तमिळनाडूच्या उत्तरेला तिरुवल्लुर जिल्ह्यातच्या किनारी भागात गावांची राखण करणारा देव म्हणजे कन्नीसामी. आणि तो दिसतोही तसाच. मच्छीमार समाजातलाच भासावा असा. त्याचा पोषाखही तसाच. एकदम भडक रंगाचा सदरा आणि वेटी, डोक्यावर टोपीसुद्धा. दर्यावर जाण्याआधी सगळं आलबेल असावं म्हणून मच्छीमार त्याला पूजतात.

मच्छीमार कुटुंबं कन्नीसामीची वेगवेगळ्या अवतारात पूजा करतात आणि चेन्नईच्या उत्तरेपासून ते पुळवेलकाडुच्या भागात तो एकदम लोकप्रिय देव आहे.

एन्नर कुप्पम गावातले मच्छीमार सात किलोमीटर प्रवास करून अतिपट्टुला येतात आणि कन्नीसामीच्या मूर्ती घेऊन जातात. जूनमध्ये भरणारा ही जत्रा चांगली आठवडाभर साजरी केली जाते. २०१९ साली मी या गावातल्या मच्छीमारांसोबत हा प्रवास केला. आम्ही चेन्नईच्या उत्तरेला औष्णिक विद्युत प्रकल्पाजवळच्या कोसस्थलैयार नदीकिनारी उतरलो आणि तिथून अतिपट्टु गावी चालत गेलो.

एका दुमजली बैठ्या घरापाशी पोचलो तर तिथे ओळीने कन्नासामीच्या मूर्ती मांडून ठेवलेल्या होत्या. सगळ्यांना पांढरं वस्त्र गुंडाळलेलं होतं. चाळिशी पार केलेला, पांढरा सदरा आणि वेटी नेसलेला, कपाळावर तिरुनीर [विभूती] लावलेला एक गृहस्थ तिथे उभा होता. सगळ्या मूर्तींपुढे त्याने कापूर पेटवला. त्यानंतर त्याने त्या मूर्तींची पूजा केली आणि मग एकेक मूर्ती एकेका मच्छीमाराच्या खांद्यावर ठेवली.

Dilli anna makes idols of Kannisamy, the deity worshipped by fishing communities along the coastline of north Tamil Nadu.
PHOTO • M. Palani Kumar

दिल्ली अण्णा कन्नीसामीच्या मूर्ती तयार करतात. तमिळनाडूच्या उत्तरेकडच्या किनारी भागात हा अगदी लोकप्रिय देव आहे

दिल्ली अण्णांना भेटण्याची ही माझी पहिलीच वेळ. पण त्यांच्याशी जास्त काही बोलायला बिलकुल वेळ नव्हता. मच्छीमारांनी खांद्यावर मूर्ती घेतल्या आणि मी त्यांच्यासोबत परतलो. चार किलोमीटर चालत कोसस्थलैयार नदीच्या काठावर यायचं आणि तिथून बोटीने तीन किमी प्रवास करून एन्नूर कुप्पमला परत.

गावी पोचल्यावर हे मच्छीमार देवळापाशी सगळ्या मूर्ती ओळीने मांडून ठेवतात. पूजा आणि इतर विधींसाठी लागणारं सगळं साहित्य त्यांच्यापुढे मांडून ठेवलं जातं. दिवस मावळला की दिल्ली अण्णा कुप्पमला येतात. गावकरी या मूर्तींभोवती गोळा होतात. दिल्ली अण्णा मूर्तीवरचं सफेद वस्त्र काढून घेतात. माइ म्हणजेच काजळाने कन्नीसामीचे डोळे चितारतात. त्यानंतर ते तोंडानेच कोंबड्याची मान उतरवतात. असं केल्याने नजर लागत नाही असा समज आहे.

त्यानंतर कन्नीसामींच्या या मूर्ती गावाच्या वेशीपाशी नेल्या जातात.

