“नाही धनी येथ कुणी नाही चाकर... धरतीची आम्ही लेकरं, भाग्यवान. धरतीची आम्ही लेकरं.”
हे गाणं म्हणणारी मुलं आहेत एका खेडेगावातल्या शाळेतली. त्याचं गाणं आणि त्यांचं जगणं यातला विरोधाभास किती उघड आहे. शहरातल्या शाळांच्या मानाने गावातल्या शाळांना फारच तोकड्या सोयी-सुविधा, आर्थिक निधी आणि संधी दिल्या जातात. अगदीच अपुऱ्या पगारांवर नेमलेले हंगामी शिक्षक, जे शिक्षक म्हणून बिलकुल पात्र नाहीत – काही राज्यांनी तर शिक्षक पात्रता परीक्षाच रद्द केल्या आहेत जेणेकरून पूर्णपणे अपात्र लोकांना अत्यंत कमी पगारात राबवून घेता यावं. आणि काही शाळा तर अशा जिथे अनेक वर्षं कुणी शिक्षकच नाहीयेत.



