जगन्नाथाची रथयात्रा संपू लागते तसं ओडिशाच्या कोरापुट जिल्ह्यातले कोंध आदिवासी नारायणपटणा गावात सण साजरा करायला येऊ लागतात. शेवटच्या दिवस म्हणजे बहुदा यात्रा – जगन्नाथाचा रथ आपल्या मंदिरात परततो तो हा दिवस. १४-१६ वयोगटातल्या या तिघी जणी उत्सवाच्या ठिकाणी मजेत हिंडतायत.

फोटोः पी. साईनाथ, २ जुलै २००९, निकॉन डी ३००

पी. साईनाथ पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडिया - पारीचे संस्थापक संपादक आहेत. गेली अनेक दशकं त्यांनी ग्रामीण वार्ताहर म्हणून काम केलं आहे. 'एव्हरीबडी लव्ज अ गुड ड्राउट' (दुष्काळ आवडे सर्वांना) आणि 'द लास्ट हीरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम' (अखेरचे शिलेदार: भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ) ही दोन लोकप्रिय पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.

यांचे इतर लिखाण साइनाथ पी.
Translator : Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.

यांचे इतर लिखाण मेधा काळे