एन्नोरेच्या किनारी आणि खारफुटीच्या प्रदेशाने मला कित्येकांच्या संपर्कात आणलं आहे. दिल्ली अण्णा त्यातलेच एक. त्यांनी त्यांचं अख्खं आयुष्य या कन्नीसामीच्या मूर्ती घडवण्यासाठी अर्पण केलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मी दिल्ली अण्णांना भेटायला [२०२३ साली] मे महिन्यात त्यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा त्यांच्या कपाटात कुठल्याही घरगुती वापराच्या किंवा शोभेच्या वस्तू नव्हत्या. फक्त मातीचे गोळे, पेंढा आणि मूर्ती. घरभर मातीचा सुगंध भरून राहिला होता.

कन्नीसामीची मूर्ती करण्यासाठी सुरुवातीला गावाच्या वेशीवरची मूठभर माती बाकी मातीत मिसळावी लागते. “असं केल्याने देवाची सगळी शक्ती त्या गावाला मिळते असं मानतात,” ४४ वर्षीय दिल्ली अण्णा सांगतात. “गेल्या किती तरी पिढ्यांपासून आमचं कुटुंबच कन्नीसामीच्या मूर्ती घडवतंय. माझे वडील होते तेव्हा मला या सगळ्यात बिलकुल रस नव्हता. २०११ साली ते वारले. त्यानंतर आमचे सगळे लोक मला म्हणू लागले की वडलांनंतर आता मीच हे काम करावं लागणार... म्हणून मी आज हे काम करतोय. दुसरं कुणी नाहीच आहे.”

The fragrance of clay, a raw material used for making the idols, fills Dilli anna's home in Athipattu village of Thiruvallur district.
PHOTO • M. Palani Kumar

दिल्ली अण्णांच्या घरभर फक्त मातीचा सुगंध भरून राहिलाय. तिरुवल्लुर जिल्ह्याच्या अतिपट्टु गावी ते राहतात

Dilli anna uses clay (left) and husk (right) to make the Kannisamy idols. Both raw materials are available locally, but now difficult to procure with the changes around.
PHOTO • M. Palani Kumar
Dilli anna uses clay (left) and husk (right) to make the Kannisamy idols. Both raw materials are available locally, but now difficult to procure with the changes around.
PHOTO • M. Palani Kumar

दिल्ली अण्णा कन्नीसामींच्या मूर्ती घडवण्यासाठी माती आणि पेंढा वापरतात. दोन्ही गोष्टी जवळपासच मिळतात. पण सभोवताली होत असलेल्या बदलांमुळे ते आता सोपं राहिलेलं नाही

दहा दिवसांमध्ये दिल्ली अण्णा दहा मूर्ती पूर्ण करू शकतात. एकाच वेळी सगळ्या मूर्तींवर काम सुरू असतं. एका वर्षभरात ते सुमारे ९० मूर्ती बनवू शकतात. “एक मूर्ती पूर्ण करायला १० दिवसांचं काम लागतं. सुरुवातीला माती फोडून घ्यायची, त्यातले खडेबिडे काढून टाकायचे. त्यानंतर त्यात पेंढा मिसळायचा,” दिल्ली अण्णा सांगतात. पेंढ्यामुळे मूर्ती मजबूत होते त्यामुळे तो एक थर मूर्तीमध्ये असतो.

“अगदी सुरूवातीपासून ते मूर्ती तयार होईपर्यंत मला एकट्यालाच सगळं काम करावं लागतं. हाताखाली कुणाला ठेवण्याइतके पैसे माझ्यापाशी नाहीत,” ते सांगतात. “आणि सगळं काम सावलीत करावं लागतं. कारण उन्हात माती चिकटत नाही आणि मूर्ती फुटते. मूर्ती तयार झाल्या की त्या भट्टीत भाजाव्या लागतात. सगळे मिळून १८ दिवस लागतात.”

दिल्ली अण्णा अतिपट्टुच्या पंचक्रोशीतल्या अनेक गावांना मूर्ती पुरवतात. एन्नूर कुप्पम, मुगतिवरा कुप्पम, तळनकुप्पम, कट्टुकुप्पम, मेट्टुकुप्पम, पलतोट्टीकुप्पम, चिन्नकुप्पम आणि पेरियकुप्पम.

