आपली लैंगिकता, लैंगिक कल, आवड-निवड आणि आचार या सगळ्या पैलूंचा विचार करत अनेक जण आपली स्वतःची लैगिक ओळख ठरवत असतात. इंग्रजीमध्ये एलजीबीटीक्यूएआय+ अशा अक्षरसमूहाने ज्यांचा उल्लेख केला जातो ती ही माणसं म्हणजे समलिंगी, उभयलिंगी, पारलिंगी, इंटरसेक्स, क्वियर, अलैंगिक आणि इतरही विविध लैंगिक ओळख असलेली आपल्या आसपासचीच माणसं. सामाजिक स्तरावर आणि कायद्याने आपल्याला मान्यता मिळावी यासाठी त्यांचा संघर्ष सुरूच आहे. पारीवर प्रकाशित झालेल्या या काही गोष्टींमधून अगदी मूलभूत हक्कांसाठी या मित्र-मैत्रिणींना किती झगडावं लागतं ते लक्षात येतं. वैयक्तिक आयुष्यात आणि कामाच्या ठिकाणी देखील त्यांना समाजाची मान्यता, न्याय, स्वतःची ओळख प्रस्थापित करण्यासाठी सतत संघर्ष करावा लागतो. भारतभरातल्या या काही गोष्टींमधून आपल्याला या सगळ्यांचं म्हणणं ऐकायला मिळतं. आणि फक्त संघर्षच नाही तर एकट्याने किंवा सगळ्यांसोबत साजरा केलेला आनंदही
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.