२९-३० नोव्हेंबर रोजी दिल्लीत झालेल्या मोर्चामध्ये शेतकरी, शेतमजूर आणि मध्यम वर्गातल्या काही जणांनाही एकत्र आणलं आणि सगळ्यांच्या मुखी एकच मागणी होती – शेतीवरील अरिष्टावर चर्चा करण्यासाठी संसदेचं २१ दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं. या धोरणनिर्मित अरिष्टामुळे ३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे तर लाखोंना हलाखीत लोटलं आहे. संसदेच्या या विशेष अधिवेशनात कर्ज आणि रास्त भावावर तसंच महा जल संकट, भूसुधार, स्त्रिया, दलित आणि आदिवासी शेतकऱ्यांचे अधिकार आणि इतरही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल. दिल्लीतील मोर्चा हा मैलाचा दगड ठरला, मात्र तो काही समारोप नव्हता. पुढे फार मोठा पल्ला गाठायचाय. पारीचा हा सविस्तर वृत्तांत नक्की वाचा
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.