एक लाखांहून जास्त ओव्यांचा हा अद्वितिय असा संग्रह आहे. महाराष्ट्राच्या गावपाड्यातल्या बायांनी गायलेल्या या ओव्या, काही ध्वनिमुद्रित केलेल्या, काही लिहून घेतलेल्या. त्या ओव्यांचे अनुवाद आणि त्या गाणाऱ्या बायांच्या कहाण्या. ओवीचे अनेक पैलू दाखवणाऱ्या या लेखांचा संग्रह म्हणजे ही लेखमाला. आपल्या रोजच्या जगण्याबद्दल, पुरुषसत्ता, जात, संतकवी, इतिहासातल्या अनेक घटना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे थोर पुरुष आणि इतरही विषयांवरच्या ओव्या ऐका आणि वाचा