पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातलं शांतीपूर शहर कोलकात्यापासून ९० किलोमीटरवर आहे. शांतीपूर आणि आसपासची गावं त्यांच्या मऊसूत आणि सुरेख साड्यांसाठी बऱ्याच काळापासून प्रसिद्ध आहेत.
भारतभर आणि इतरही देशात हातमागाच्या कापडाची मागणी भरपूर आहे. मात्र यंत्रमागांनी निर्माण केलेली स्पर्धा आणि खालावत जाणारं उत्पन्न या आणि अशा काही कारणांमुळे देशभरातले कुशल विणकर आता टिकून राहण्यासाठी झगडत आहेत. शांतीपूरमधलेही अनेक जण आता विणकाम सोडून चरितार्थाच्या शोधात गाव सोडून गेले आहेत.