देवाची जत्रा असते तेव्हा या गावातले लोक कन्नीसामींच्या मूर्ती गावाच्या वेशीपाशी वाहतात. बहुतेकांना देवाची मूर्ती हवी असली तरी काहींना देवीची मूर्ती वहायची असते. पापती अम्मन, बोम्मती अम्मन, पिचइ अम्मन अशी वेगवेगळी नावं आहेत या देवतांची. काहींना देव घोड्यावर किंवा हत्तीवर आरुढ झालेला हवा असतो. आणि काहींना देवाशेजारी कुत्रा देखील हवा असतो. असं मानलं जातं की रात्री देव येतात आणि खेळ खेळतात. दुसऱ्या दिवशी सकाळी मूर्तीच्या पायाला चीर गेलेली दिसते ती त्यामुळेच.

“काही गावांमध्ये दर वर्षी नवे कन्नीसामी वाहिले जातात. काही ठिकाणी दर दोन वर्षांनी आणि काही ठिकाणी दर चार,” दिल्ली अण्णा सांगतात.

Dilli anna preparing the clay to make idols. 'Generation after generation, it is my family who has been making Kannisamy idols'.
PHOTO • M. Palani Kumar

दिल्ली अण्णा मूर्ती बनवण्यासाठी माती कालवून घेतायत. ‘गेल्या कित्येक पिढ्यांपासून माझं कुटुंबच या कन्नीसामीच्या मूर्ती घडवतंय’

The clay is shaped into the idol's legs using a pestle (left) which has been in the family for many generations. The clay legs are kept to dry in the shade (right)
PHOTO • M. Palani Kumar
The clay is shaped into the idol's legs using a pestle (left) which has been in the family for many generations. The clay legs are kept to dry in the shade (right)
PHOTO • M. Palani Kumar

पायाचा आकार देण्यासाठी एका लाकडी दांड्याचा वापर केला जातो. गेल्या कित्येक पिढ्यांपासून हाच दांडा वापरला जातोय. सावलीत सुकायला ठेवलेले पाय

या गावांमधून आणि मच्छिमारांकडून मूर्तींची मागणी जरी कमी झाली नसली तरी दिल्ली अण्णांना सतत घोर लागून असतो की गेल्या तीस वर्षांपासून ते ही परंपरा अखंडपणे जपतायत, ती त्यांच्यानंतर पुढे कोण सुरू ठेवेल. त्यांनाही हे आताशा परवडेनासं झालंय. “आजकाल किंमती वाढल्या आहेत... मी जर त्याचा सगळा हिशोब करून किंमत सांगितली तर ते मलाच विचारतात की मी इतके पैसे का मागतोय म्हणून. पण यात कष्ट किती आहेत ते फक्त आम्हालाच माहितीये.”

चेन्नईच्या उत्तरेकडच्या किनाऱ्यांवर औष्णिक विद्युत प्रकल्पांची संख्या वाढल्यापासून जमिनीच्या पोटातलं पाणी जास्तीत जास्त खारं व्हायला लागलं आहे. त्यामुळे इथे शेती कमी कमी होत चाललीये, परिणामी मातीच्या गुणवत्तेवरही परिणाम झाला आहे. “आजकाल मला कुठेही चिकणमाती मिळत नाही,” दिल्ली अण्णा सांगतात. त्यांना आता कच्चा माल शोधण्यासाठी पायपीट करावी लागते.

माती विकत घेणं महाग पडतं, ते सांगतात आणि म्हणतात, “मी माझ्या घराशेजारी खड्डा खणतो आणि त्यानंतर त्यात रेती भरून टाकतो.” रेती मातीहून स्वस्त असल्याचंही ते सांगतात.

अतिपट्टुमधले ते एकमेव मूर्तीकार असल्याने पंचायतीच्या परवानगीने सार्वजनिक ठिकाणी खड्डा खणून माती काढणं त्यांच्यासाठी अवघड होतं. “माझ्यासारखी अजून १०-२० कुटुंबं मूर्तीकाम करत असती तर आम्ही तळ्याच्या काठी खणण्याची परवानगी काढू शकलो असतो. पंचायतीनेच आम्हाला फुकटात माती घेऊ दिली असती. पण इथे मी एकटाच मूर्ती बनवतो, त्यामुळे एकट्यासाठी असं काही मागणी करणं शक्य होत नाही. त्यामुळे मी माझ्या घराच्या आसपासची माती काढतो.”

