भारतभर, गेली कित्येक दशकं लोक महामार्ग, धरणं, वीज प्रकल्प, खाणी आणि इतर प्रकल्पांमुळे तसंच नैसर्गिक आपत्तीमुळे विस्थापित झाले आहेत. त्यांची घरं, उपजीविका हिरावल्या गेल्या आहेत, पुरेशी नुकसान भरपाई मिळालेली नाही आणि त्यांची काही चूक नसताना त्यांना जबरदस्ती आयुष्य नव्याने उभारण्याचं आव्हान पेलावं लागलं आहे – कसं ते पारीवरच्या या काही कहाण्या सांगतील
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.