भारतात लाखो दलित हाताने मैला साफ करण्याचं काम करतात – तुंबलेली गटारं साफ करणं, सेप्टिक टँक साफ करणं आणि अजूनही बरंच. कोणतीही संरक्षक अवजारं नाहीत, सुट्ट्या नाहीत, निश्चित मजुरी नाही आणि आजारपणं व मृत्यूची टांगती तलवार कायम मानेवर. त्यासोबतच खोलवर रुजलेला सामाजिक कलंक – आणि तिकडे सरकार मात्र स्वच्छ भारत आणि ‘हागणदारी मुक्त गावां’च्या बाता करतंय. ‘सफाई’च्या कलंकाने डागाळलेल्या या नागरिकांच्या पारीवरच्या या काही कहाण्या