पंचमहाली भिली भाषेत लिहिणारा हा कवी त्याच्या मनातलं द्वंद्व शब्दात साकारतोः पोटासाठी ज्या शहराची वाट धरली तिथल्या वेशींवरचं हलाखीचं जिणं जगायचं का आपल्या गावी परत यायचं?
गुजरातमधील दाहोदस्थित कवी वजेसिंग पारगी पंचमहाली भिली आणि गुजरातीमध्ये लिहितात. त्यांच्या कवितांचे आजवर दोन संग्रह प्रकाशित झाले आहेत, ‘झाकळ ना मोती’ आणि ‘आगियानु अजवाळुं’. त्यांनी नवजीवन प्रेससोबत दहा वर्षांहून अधिक काळ मुद्रितशोधनाचं काम केलं आहे.
See more stories
Illustration
Labani Jangi
मूळची पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातल्या छोट्या खेड्यातली लाबोनी जांगी कोलकात्याच्या सेंटर फॉर स्टडीज इन सोशल सायन्सेसमध्ये बंगाली श्रमिकांचे स्थलांतर या विषयात पीएचडीचे शिक्षण घेत आहे. ती स्वयंभू चित्रकार असून तिला प्रवासाची आवड आहे.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.