दामोदर नदीच्या किनारी, आमटा गावात, शेती आणा मासेमारी हे दोन प्रमुख व्यवसाय आहेत. इथल्या बाया घरून शिफॉन आणि जॉर्जेटच्या साड्यांवर खड्यांचं काम नगावर करतात. साध्या साड्यांवर त्यांनी केलेली खड्यांची नक्षी म्हणजे एक कलाविष्कारच असतो.

पश्चिम बंगालच्या ग्रामीण भागात अनेक घरांमध्ये बाया हे काम करतायत. त्यातून त्यांच्या हातात पैसा येतो, घरी हातभार लागतो आणि स्वतःच्या पायावर उभं असल्याचीही जाणीव निर्माण होते.

पश्चिम बंगालच्या दुकानांमध्ये या अशी खडे लावलेल्या साड्या २,००० रुपयांच्यापुढेच विकल्या जातात, पण या बायांना मात्र त्यातला अगदी क्षुल्लक वाटा मिळतो – एका साडीमागे २० रुपये.

Stone studded saree
PHOTO • Sinchita Maaji

मौशुमी पात्रा, आमटामधे नगावर काम करतात, शोभिवंत खड्यांनी साड्या सजवतात

२०१५-१६ साली पारी फेलोशिपचा भाग म्हणून सिंचिता माजी हिने ही गोष्ट आणि व्हिडिओ तयार केला आहे.

अनुवादः मेधा काळे

Sinchita Maji

सिंचिता माजी पारीची व्हिडिओ समन्वयक आहे, ती एक मुक्त छायाचित्रकार आणि बोधपटनिर्माती आहे. सुमन पर्बत कोलकात्याचा ऑनशोअर पाइपलाइन अभियंता आहे, सध्या तो मुंबईत आहे. त्याने दुर्गापूर, पश्चिम बंगालच्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थेतून बी टेक पदवी प्राप्त केली आहे. तोदेखील मुक्त छायाचित्रकार आहे.

यांचे इतर लिखाण सिंचिता माजी
Translator : Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.

यांचे इतर लिखाण मेधा काळे