उत्तर प्रदेशातील आशा: 'आम्ही फुकटचे नोकर वाटलो काय?'
कुठल्याही लेखी आदेशाविना उत्तर प्रदेशातील आशा कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणुकीचं जोखमीचं काम सोपवण्यात आलं. त्यामुळे तुटपुंज्या पगारावर राबणाऱ्या आशांवर पुन्हा एकदा बिकट, खरंतर जीवघेणी परिस्थिती ओढवली.