मध्य प्रदेशच्या जबलपूरचे संवादिनी म्हणजेच पेटी दुरुस्त करणारे काही पिढीजात कारागीर टाळेबंदीमुळे गेले दोन महिने महाराष्ट्राच्या रेणापूरमध्ये अडकून पडले आहेत. अत्यंत दुर्मिळ असं कसब असणाऱ्या या कारागिरांनी या परिस्थितीचा कसा सामना केला, हे ते पारीला सांगत आहेत