कोविड देशात शिरण्याच्या थोडंच आधी गँगरीनने प्रतिभा हिलीम यांची चारही अंगं नेली... दोन हात आणि दोन पाय. पण महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातल्या या आदिवासी शिक्षिकेने हार मानली नाही. ‘ऑनलाइन’ शिकण्याची शक्यताच नसलेल्या आपल्या गावातल्या मुलांना प्रतिभा आज आपल्या घरी शिकवत आहेत...
वैशाली रोडे मुक्त पत्रकार आणि लेखक असून तिने मराठी वृत्तपत्रांमध्ये पत्रकारिता केली आहे. तिने शब्दांकन केलेल्या ‘मी हिजडा मी लक्ष्मी’ या आत्मकथेचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.