मातृभाषेत वार्तांकन आणि पारीवर प्रकाशित होणाऱ्या लेखांचे अनेक भाषांमध्ये अनुवाद असं दुपेडी काम करणारा आमचा अनोखा प्रकल्प म्हणजे पारीभाषा. पारीवरच्या प्रत्येक लेखासाठी अनुवाद ही कळीची प्रक्रिया आहे. आमच्यासोबत काम करणारे संपादक, अनुवादक आणि सेवाभावी मित्रपरिवार विभिन्न सामाजिक, सांस्कृतिक आणि भाषिक पार्श्वभूमीतून येतात आणि आपल्या अनुवादांद्वारे पारीवर प्रकाशित होणाऱ्या कहाण्या ज्यांच्या आहेत त्यांच्यापर्यत त्यांच्याच भाषेत पोचवण्याचं काम करतात.