या आहेत भारताच्या कानाकोपऱ्यातल्या स्त्रियांच्या प्रजनन आरोग्याचे विविध पैलू उलगडून दाखवणाऱ्या पारीवरच्या कहाण्या – मूल नसल्याचा कलंक, केवळ स्त्रियांच्या नसबंदीवरचा भर, कुटुंब नियोजनामध्ये पुरुषांचा ‘नसलेला’ सहभाग, ग्रामीण भागातल्या अपुऱ्या आरोग्य सेवा ज्या आजही अनेकांपासून कोसो दूर आहेत, अप्रशिक्षित, भोंदू आरोग्यदाते आणि जीवघेणी बाळंतपणं, मासिक पाळीमुळे होणारा भेदभाव आणि मुलग्याचा हव्यास – आणिही अनेक. आरोग्यासंबंधीचे अनेक सारे पूर्वग्रह आणि प्रथा, लोक आणि समुदाय, लिंगभाव आणि अधिकार सोबत ग्रामीण भागातल्या स्त्रियांचे रोजचे संघर्ष आणि क्वचितच चाखायला मिळणारा जिंकल्याचा आनंद