयात पीएचडीचे शिक्षण घेत आहे. ती स्वयंभू चित्रकार असून तिला प्रवासाची आवड आहे

टोळधाड

हे कसले टोळ आहेत?
या सल्तनतीचं आसमंत
गव्हाळ रंगाने रंगवून टाकणाऱ्या
या धाडी,
आशेच्या दिशेने निघाल्या आहेत!
थबकवून टाकणाऱ्या काटेरी कुंपणांच्या
सापळ्यातून निसटून जातायात.
त्यांच्या छोट्याशा नांग्यासारखी उमेद
आडकाठ्या मोडत
त्यांना पकडून बुडवण्यासाठी खोदलेले खंदक
पार करून पुढेच.

त्यांचे नाजूक ऊर
पाण्याच्या जोरदार फवाऱ्याचा
पाऊस झेलतायत
हिवाळ्याच्या धूसर सांजेला
बोचऱ्या गार हवेत
ते थांबलेत.

सडलेल्या दवबिंदूंचा तो वास
ते मात्र थांबलेत
उजेडाच्या रम्य पहाटवेळेसाठी
डोळ्यात चमकते
क्रांतीकारी निखारे घेऊन.

ना ढोल
ना फटाके
कडुनिंबाच्या पानाचा धूरही
या पसरत चाललेल्या टोळधाडीला
घाबरवत, विचलित करत नाहीये.
न संपणाऱ्या रात्री
त्यांच्या अस्तनीत जपलेल्या
विद्रोहाच्या गाण्यांनी
हवा खळबळते
रस्ते झाकून टाकणाऱ्या
ताडपत्रीला पडतात छिद्रं
आणि महालांच्या छतांनाही
कारण टोळधाडीचा हा प्लेग
सल्तनतीला ग्रासून टाकतोय आता.

कवितेचा स्वरः सुधन्वा देशपांडे जन नाट्य मंचातील अभिनेते व दिग्दर्शक आणि लेफ्टवर्ड बुक्सचे संपादक आहेत.

अनुवादः मेधा काळे

Pratishtha Pandya

ପ୍ରତିଷ୍ଠା ପାଣ୍ଡ୍ୟା ପରୀରେ କାର୍ଯ୍ୟରତ ଜଣେ ବରିଷ୍ଠ ସମ୍ପାଦିକା ଯେଉଁଠି ସେ ପରୀର ସୃଜନଶୀଳ ଲେଖା ବିଭାଗର ନେତୃତ୍ୱ ନେଇଥାନ୍ତି। ସେ ମଧ୍ୟ ପରୀ ଭାଷା ଦଳର ଜଣେ ସଦସ୍ୟ ଏବଂ ଗୁଜରାଟୀ ଭାଷାରେ କାହାଣୀ ଅନୁବାଦ କରିଥାନ୍ତି ଓ ଲେଖିଥାନ୍ତି। ସେ ଜଣେ କବି ଏବଂ ଗୁଜରାଟୀ ଓ ଇଂରାଜୀ ଭାଷାରେ ତାଙ୍କର କବିତା ପ୍ରକାଶ ପାଇଛି।

ଏହାଙ୍କ ଲିଖିତ ଅନ୍ୟ ବିଷୟଗୁଡିକ Pratishtha Pandya
Translator : Medha Kale

ମେଧା କାଲେ ପୁନେରେ ରହନ୍ତି ଏବଂ ମହିଳା ଓ ସ୍ଵାସ୍ଥ୍ୟ କ୍ଷେତ୍ରରେ କାମ କରିଛନ୍ତି । ସେ ମଧ୍ୟ PARIର ଜଣେ ଅନୁବାଦକ ।

ଏହାଙ୍କ ଲିଖିତ ଅନ୍ୟ ବିଷୟଗୁଡିକ ମେଧା କାଲେ