दिल्ली अण्णांना लागणारा पेंढाही आता सहज मिळत नाही कारण भाताची काढणी आता हाताने होत नाही. “यंत्राने काढणी केली की फारसा पेंढा राहत नाही. पेंढा असला तर काम होणार, नाही तर नाही,” ते सांगतात. “मी शोधातच असतो, ज्याच्या शेतात मजुरांनी भातं काढली असतील तिथून मी पेंढा घेऊन येतो. आजकाल मी फुलदाण्या आणि चुली बनवणं बंद केलंय. खरं तर त्याला मागणी जास्त आहे. पण त्या गोष्टी आताशा करणं होत नाही.”

The base of the idol must be firm and strong and Dilli anna uses a mix of hay, sand and clay to achieve the strength. He gets the clay from around his house, 'first, we have to break the clay, then remove the stones and clean it, then mix sand and husk with clay'.
PHOTO • M. Palani Kumar

मूर्तीचे पाय आणि खालचा भाग मजबूत असावा लागतो त्यामुळे दिल्ली अण्णा माती, रेती आणि पेंढा एकत्र कालवतात. माती त्यांना घराच्या आजूबाजूला मिळते, ‘आधी माती फोडून घ्यावी लागते, त्यानंतर त्यातले खडेबिडे वेचून काढावे लागतात. मग त्यात रेती आणि पेंढा कालवावा लागतो’

The idol maker applying another layer of the clay, hay and husk mixture to the base of the idols. ' This entire work has to be done in the shade as in in direct sunlight, the clay won’t stick, and will break away. When the idols are ready, I have to bake then in fire to get it ready'
PHOTO • M. Palani Kumar
The idol maker applying another layer of the clay, hay and husk mixture to the base of the idols. ' This entire work has to be done in the shade as in in direct sunlight, the clay won’t stick, and will break away. When the idols are ready, I have to bake then in fire to get it ready'
PHOTO • M. Palani Kumar

मूर्तीचे पाय आणि खालच्या भागाला माती, पेंढा आणि रेतीच्या मिश्रणाचा लेप दिला जातो. ‘हे सगळं काम सावलीतच करावं लागतं, उन्हात मातीला भेगा पडतात आणि माती चिकटून राहत नाही आणि मूर्ती बनत नाही. मूर्ती तयार झाली की ती भट्टीत भाजावी लागते’

त्यांच्या कमाईचं गणित ते सांगतात. “एका मूर्तीचे मला गावात २०,००० रुपये मिळतात. पण सगळा खर्च वगळता हातात फक्त ४,००० येतात. मी चार गावांसाठी मूर्ती बनवल्या तर मला १६,००० रुपये मिळतात.”

अण्णांना फक्त उन्हाळ्यात, फेब्रुवारी ते जुलै या काळात हे काम करता येतं. आडि (जुलै) महिन्यात जत्रा सुरू होतात तेव्हा लोक मूर्ती घ्यायला येऊ लागतात. “मी सहा-सात महिने कष्टाने या मूर्ती बनवतो. एका महिन्यात त्या विकल्या जातात. पुढचे सहा महिने कसलीही कमाई नसते. मूर्ती विकल्या जातात तेव्हाच फक्त पैसे मिळतात.” दिल्ली अण्णा सांगतात की ते दुसरं कुठलंही काम करत नाहीत आणि शोधतही नाहीत.

त्यांचा दिवस सुरू होतो सकाळी ७ वाजता आणि सलग आठ तास त्यांचं काम सुरू असतं. मूर्ती सुकत असतात तेव्हा त्यांना बारीक लक्ष ठेवावं लागतं नाही तर त्या तुटू शकतात. त्यांच्या कलेप्रती त्यांची निष्ठा किती आहे ते त्यांनीच सांगितलेल्या एका प्रसंगातून कळून येतं. ते सांगतात, “एका रात्री मला श्वासच घेता येत नव्हता आणि खूप त्रास झाला. सकाळी उठल्यावर मी तसाच सायकल चालवत दवाखान्यात गेलो. तिथे डॉक्टरांनी ग्लुकोज [सलाइन] चढवलं. मग माझ्या भावाने मला काही तरी तपासणी करण्यासाठी म्हणून दुसऱ्या दवाखान्यात नेलं. तिथल्या लोकांनी सांगितलं की स्कॅन थेट रात्री ११ वाजता होईल म्हणून.” पण दिल्ली अण्णा स्कॅन न करताच घरी परतले, कारण “माझ्या मूर्तींकडे कोण पाहणार?” त्यांचा प्रश्न.

