भारताच्या उत्तरेकडच्या सीमाप्रदेशातल्या पारीवरच्या या काही कहाण्याः यांमध्ये तुम्हाला भेटतील लडाखचे पशुपालक, वातावरणीय बदलांचा सामना करणारे लोक, पर्वतांमधले रस्ते बांधणारे स्थलांतरित मजूर आणि उंच शिखरांमध्ये राहणारा एक विणकर. तुम्ही पहाल कारगिलमधली स्त्रियांनी चालवलेली बाजारपेठ, युद्धाच्या जखमा मिरवणारी किंवा आता संग्रहालय असलेली ताबारेषेजवळची एक वस्ती. काश्मीरमधले परंपरागत रंगरेज आणि बडगम मधल्या व्यथा, नक्की वाचा आणि पहा
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.