पारलिंगी स्त्रियांचं मत छळापासून मुक्तीला

वाराणसीमध्ये कायदा व सुरक्षा यंत्रणा पारलिंगी स्त्रियांचे अधिकार आणि हक्कांचं रक्षण करण्यात अपयशी ठरल्या आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये या समुदायाने आपलं मत बदलाला दिलं

२६ जून २०२४ । जिग्यासा मिश्रा

रोजंदारीवरच्या श्रमिकांचं भविष्य अंधारात

४ जून २०२४ रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले त्याच्या दुसऱ्या दिवशी डाल्टनगंजच्या मजूर अड्ड्यावरच्या श्रमिकांचं भाकित म्हणजे बेरोजगारी काही कमी होणार नाहीये

११ जून २०२४ । अश्विनी कुमार शुक्ला

रोहतकच्या श्रमिकांचं मत बदलाला

शंभरेक वर्षांपूर्वी हरियाणा राज्यातल्या या तालुक्यात घडलेली ही घटना स्वातंत्र्यलढ्यात मैलाचा दगड ठरली. यंदा, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदान करताना इथले श्रमिक आपल्यासाठी महत्त्वाचे मुद्दे काय आहेत ते सांगतायत

९ जून २०२४ । आमिर मलिक

दोन देशांच्या राजकारणाची हमालांना झळ

सर्व मतदारांना एक शक्तिशाली खासदार हवा आहे जो त्यांचे मुद्दे दिल्लीत घेऊन जाऊ शकेल. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भारताच्या अतिसंवेदनशील सीमेवर काम नसलेल्या हमालांनाही आशा वाटतीये की त्यांचं मत हे काम करून दाखवेल

७ जून २०२४ । संस्कृती तलवार

ही आंदोलनं म्हणजे आमच्यासाठी जणू शाळाच!’

पंजाबच्या मानसा जिल्ह्यामधल्या किशनगढ सेधा सिंह वाला इथल्या वृद्ध महिलांसाठी २०२०-२०२१ मधलं ऐतिहासिक शेतकरी आंदोलन हे आमूलाग्र बदल घडवणारं ठरलं. यातून व्यक्त झालेला विरोध बरंच काही शिकवून गेला, २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या त्यांच्या निवडीला आकार देऊन गेला

११ जून २०२४ ।

वाराणसी जिल्ह्यात मनरेगाचा पत्ताच नाही

या मतदारसंघाने नरेंद्र मोदींना दोन वेळा निवडून दिलं आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा म्हणजेच मनरेगाखाली शासनातर्फे कामंच काढली जात नसल्याने इथल्या मतदारांची घोर निराशा आणि गरिबीतही वाढ झाली आहे

१ जून २०२४ । आकांक्षा कुमार

मतं मागायला येतात... आणि मग निघून जातात’

सरकारी योजना आणि नोकऱ्यांपासून वंचित राहिलेली अनेक आदिवासीबहुल गावं झारखंडमधल्या दुमका जिल्हयात आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात या गावांमध्ये प्रचंड असंतोष असल्याचं जाणवतंय

११ जून २०२४ । अश्विनी कुमार शुक्ला

तेव्हा देश घडवण्यासाठी मत दिलं...आज वाचवण्यासाठी देतोय’

नव्वदी पार केलेले ख्वाजा मोइनुद्दिन यांना आजही भारताच्या पहिल्या निवडणुकीत दिलेलं मत लक्षात आहे. आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी मत दिलंय. बीड जिल्ह्याचे रहिवासी असलेले मोइनुद्दिन आपल्या धर्मनिरपेक्ष लोकशाहीचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याबद्दल मोकळेपणाने बोलतात

१ जून २०२४ । पार्थ एम. एन.

आपण मत का द्यायचं?’

आपल्या लोकशाही देशात होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका एका कवयीत्रिच्या नजरेतून. यामध्ये साध्यासुध्या माणसांचे हक्क सोडून सगळ्याची चर्चा सुरू आहे

३१ मे २०२४ । मौमिता आलम

जळगावच्या कृष्णाजी भरीतच्या ' स्टार' सुगरण

वांग्याचं भरीत हा महाराष्ट्रील जळगावातला खास स्वादिष्ट पदार्थ. आता पुढचे काही दिवस १४ महिला दररोज ५०० किलो भरीत तर बनवतीलच पण सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचारातही केंद्रस्थानी असतील

२१ जून २०२४ । कविता अय्यर

पंजाबात मतदानापूर्वीच परतफेड!