सुमारे तीस वर्षांपूर्वी कट्टुपल्ली गावाच्या चेपक्कम पाड्यावर दिल्ली अण्णांच्या कुटुंबाची चार एकर जमीन होती. “तेव्हा माझं घर चेपक्कम गणेश मंदिरापाशी सिमेंट फॅक्टरीजवळ माझं घर होतं. शेती करणं सोपं जावं म्हणून आम्ही आमच्या जमिनीपाशीच घर बांधलं होतं”

A mixture of clay, sand and husk. I t has become difficult to get clay and husk as the increase in thermal power plants along the north Chennai coastline had turned ground water saline. This has reduced agricultural activities here and so there is less husk available.
PHOTO • M. Palani Kumar

माती, रेती आणि पेंढ्याचा काला. चेन्नईच्या उत्तरेकडच्या किनारी भागात औष्णिक विद्युत प्रकल्पांची संख्या वाढल्यामुळे जमिनीच्या पोटातलं पाणी खारं झालं आहे. त्यामुळे त्या भागातली शेती कमी होत चाललीये. त्याचा परिणाम म्हणजे भाताचा पेंढा मिळेनासा झाला आहे

Dilli anna applies an extra layer of the mixture to join the legs of the idol. His work travels to Ennur Kuppam, Mugathivara Kuppam, Thazhankuppam, Kattukuppam, Mettukuppam, Palthottikuppam, Chinnakuppam, Periyakulam villages.
PHOTO • M. Palani Kumar

मूर्तीचे पाय पक्के चिकटावे यासाठी मातीच्या मिश्रणाचा जास्तीचा थर दिला जातो. त्यांनी बनवलेल्या मूर्ती एन्नूर कुप्पम, मुगतिवरा कुप्पम, तळनकुप्पम, कट्टुकुप्पम, मेट्टुकुप्पम, पलतोट्टीकुप्पम, चिन्नकुप्पम आणि पेरियकुप्पम या गावांमध्ये जातात

“आम्ही चार भावंडं आहोत पण एकटा मीच हे काम करतोय. माझं लग्न पण झालं नाहीये. इतक्या कमाईत घर किंवा एखादं मूल कोण कसं काय सांभाळू शकेल?” ते विचारतात. त्यांनी दुसरं कुठलं काम सुरू केलं तर मच्छीमार समाजासाठी या मूर्ती कोण बनवेल याचीच दिल्ली अण्णांना चिंता आहे.

मूर्ती तयार करणं म्हणजे दिल्ली अण्णांसाठी फक्त एक व्यवसाय नाहीये. त्यांच्यासाठी तो सोहळा आहे. त्यांना आठवतंय की त्यांच्या वडलांच्या काळात एक मूर्ती ८००-९०० रुपयांना विकली जात होती. जे कुणी मूर्ती घ्यायला यायचं त्यांना जेवू घातलं जायचं. “लगीनघर असावं तसा सोहळा असायचा,” ते सांगतात.

भाजताना मूर्तीला चिरा जाऊ नयेत इतकीच त्यांची इच्छा असते. आणि त्या तशा भाजून निघाल्या की ते अगदी खूष होतात. “मी मूर्ती बनवत असतो ना तेव्हा मला सतत असं वाटत राहतं की कुणी तरी माझ्यासोबत आहे. कधी कधी वाटतं मी या मूर्तींशी बोलतोय. आयुष्यात किती कठीण काळ आला तेव्हा या मूर्तीच माझ्यासोबत होत्या ना. आता एकच घोर लागलाय...माझ्यानंतर या मूर्ती कोण बनवेल बरं?”

