पुणे जिल्ह्यातील दापोडी गावच्या सरूबाई कडू यांनी दारिद्र्यात जीवन जगतानाही ओव्यांच्या प्रकल्पातील ५०००हून अधिक ओव्या गाऊन या प्रकल्पाला समृद्ध केलं. दोन भागांच्या त्यांच्या कहाणीपैकी या दुसऱ्या भागात त्यांनी आपल्या भूतकाळातील आनंद आणि सततची दु:खे यांच्याविषयीच्या अकरा ओव्या गाईलेल्या आहेत.
“हे काही उमर झाली म्हणून नाहीये. माझं मनच शांत नाही आणि डोकं फिरलंय. त्यामुळे मला ओव्या आठवत नाहीत.” सरुबाई कडू सांगत होत्या. जुलैचा महिना होता; ओवी प्रकल्पासाठी सर्वाधिक ओव्या गणाऱ्या गायिकेला भेटण्यासाठी आम्ही दौंड तालुक्यातील दापोडी गावात आलो आहोत. सरुबाईंनी गायिलेल्या ५०२७ ओव्या या प्रकल्पाच्या मूळ टीमने १९९६ ते २००९ या काळात लिहून काढल्यात.
त्यावेळी त्या वडवली गावात राहत होत्या.१९९३-९४मध्ये, त्यांच्या आणि इतर अनेक गावांतील घरे मोसे नदीवर बांधलेल्या वरसगाव धरणामुळे पाण्याखाली गेली. इतर अनेकांप्रमाणे सरुबाईंच्या कुटुंबाला देखील घर सोडून दौंड तालुक्यातील पुनर्वसनाच्या वसाहतींत जावं लागलं ,पुण्यापासून ८० किमी. अंतरावर.
दापोडीत आम्ही सरूबाईंना भेटलो तेव्हां त्या एका झोपडीबाहेर बसलेल्या होत्या पण आम्हाला त्यांनी आपला मुलगा दिलीप याच्या पक्क्या घराकडे नेलं. (तिथे आम्ही त्यांनी गायिलेल्या ओव्यांचे ध्वनीमुद्रण केलं. पहा Sarubai: 5000 songs and still singing).