२०२० साली देशाच्‍या राजधानीत आपण एक भयंकर गोष्ट पाहिली. कृषी कायद्यांविरोधात निदर्शनं करणार्‍या शेतकर्‍यांना दिल्‍लीत प्रवेश नाकारण्‍यात आला. २०२४ च्‍या लोकसभा निवडणुकीचा पंजाबमधला प्रचार टिपेला पोहोचलेला असताना तिथले शेतकरी आपल्‍या या ‘कर्जा’ची परतफेड करत आहेत, मात्र अहिंसक पद्धतीने

२६ मे २०२४ । विशव भारती

त्‍यांना अधिकारच नाही…’

संपूर्ण पंजाबमध्ये लोक म्हणतायत, शेतकरी आणि कामगार यांना भारतीय जनता पक्षाने (भाजप) जी वागणूक दिली आहे, त्‍यानंतर त्‍यांना आता या, २०२४ च्‍या लोकसभा निवडणुकांमध्ये आमच्‍याकडे मतं मागण्‍याचा अधिकारच नाही. गेल्‍या आठवड्यात लुधियानामध्ये झालेल्‍या किसान-मजदूर महापंचायतीमधला हा संदेश आहे

२५ मे २०२४ । अर्शदीप अर्शी

' कुणाला मत द्यायचं याबद्दल मी संभ्रमात आहे'

अपंग लोकांसाठी मतदान करण्याच्या तरतुदी करणारे राज्य नियम असूनही, बबलू कैबर्ता सारख्या काहींना २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये निवडणूक प्रक्रियेत भाग घेण्याबाबत खात्री वाटत नाही

२१ जून २०२४ । सर्बजया भट्टाचार्या

मत-बित राहू द्या, भाताचं बोला

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात काम करणाऱ्या माल पहाडिया बायांना त्यांचं प्राधान्य कशाला आहे हे पक्कं माहित आहे – काम, अन्न आणि मग मत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांची ही कहाणी

२३ मे २०२४ । स्मिता खटोर

स्वातंत्र्यसैनिक भबानी महातोंचं आणखी एक मतदान

भारताच्या स्वातंत्र्याचा लढा सुरू होता आणि त्या संघर्षमय काळात अनेक दशकं भबानी महातो नेटाने आणि धीराने घर सांभाळत होत्या, शेती करत होत्या, अन्न रांधत होत्या, घरच्यांना आणि अनेक क्रांतीकारकांना जेवू घालत होत्या. आज वयाच्या तब्बल १०६ व्यी वर्षी देखील त्यांचा लढा सुरूच आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी आपला मत दिलंय

२० मे २०२४ । पार्थ सारथी महातो

दामूनगरचं मत लोकशाहीला

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातल्या दामू नगरच्या रहिवाश्यांसाठी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतलं मतदान वंचितांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी आहे

१९ मे २०२४ । ज्योती शिनोळी

डी-मतदार’ – ना तळ्यात, ना मळ्यात

डाउटफुल व्होटर्स (डी मतदार) म्हणजेच संशयास्पद मतदार अशी नोंद केवळ आसाममध्ये केली जाते आणि त्यातून अनेक बंगाली भाषिक हिंदू आणि मुसलमान नागरिकांना मतदानाचा अधिकार नाकारला जातो. मर्जिना खातून अख्खं आयुष्य आसाममध्ये राहिल्या आहेत पण आजवर आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्येही त्यांना मत देता आलं नाहीये

१५ मे २०२४ । महिबुल होक

राजकारण्यांनी कधीच न पाहिलेल्या गावाची गोष्ट

सातपुड्याच्या राकट डोंगररांगांमध्ये वसलेल्या आंबापाणीमध्ये लोकशाहीचा जीव अजून पोचलेलाच नाही. आजही इथे ना रस्ते आहेत, ना वीज, ना दवाखाना पण २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये हे गाव मतदान मात्र करणार

११ मे २०२४ । कविता अय्यर

‘आमच्या गावासाठी तुम्ही काय केलंय?’

मनरेगा आणि मोफत गॅस सिलिंडर, रस्ते, हातपंप अशा सगळ्याच सरकारी योजनांना झारखंडच्या पलामू जिल्ह्यातल्या चेचरियाचा रस्ताच सापडलेला नाही. आपल्याच हलाखीमुळे वैतागून गेलेले आणि संतप्त नागरिकांच्या मते २०२४ च्या लोकसभा निवडणुका म्हणजे सर्वच गोष्टींचा विचार करण्याची संधी आहे

१३ मे २०२४ । अश्विनी कुमार शुक्ला

आम्हाला काय लागतं, काय हवंय ते विचारा ना’

गडचिरोलीतल्या घनदाट जंगलांमध्ये राहणाऱ्या आदिवासींची राहती गावं आणि संस्कृती दोन्ही इथल्या लोहखनिजाच्या खाणींनी उद्ध्वस्त केलीये. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हाच मुद्दा घेऊन इथल्या १,४५० ग्रामसभांनी आपल्या अटी-शर्तींवर काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे.

