भारतभरात नद्या आणि जनजीवन हातात हात घालून जातात – नद्यांना पूर येतो, त्या कोरड्या पडतात, त्यांच्यावर बांधलेल्या धरणांमुळे लाखो लोक विस्थापित होतात. नदी म्हणजे व्यापाराचा मार्ग असतो, दळणवळणाचं साधन, स्थलांतराची वाट आणि इतरही बरंच काही असते. या आहेत पारीवरच्या नद्यांच्या काही मोजक्या कहाण्या – कोसी, मुरी गंगा, गोदावरी, ब्रह्मपुत्र आणि इतरही अनेकींच्या
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.