भारतभरातल्या गावखेड्यात लाखो लोकांसाठी गुरं आणि जितराब हे उपजीविकांचे स्रोत आहेत आणि जेव्हा बाकी कमाई आटते तेव्हा हेच पशुधन त्यांच्यासाठी विम्यासारखं काम करतं. पारीवरच्या या काही गोष्टींमधून हे जितराब कसं सांभाळलं जातं, जतन केलं जातं, साजरं केलं जातं ते तर समजतंच पण दुष्काळ, वाघाचे हल्ले आणि सरकारी बंदी त्यांच्या कशी मुळावर उठलीये ते वाचा