८ मे २०२४ । जयदीप हर्डीकर

रायपूरच्या वीटभट्ट्यांवर ‘वोट’ आजही कोसो दूर

काम आणि सगळ्याच परिस्थितीमुळे छत्तीसगडच्या या कामगारांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मतदानाच्या तारखा कधी आहेत हे देखील नीटसं माहीत नाही

७ मे २०२४ । पुरुषोत्तम ठाकूर

धार्मिक ध्रुवीकरणाला मळगावचं चोख उत्तर

विविध धर्मांचे लोक अनेक शतकांपासून समन्वयाने एकत्र उपासना करतात अशा प्रार्थनास्थळांवर हिंदुत्ववादी गटांकडून हल्ले वाढू लागले असताना एका गावाने अगदी ठामपणे दाखवून दिलं की एकमेकांसोबत गुण्यागोविंदाने राहणं शक्य आहे

२८ एप्रिल २०२४ । पार्थ एम. एन.

दुर्लक्षित गावाचा मतदानावर बहिष्कार

महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातल्या खडीमाळ या गावात ना नळाचं पाणी ना वीज. राजकारणी दर पाच वर्षांनी फक्त पोकळ वादे करतात आणि गायब होतात असं म्हणणाऱ्या इथल्या गावकऱ्यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकायचं ठरवलं आहे

२७ एप्रिल २०२४ । स्वरा गर्गे प्रखर दोभाल

पहिलेच महागाई डोक्यावर आहे, आता हत्ती आले’

पळसगाव या आदिवासी बहुल गावातले लोक या उन्हाळ्यात घरं धरून शांत बसलेत. जंगलात जाऊन वनोपज गोळा करायचं तर मोठंच संकट तिथे आ वासून उभं आहे. स्वतःच्या जिवाची काळजी असलेल्या या गावकऱ्यांना सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकींबद्दल कसलाही उत्साह नाही

२५ एप्रिल २०२४ । जयदीप हर्डीकर

भंडाऱ्यामध्ये अवचित आणि अघटित घटनांची मालिका

महाराष्ट्रातल्या या जिल्ह्यात तरुणांना रोजगार नाही म्हणून परराज्यात कामासाठी जावं लागतं. त्यांच्या या संघर्षात २०२४ च्या लोकसभा निवडणुकांचा विचार सगळ्यात शेवटी येतो

२३ एप्रिल २०२४ । जयदीप हर्डीकर

मोह, मनरेगा आणि स्थलांतरावर गोंदियाच्या गरिबांची मदार

देशातल्या गरिबातल्या गरिबांची मदार आजही मोह आणि तेंदूसारखं वनोपज आणि मनरेगाखाली मिळणाऱ्या रोजगारावर आहे. आज १९ एप्रिल रोजी गोंदिया मतदारसंघात लोकसभेसाठी मतदान होणार आहे पण इथल्या अरततोंडी गावातल्या आदिवासींचं म्हणणं मात्र इतकंच की गेल्या १० वर्षांत त्यांचं आयुष्य जास्तच खडतर झालंय...

१९ एप्रिल २०२४ । जयदीप हर्डीकर

पलामूमध्ये 'शेतकऱ्याची फिकीर कुणाला?'

झारखंडच्या पलामू जिल्ह्यात सततच्या दुष्काळामुळे छोटे आणि सीमांत शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकले आहेत. शेतीला पाणी देणाऱ्याला आम्ही मत देणार असं त्यांचं म्हणणं आहे

१७ एप्रिल २०२४ । अश्विनी कुमार शुक्ला

नोकरी हाच आमच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न!

२०२४ च्या लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे आणि १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे. भंडाऱ्याच्या शिवाजी स्टेडियममध्ये ग्रामीण भागातील तरुण सरकारी नोकरीच्या तयारीसाठी प्रशिक्षण घेताना दिसतात पण इथे सध्या बेरोजगारी आणि चिंतेचे वातावरण आहे. भविष्य सुरक्षित करण्यासाठी मेहनत करणाऱ्या या तरुणांसाठी निवडणुकीतील आश्वासने नाही तर नोकरी मिळणे हा प्राधान्याचा विषय आहे. '२०२४ः निवडणूक गावाकडची' या मालिकेचा हा पहिला लेख

१५ एप्रिल २०२४ । जयदीप हर्डीकर

पुसेसावळीत जीवघेण्या अफवा आणि अपप्रचार

हिंदुत्ववादी माथेफिरू महाराष्ट्रात धार्मिक ताणतणाव आणि हिंसाचार पसरवतायत. फोटोशॉप केलेल्या इमेजेस आणि अफवा पसरवायच्या आणि त्या जोरावर मुसलमानांच्या मालमत्ता लुटायला आणि जिवावर उठायला हे लोक मागेपुढे पाहत नाहीत

२७ मार्च २०२४ । पार्थ एम. एन.