माझा जन्म नर्मदा जिल्हातील महुपडा गावातील भिल्ल वसावा गोतात झाला. माझं गाव महाराष्ट्राच्या सीमेवरील (त्या काळी बॉम्बे प्रांताचा भाग) वसलेल्या त्या २१ गावांपैकी एक होतं. महागुजरात आंदोलनानंतर (१९५६-१९६०) जेव्हा भाषेच्या आधारावर गुजरात राज्याची  स्वतंत्र स्थापना झाली, तेव्हा आमचं गाव गुजरातमध्ये सामील केलं गेलं. माझ्या आईवडिलांना मराठी कळायचं आणि ते ती भाषा बोलायचे देखील. तापी आणि नर्मदा नद्यांच्या मधलं क्षेत्र हे भिल्ल आदिवासींचं घर आहे. ते देहवली भिली ही भाषा बोलतात. तापीच्या दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या जळगावपर्यत कोणत्या ना कोणत्या रुपात देहवली बोलली जाते. आणि गुजरातमध्ये अगदी सातपुडा पहाडामध्ये असलेल्या मोल्गी आणि धडगाव गावापर्यंत लोक ही भाषा बोलतात. गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरचा हा मोठा प्रदेश आहे.

मी देहवली भिली मध्ये लिहितो, आणि ज्या लोकांना आमच्याबाबत जास्त माहीत नाही ते नेहमी आमच्या गोताद्वारे आमच्या भाषेची ओळख करून देतात. म्हणून कधी–कधी ते म्हणतात की मी वसावीमध्ये लिहितो, कारण माझे कुटुंब वसावा गोताचे आहे. गुजरातचे आदिवासी ज्या भाषेत बोलतात त्या भाषेपैकी ही एक भाषा आहे. गुजरातच्या डांगमध्ये भिल्ल लोक वारली बोलतात. इथले मूळ निवासी भिल भिली बोलतात तर जे कोकणातून आले ते कोकणी बोलतात. वलसाड मध्ये ते वारली आणि धोडिया बोलतात. व्यारा आणि सुरत मध्ये गामित बोलतात, उच्छालकडे चौधरी, निजार मध्ये ते मावची बोलतात. निजार आणि सागबाराच्या मध्ये भिल देहवली बोलतात. या शिवाय आंबुडी, कथाली वसावी, तडवी, डुंगरा भिली, राठवी, पंचमहली, डुंगरी गरासिया वगैरे भाषा आहेतच...

प्रत्येक भाषेत लपलेल्या खजिन्याची कल्पना करा, जणू काही एका छोट्या बीमध्ये दडलेलं विपुल जंगल. त्यातलं साहित्याचं भंडार, ज्ञानाचे स्त्रोत, वैश्विक दृष्टी डोकावते. मी आपल्या लेखणीतून या खजिन्याची नोंद घेण्याचा आणि जगासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहे.

जितेंद्र वसावा यांच्या आवाजात देहवली भिली भाषेत ही कविता ऐका

प्रतिष्ठा पंड्या यांच्या आवाजात कवितेचा इंग्रजी अनुवाद ऐका

आम्ही जंगली बिया

करोडो वर्षांपूर्वी गाडले गेले होते
आमचे पूर्वज जमिनीत
तुम्ही चूक करू नका आम्हांला जमिनीत गाडण्याची
जशी पृथ्वीचे आकाशाशी
आभाळाचे पाऊसाशी
नदीचे समुद्राशी असते, तसे
फार जुने नाते आहे आमचे, जमिनीशी
उगवतो आम्ही झाडं होऊन
शेवटी आम्ही बी आहोत, जंगली
आणि बी जंगलीच असायला हवे

तुम्हांला वाटलं की त्यांना पाण्यात बुडवा
तुम्हांला कळणार नाही
आमचे मूळच पाणी आहे
किडे-किटका पासून
मनुष्यापर्यंत पोहोचतोच
शेवटी आम्ही बी आहोत, जंगली
आणि बी जंगलीच असायला हवे

