लोकांना रेशन, अपंगत्व पेन्शन, मनरेगाची मजुरी, शिष्यवृत्ती आणि इतरही अनेक लाभ नाकारले जाण्याच्या या पारीवरच्या काही कहाण्या. का तर यूडाईने त्यांची नावं चुकीची लिहिली आहेत, त्यांच्या बोटांच्या ठशांमध्ये घोळ घालून ठेवले आहेत किंवा इतरही अशाच अनेक अडचणी आल्या आहेत म्हणून.
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.