तो या ‘रेन हॅट्स’ साठ रूपयांना विकत होता. पण तो म्हणाला ह्या काही त्याने बनवलेल्या नाहीत. तो फक्त एक छोटा विक्रेता होता ज्याने ती ‘शिरस्त्राणं' आणि इतर वस्तू फक्त मुळ कारागिरांकडून विकत घेतली होती. ठिकाण गंजाम आणि कंधमाळ जिल्ह्यांच्या सीमांचा भाग होता – आम्ही त्याला जून २००९ मध्ये भेटलो होतो जेव्हा पाऊस सुरूच झाला होता. प्रत्येक टोपी बांबू आणि त्यांच्या पानांपासून अत्यंत कुशलतेने विणलेली होती. कारागिरीचा अद्भुत नमुनाच होता ती टोपी. साठ रूपयांना त्या विकण्यासाठी जर तो सायकलवर बर्‍याच  अंतरावर फिरत होता म्हणजे आदिवासी लोकांकडून त्याने त्या बर्‍याच कमी दराने विकत घेतलेल्या असणार.

या टोप्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात – या हॅट्स गंजाम सहित संपूर्ण पूर्व भारतात आणि ईशान्य भारतात पालारी (आणि कालाहांडीमध्ये छतूर) म्हणून ओळखल्या जातात. पावसाच्या सुरुवातीला ओरिसात त्या घालून लोक शेतात काम करताना दिसत होते. पण ते यांचा वापर इतर ऋतुतही करतात. बहुतेक वेळा शेतकरी, मजूर, गुराखी आणि मेंढपाळही यांचा वापर करतात. माझे मित्र आण सहप्रवासी पुरूषोत्तम ठाकूर म्हणाले “ही गरीबांची छत्री आहे.” त्यांचा आकारही थोडा जुन्या छत्र्यांसारखा दिसतो. त्यांचा उद्देश आणि वापर काहीही असला तरी ते अत्यंत सुंदर पद्धतीने बनवलेल्या होत्या.

अनुवाद: अमेय फडके

पी. साईनाथ पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडिया - पारीचे संस्थापक संपादक आहेत. गेली अनेक दशकं त्यांनी ग्रामीण वार्ताहर म्हणून काम केलं आहे. 'एव्हरीबडी लव्ज अ गुड ड्राउट' (दुष्काळ आवडे सर्वांना) आणि 'द लास्ट हीरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम' (अखेरचे शिलेदार: भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ) ही दोन लोकप्रिय पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.

यांचे इतर लिखाण साइनाथ पी.
Translator : Ameya Phadke

अमेय फडके हे मुंबई स्थित पत्रकारिता प्रेमी आहेत आणि एक उत्साही कंटेट लोकलायझेशन व्यावसायिक आणि एम्फपॉसिबिलिटिजचे संस्थापक आहेत. अमेय यांनी राज्यशास्त्रात एमए (इग्नू) केलं असून सामाजिक संस्थांना सहाय्य करणं त्यांना आवडते. ते प्रजा फाउंडेशन बरोबरही काम करत आले आहेत.

यांचे इतर लिखाण Ameya Phadke