मावळ तालुक्यातल्या राजमाची गावच्या रेणुका उंबरे सांगतात, “आता पर्यटक येतात. त्यांचं हवं नको बघायला लागतं ना. ओव्या गायला वेळच नाही राहिला”. आपलं गाव सोडून मोठ्या शहरात गेलेल्या बाईची गोष्ट त्यांच्या ओवीत येते. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने पारीवर प्रकाशित होणाऱ्या या मालिकेतलं या पुढच्या काही ओव्या