सागाची नवी लागवड, वनातून हकालपट्टी आणि जमिनीचे पट्टे नाहीत –गेल्या आठवड्यात दिल्लीत जमलेल्या आदिवासी महिला अशा अनेक विषयांवर बोलल्या आणि वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीची त्यांनी मागणी केली. वन हक्क कायद्याच्या विरोधात असणाऱ्या एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा अपेक्षित आहे