‘This entire work has to be done in the shade as in direct sunlight, the clay won’t stick and will break away,' says Dilli anna.
PHOTO • M. Palani Kumar

‘हे सगळं काम सावलीत करावं लागतं कारण उन्हात माती चिकटत नाही आणि मूर्ती तुटून जातात,’ दिल्ली अण्णा सांगतात


Left: Athipattu's idol maker carrying water which will be used to smoothen the edges of the idols; his cat (right)
PHOTO • M. Palani Kumar
Left: Athipattu's idol maker carrying water which will be used to smoothen the edges of the idols; his cat (right)
PHOTO • M. Palani Kumar

डावीकडेः मूर्तींवरून पाण्याचा हात फिरवावा लागतो त्यामुळे दिल्ली अण्णा पाणी घेऊन येतायत. उजवीकडेः त्यांचं मांजर


The elephant and horses are the base for the idols; they are covered to protect them from harsh sunlight.
PHOTO • M. Palani Kumar

हत्ती किंवा घोडे या मूर्तींचा पाया आहेत. उन्हापासून रक्षण व्हावं म्हणून ते इथे झाकून ठेवले आहेत


Dilli anna gives shape to the Kannisamy idol's face and says, 'from the time I start making the idol till it is ready, I have to work alone. I do not have money to pay for an assistant'
PHOTO • M. Palani Kumar
Dilli anna gives shape to the Kannisamy idol's face and says, 'from the time I start making the idol till it is ready, I have to work alone. I do not have money to pay for an assistant'
PHOTO • M. Palani Kumar

दिल्ली अण्णा कन्नीसामीच्या मूर्तीच्या चेहऱ्याला आकार देतायत. ते म्हणतात, ‘मूर्तीचं काम सुरू झाल्यापासून ती पूर्ण होईपर्यंत मला एकट्यालाच काम करावं लागतं. हाताखाली कुणी कामाला ठेवावं इतके पैसे माझ्यापाशी नाहीत’

The idols have dried and are ready to be painted.
PHOTO • M. Palani Kumar

मूर्ती आता सुकल्या आहेत आणि रंग द्यायला तयार आहेत


Left: The Kannisamy idols painted in white.
PHOTO • M. Palani Kumar
Right: Dilli anna displays his hard work. He is the only artisan who is making these idols for the fishing community around Athipattu
PHOTO • M. Palani Kumar

डावीकडेः कन्नीसामीच्या मूर्ती सफेद रंगात रंगवल्या जातात. उजवीकडेः दिल्ली अण्णा त्यांनी घडवलेल्या मूर्ती दाखवतायत. अतिपट्टूच्या पंचक्रोशीत मच्छीमार समाजासाठी मूर्ती बनवण्याचं काम करणारे दिल्ली अण्णा एकटेच आहेत


Dilli anna makes five varieties of the Kannisamy idol
PHOTO • M. Palani Kumar

दिल्ली अण्णा कन्नीसामींच्या पाच प्रकारच्या मूर्ती बनवतात


The finished idols with their maker (right)
PHOTO • M. Palani Kumar
The finished idols with their maker (right)
PHOTO • M. Palani Kumar

तयार मूर्ती आणि सोबत मूर्तीकार दिल्ली अण्णा

Dilli anna wrapping a white cloth around the idols prior to selling
PHOTO • M. Palani Kumar

विक्री करण्याआधी मूर्ती सफेद वस्त्रात गुंडाळल्या जातात


Fishermen taking the wrapped idols from Dilli anna at his house in Athipattu.
PHOTO • M. Palani Kumar

अतिपट्टूच्या दिल्ली अण्णांच्या घरून कापडात गुंडाळलेल्या मूर्ती घरी न्यायला आलेले मच्छीमार


Fishermen carrying idols on their shoulders. From here they will go to their villages by boat. The Kosasthalaiyar river near north Chennai’s thermal power plant, in the background.
PHOTO • M. Palani Kumar

आपल्या खांद्यावर मूर्ती घेऊन जाणारे मच्छीमार. इथून ते नावेने या मूर्ती आपल्या गावी घेऊन जातील. मागे चेन्नईच्या उत्तरेला असलेल्या औष्णिक विद्युत प्रकल्पाजवळची कोसस्थलैयार नदी

Crackers are burst as part of the ritual of returning with Kannisamy idols to their villages.
PHOTO • M. Palani Kumar