तुम्ही आम्हांला झाडं म्हणू शकता
वाटलं तर पाणी किंवा
पहाड पण म्हणू शकता
हो, तसं तुम्ही म्हटलं तर आहे
आम्हांला ‘जंगली’
आणि हीच आमची खरी ओळख आहे
शेवटी आम्ही बी आहोत, जंगली
आणि बी जंगलीच असायला हवे

पण माझ्या भावांनो तुम्हांला माहीत आहे?
बी पासून असे वेगळे होण्याचा अर्थ?
मला विचारावेसे वाटते
तुम्ही पाणी नाही तर काय आहात?
झाडं, पहाड नाहीतर अजून काय आहात?
मला माहित आहे
माझ्या प्रश्नाचे तुम्ही उत्तर देऊ शकणार नाही
शेवटी आम्ही बी आहोत, जंगली
आणि बी जंगलीच असायला हवे.

देहवली भिली आणि हिंदीतून इंग्रजीत अनुवादः प्रतिष्ठा पंड्या

Jitendra Vasava

ಜಿತೇಂದ್ರ ವಾಸವ ಗುಜರಾತಿನ ನರ್ಮದಾ ಜಿಲ್ಲೆಯ ಮಹುಪಾದ ಗ್ರಾಮದ ಕವಿಯಾಗಿದ್ದು, ಅವರು ದೆಹ್ವಾಲಿ ಭಿಲಿ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಬರೆಯುತ್ತಾರೆ. ಅವರು ಆದಿವಾಸಿ ಸಾಹಿತ್ಯ ಅಕಾಡೆಮಿಯ (2014) ಸ್ಥಾಪಕ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮತ್ತು ಬುಡಕಟ್ಟು ಧ್ವನಿಗಳಿಗೆ ಮೀಸಲಾದ ಲಖರಾ ಎಂಬ ಕಾವ್ಯ ನಿಯತಕಾಲಿಕದ ಸಂಪಾದಕರಾಗಿದ್ದಾರೆ. ಆದಿವಾಸಿ ಮೌಖಿಕ ಸಾಹಿತ್ಯದ ಬಗ್ಗೆ ನಾಲ್ಕು ಪುಸ್ತಕಗಳನ್ನು ಸಹ ಪ್ರಕಟಿಸಿದ್ದಾರೆ. ಇವರ ಡಾಕ್ಟರೇಟ್ ಸಂಶೋಧನೆಯು ನರ್ಮದಾ ಜಿಲ್ಲೆಯ ಭಿಲ್ಲ ಜನರ ಮೌಖಿಕ ಜಾನಪದ ಕಥೆಗಳ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಮತ್ತು ಪೌರಾಣಿಕ ಅಂಶಗಳ ಮೇಲೆ ಕೇಂದ್ರೀಕರಿಸಿದೆ. ಪರಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಕಟವಾಗುತ್ತಿರುವ ಅವರ ಕವಿತೆಗಳು ಅವರ ಮುಂಬರುವ ಮತ್ತು ಮೊದಲ ಕವನ ಸಂಕಲನದಿಂದ ಆಯ್ದುಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ.

Other stories by Jitendra Vasava
Illustration : Labani Jangi

ಲಬಾನಿ ಜಂಗಿ 2020ರ ಪರಿ ಫೆಲೋ ಆಗಿದ್ದು, ಅವರು ಪಶ್ಚಿಮ ಬಂಗಾಳದ ನಾಡಿಯಾ ಜಿಲ್ಲೆ ಮೂಲದ ಅಭಿಜಾತ ಚಿತ್ರಕಲಾವಿದರು. ಅವರು ಕೋಲ್ಕತ್ತಾದ ಸಾಮಾಜಿಕ ವಿಜ್ಞಾನಗಳ ಅಧ್ಯಯನ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಕಾರ್ಮಿಕ ವಲಸೆಯ ಕುರಿತು ಸಂಶೋಧನಾ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ.

Other stories by Labani Jangi
Translator : Ashwini Barve