सुरक्षिततेच्या साधनांशिवाय आणि कामाचा मोबदला वेळेवर मिळत नसूनही महाराष्ट्रातल्या उस्मानाबाद जिल्ह्यात कोविड-१९चा प्रसार रोखण्यासाठी आशा कार्यकर्त्या अथक काम करीत आहेत. सोबतच आघाडीच्या आरोग्य सेविका म्हणून आपल्या नेहमीच्या जबाबदाऱ्याही त्यांना पार पाडाव्या लागत आहेत