तीन वर्षांच्या विहान कोडवतेला अजूनही वाघाच्या हल्ल्याची भीतीदायक स्वप्नं पडतात आणि तो आपल्या आईला, सुलोचनाला बिलगतो.
२०१८ साली मे महिन्यात चिमुकला विहान आपल्या वडलांबरोबर, २५ वर्षीय बीरसिंग कोडवते यांच्यासोबत मोटरसायकलवरून तेंदूची पानं गोळा करण्यासाठी गेला होता. उन्हाळ्यात मध्य भारतात अनेकांची ही मुख्य उपजीविका असते. तेंदूची पानं वाळवून नंतर बिड्या वळण्यासाठी वापरली जातात. बीरसिंग गोंड आदिवासी आहे.



