खरा प्रश्न शेवटी मूल्यांचाच आहे. आणि ही मूल्य आमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत. आम्ही स्वतःला निसर्गाचा एक घटक समजतो. जेव्हा झगडे होतात तेव्हा ते काही सरकारच्या किंवा एखाद्या कंपनीच्या विरोधात होत नाहीत. त्यांची स्वतःची ‘भूमी सेना’ असते आणि संघर्ष असतो हाव आणि स्वार्थीपणाविरोधात.
संस्कृती वसायला लागली आणि हे सगळं सुरू झालं. सगळं म्हणजे व्यक्तीवाद वाढायला लागला, आपण स्वतःला निसर्गापासून वेगळं समजायला लागलो. आणि इथेच संघर्षाची ठिणगी पडली. एकदा का नदीशी नाळ तुटली की मग तीत सांडपाणी सोडायला, रासायनिक, औद्योगिक मैला मिसळायला आपल्याला काहीही वाटत नाही. उलट आपण नदी आपल्या मालकीचं संसाधन असल्यासारखं वागायला लागतो. एकदा का आपण स्वतःला निसर्गाहून वेगळे, वरचे मानायला लागलो की मग त्या निसर्गाची वासलात लावायला, त्यातली समृद्धी लुटायला आपण मोकळे. पण आदिवासींची मूल्य मात्र केवळ कागदावर लिहिलेली मूल्यांची यादी नाहीत. आमची मूल्यं म्हणजे आमची जगण्याची रीत आहे.
धरती का गर्भ हूं
धरती का मूल-बीज-गर्भ हूं
सूरज की अजर-अमर आग का मर्म हूं
भील, मुंडा, बोडो, गोंड, संथाली हूं
मनुष्यता का आदि हूं मैं ही वासी हूं
तुम मुझे जियो, जी भरकर जियो
मैं यहां का स्वर्ग हूं
धरती का मूल-बीज-गर्भ हूं
सूरज की अजर-अमर आग का मर्म हूं
सह्याद्री, सतपुड़ा, विंध्य, अरवल्ली हूं
हिमालय की चोटी, दक्षिण समंदर घाटी
पूर्वोत्तर का हराभरा रंग मैं ही हूं
तुम जहां जहां पेड़ काटोगे
पहाड़ों को बेचोगे
तुम मुझे बिकते हुए पाओगे
नदियों के मरने से मरता मैं ही हूं
तुम मुझे सांसों में पी सकते हो
मैं ही तुम्हारे जीवन का अर्क हूं
धरती का मूल-बीज-गर्भ हूं
सूरज की अजर-अमर आग का मर्म हूं
हो आख़िर तुम भी मेरे ही वंशज
तुम भी मेरा ही रक्त हो
लालच-लोभ-सत्ता का अंधियारा
दिखने न देता तुम्हें जग सारा
तुम धरती को धरती कहते
हम धरती को मां
नदियों को तुम नदियां कहते
वो है हमारी बहना
पहाड़ तुमको पहाड़ दिखते
वो हमको तो भाई कहता
दादा हमारा सूरज दादा मामा चंदा मामा
कहता यह रिश्ता मुझको लकीर खींच
मेरे तुम्हारे बीच
फिर भी मैं न मानता मेरा विश्वास
पिघलोगे तुम अपने आप ही
मैं गरमी सहेजता बर्फ़ हूं
धरती का मूल-बीज-गर्भ हूं
सूरज की अजर-अमर आग का मर्म हूं
वसुंधरेचा गर्भ आहे मी
वसुंधरेचं मूळ-बीज-गर्भ आहे मी
मी सूर्य, मी ऊब, ऊबदार स्पर्श, चिरंतन
मी भिल, मुंडा, बोडो, गोंड, आणि संथालही.
युगांपूर्वी जन्मलेला मी पहिला मानव,
जग मला,
भरभरून जग
या पृथ्वीवरचा स्वर्ग आहे मी
वसुंधरेचं मूळ-बीज-गर्भ आहे मी
मी सूर्य, मी ऊब, ऊबदार स्पर्श, चिरंतन
मी सह्याद्री, सातपुडा, विंध्य, अरावली
मी हिमशिखर, सागराचं दक्षिणेचं टोक मी
हिरवा कंच ईशान्य भारत मी.
झाडावर तुमची कुऱ्हाड पडते,
पर्वत विकला जातो
माझाच सौदा होतो
आणि मीच मरतो जेव्हा नदीच मारून टाकता तुम्ही
तुमच्या श्वासात मलाच घेता भरून
तुमच्या आयुष्याचं अमृत आहे मी
वसुंधरेचं मूळ-बीज-गर्भ आहे मी
मी सूर्य, मी ऊब, ऊबदार स्पर्श, चिरंतन.
शेवटी तुम्ही माझी बाळंच
माझंच रक्त तुमच्या धमन्यांत.
हाव, सत्ता आणि आकर्षणांच्या अंधारात
खरं जग दिसतच नाहीये तुम्हाला.
तुमच्यासाठी पृथ्वी केवळ पृथ्वी
आमच्यासाठी धरणीमाय
तुमच्यासाठी नदी, केवळ नदी
आमची आहे बहीण
डोंगर केवळ डोंगर
आमचे ते भाऊबंद
सूर्य आमचा आजा
आणि चांदोबा मामा.
या नात्यासाठीच आपल्यात एक सीमा आखावी, ते म्हणतात.
पण मी नाही ऐकत.
माझा विश्वास आहे, तुमचं मन पाघळेल.
उष्णता शोषून घेणारा बर्फ आहे मी
वसुंधरेचं मूळ-बीज-गर्भ आहे मी
मी सूर्य, मी ऊब, ऊबदार स्पर्श, चिरंतन.
देहवाली भिली आणि हिंदीतून इंग्रजी अनुवादः प्रतिष्ठा पंड्या