जेवणाचे डबे, पाण्याच्या बाटल्या, छत्र्या आणि स्लिपर. या वस्तू कोणाच्या असतील हे मालकाला न पाहताही तुम्ही ओळखू शकाल. जवळच कुठे तरी रानात मजूर कामाला आलेत हे समजायला तुम्हाला वेळ लागणार नाही. हे आहे ओडिशाच्या कोरापुट जिल्ह्यातलं सिंदेही गाव. शेतात कामासाठी मजूर, जास्त करून बाया आणि तरुण मुली पोट्टंगी तालुक्यातून लांबवरून चालत इथे पोचल्या आहेत. त्यांनी सोबत आणलेल्या या सगळ्या वस्तू (आणि कदाचित यात नसलेल्या इतर काही). २०१४ चा जुलै महिना होता, पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे छत्र्या. गरिबाला पायताणाचं इतकं मोल असतं की त्या वापरून झिजू नयेत किंवा मातीने भरू नयेत, याची फार दक्षता घेतली जाते. क्वचित कधी या एका डब्यातलं जेवण तीन-चार जणांत मिळून आणलेलं असतं. प्यायचं साफ पाणी कामावर मिळेलच, त्यातही एखाद्या शेतकऱ्याच्या रानात याची शाश्वती नाही. म्हणून पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या. खरिपाची पेरणी सुरू झालीये.

पी. साईनाथ पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडिया - पारीचे संस्थापक संपादक आहेत. गेली अनेक दशकं त्यांनी ग्रामीण वार्ताहर म्हणून काम केलं आहे. 'एव्हरीबडी लव्ज अ गुड ड्राउट' (दुष्काळ आवडे सर्वांना) आणि 'द लास्ट हीरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम' (अखेरचे शिलेदार: भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ) ही दोन लोकप्रिय पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.

यांचे इतर लिखाण साइनाथ पी.
Translator : Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.

यांचे इतर लिखाण मेधा काळे