कन्नीसामी मूर्ती घेऊन लोक गावी परतले की फटाके फोडले जातात


Fishermen carrying the Kannisamy idols onto their boats.
PHOTO • M. Palani Kumar

मच्छीमार होड्यांमधून कन्नीसामी मूर्ती घेऊन जाताना


Kannisamy idols in a boat returning to the village.
PHOTO • M. Palani Kumar

गावी परतणाऱ्या होड्यांमधून कन्नीसामी मूर्ती आणल्या जातात


Fishermen shouting slogans as they carry the idols from the boats to their homes
PHOTO • M. Palani Kumar

होडीमधून उतरवून कन्नीसामीच्या मूर्ती खांद्यावरून गावात नेत असताना वेगवेगळ्या घोषणा दिल्या जातात


Dilli anna sacrifices a cock as part of the ritual in Ennur Kuppam festival.
PHOTO • M. Palani Kumar

रिवाज म्हणून एन्नूर कुप्पम जत्रेमध्ये देवाला कोंबडा चढवला जातो


Now the idols are ready to be placed at the borders of the village.
PHOTO • M. Palani Kumar

आता या मूर्ती गावाच्या वेशीपाशी बसवायला एकदम तयार आहेत


M. Palani Kumar

ಪಳನಿ ಕುಮಾರ್ ಅವರು ಪೀಪಲ್ಸ್ ಆರ್ಕೈವ್ ಆಫ್ ರೂರಲ್ ಇಂಡಿಯಾದ ಸ್ಟಾಫ್ ಫೋಟೋಗ್ರಾಫರ್. ದುಡಿಯುವ ವರ್ಗದ ಮಹಿಳೆಯರು ಮತ್ತು ಅಂಚಿನಲ್ಲಿರುವ ಜನರ ಬದುಕನ್ನು ದಾಖಲಿಸುವುದರಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಆಸಕ್ತಿ. ಪಳನಿ 2021ರಲ್ಲಿ ಆಂಪ್ಲಿಫೈ ಅನುದಾನವನ್ನು ಮತ್ತು 2020ರಲ್ಲಿ ಸಮ್ಯಕ್ ದೃಷ್ಟಿ ಮತ್ತು ಫೋಟೋ ದಕ್ಷಿಣ ಏಷ್ಯಾ ಅನುದಾನವನ್ನು ಪಡೆದಿದ್ದಾರೆ. ಅವರು 2022ರಲ್ಲಿ ಮೊದಲ ದಯನಿತಾ ಸಿಂಗ್-ಪರಿ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟರಿ ಫೋಟೋಗ್ರಫಿ ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನು ಪಡೆದರು. ಪಳನಿ ತಮಿಳುನಾಡಿನ ಮ್ಯಾನ್ಯುವಲ್‌ ಸ್ಕ್ಯಾವೆಂಜಿಗ್‌ ಪದ್ಧತಿ ಕುರಿತು ಜಗತ್ತಿಗೆ ತಿಳಿಸಿ ಹೇಳಿದ "ಕಕ್ಕೂಸ್‌" ಎನ್ನುವ ತಮಿಳು ಸಾಕ್ಷ್ಯಚಿತ್ರಕ್ಕೆ ಛಾಯಾಗ್ರಾಹಕರಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ.

Other stories by M. Palani Kumar
Editor : S. Senthalir

ಸೆಂದಳಿರ್ ಪೀಪಲ್ಸ್ ಆರ್ಕೈವ್ ಆಫ್ ರೂರಲ್ ಇಂಡಿಯಾದಲ್ಲಿ ಸಹಾಯಕ ಸಂಪಾದಕರು. ಅವರು ಲಿಂಗ, ಜಾತಿ ಮತ್ತು ಶ್ರಮದ ವಿಭಜನೆಯ ಬಗ್ಗೆ ವರದಿ ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಅವರು 2020ರ ಪರಿ ಫೆಲೋ ಆಗಿದ್ದರು

Other stories by S. Senthalir
Photo Editor : Binaifer Bharucha

ಬಿನೈಫರ್ ಭರುಚಾ ಮುಂಬೈ ಮೂಲದ ಸ್ವತಂತ್ರ ಛಾಯಾಗ್ರಾಹಕರು ಮತ್ತು ಪೀಪಲ್ಸ್ ಆರ್ಕೈವ್ ಆಫ್ ರೂರಲ್ ಇಂಡಿಯಾದ ಫೋಟೋ ಎಡಿಟರ್.

Other stories by Binaifer Bharucha