“अम्मी, माझी शाळा परत कधी सुरू होणार?” मुनिया विचारते. तागाची झाडं विरळ करण्याचं काम सुरू आहे. सहारा आपल्या १० डेसिमल जमिनीत काम करण्यात मग्न आहे. मुनियाच्या प्रश्नांना उत्तर देण्याइतका वेळ काही तिच्यापाशी नाही.

“शाळा का उघडत नाहीयेत...!” चिमुकली मुनिया वेगवेगळ्या पद्धतीने त्याच प्रश्नाचा विचार करतीये. सहारा क्षणभर थांबते आणि आपल्या आवाजात कणही वैताग न जाणवू देता म्हणते, “देखिश ना की गरोम [पाहतीयेस ना किती उकाडा आहे ते]. आठ महिने झाले पाऊस झाला नाहीये.”

“मग आपण एसी का नाही लावत?” मुनियाचे प्रश्न काही थांबत नाहीत.

“सरकारकडे पैसे नाहीत ना,” आता सहाराचा संयम सुटत चाललाय.

“मग इंग्रजी शाळेतल्या 'बोरोलोकां'कडे इतके सारे एसी कसे काय असतात?”

आता सहारा एकदम गप्प होते आणि संध्याकाळ होईपर्यंत अगदी शांत शांत काम करत राहते. आज तिला तिचं काम अर्धं टाकून मुनियाबरोबर परत घरी यावं लागलं होतं. मतदानाचा दिवस आहे आज. प्राथमिक शाळेतल्या मतदान केंद्रावर मत देण्यासाठी ती लगबगीने निघते. तिची चिमुकली लेक तिच्या मागे.

“अम्मी, आपण मत का देतो?” आज मुनियाचे प्रश्न काही थांबायचं नाव घेत नाहीयेत. पण आता विषय वेगळीकडे आल्यामुळे सहाराचा जीव भांड्यात पडतो. खरं तर आपल्या मुलीशी गप्पा मारण्याचं त्राणच तिच्यात राहिलं नाहीये.

“त्या दिवशी मी टीव्हीवर ऐकलं. एक मोठा माणूस म्हणत होता की त्यांना मुसलमानांच्या मतांची गरज नाही! आपण मुस्लिम आहोत ना अम्मी. मग मत का द्यायचं?”

सहाराचे पाय जिथल्या तिथे खिळून राहतात. नजर लेकीकडे लागते. ती करडी आणि कोरडी नजर मुनियाच्या ओळखीची आहे. ती एकदम गप्प होते.

प्रतिष्ठा पांड्या यांच्या आवाजात मौमिता आलम यांची ही कविता ऐका

Indian Election

1. Freebies

Election days make our poverty bare –
Laxmi Bhandar for Muniyaa's mother
Cycle for Muniyya's father.
Free dresses for Muniyya in school.

What does Muniyaa need?
The manifestos never know.

The dilapidated school buildings
now shelter goats.
Rats run amok
on the scaffoldings of factory floors.
Leaders give freebies.
and gobble up our jobs.

2. Language

The leaders play scrabble on the election board.
Time runs fast.
They have a winning concoction at last:
Language sliced into little pieces,
marinated in hatred,
served on platters glazed
for television viewers
and WhatsApp chatters

3. God-crazy

( Hum e vote dijiye
Hum mandir banayenge
Vote for us
We will build Temples)

I see the gods winning…
gods of a certain religion
partisan gods
gods that live in their houses
gods that don't visit our homes
or roam our streets.
Gods that don't know hunger
or inflation or what it means
to want our daughters’ education.

Don't blame me now
for being blasphemous
or an atheist.
I see all the leaders fighting
this battle over gods –
talking to priests not people.
They visit the temples
not worshiping shanties.

They fight over gods –
their gods versus our gods!
Tomorrow, it will be gods’ victory.
Oh, inflation, starvation, poverty!
Oh, democracy!

भारतातल्या निवडणुका

१. लयलूट

निवडणुकांच्या दिवसात आपली गरिबी उघडीवाघडी होते –
मुनियाच्या आईसाठी लक्ष्मी भांडार
मुनियाच्या बाबासाठी सायकल.
शाळेत मुनियासाठी मोफत गणवेश

मुनियाला काय हवंय?
जाहीरनाम्यांना कधी माहित होतं?

मोडकळीला आलेल्या शाळेच्या इमारतीत
राहतात आता शेरडं.
उंदरांचा धुमाकूळ
कारखान्याच्या फळ्यांवर.
नेते मंडळी मोफत लयलूट करतायत
आणि आपल्या नोकऱ्या गिळून टाकतायत.

२. भाषा

निवडणुकीच्या पटावर नेतेमंडळींचा शब्दखेळ.
उडून चाललाय वेळ.
त्यांना मिळालंच अखेर विजयी पेयः
भाषेचे बारीक काप करून
द्वेषात घोळवून
व्हॉट्सॲप जल्पक
आणि टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी
गरम गरम वाढलेली.

३. देववेडे

हमें व्होट दिजिये
हम मंदीर बनायेंगे

[आम्हाला मत द्या
आम्ही मंदीर बांधू]

देवच जिंकताना दिसतायत...
देव एका विशिष्ट धर्माचे
पक्षपाती
त्यांच्याच घरात राहणारे
आमच्या घरी कधीच न येणारे
किंवा आमच्या रस्त्यांवरून कधीच न फिरणारे.
या देवांना माहीत नाही भूक
महागाई काय असते हेही किंवा
आमच्या मुलींसाठी शिक्षणाची मागणी काय असते हेही.

नास्तिक आहे मी
किंवा देवाची निंदा केली म्हणून
मला दोष नका देऊ.
सगळेच नेते पाहिलेत
देवांवरून भांडताना
लोकांशी नाही, पुजाऱ्यांशीच बोलताना.
ते जातात मंदिरात
पण भाविकांच्या झोपड्यात, अंहं.

आणि ते भांडतात देवांवरून
त्यांचे देव विरुद्ध आमचे देव!
उद्याचा विजय असणारे देवाचा.
उपासमार, गरिबी आणि महागाई!
हाय, लोकशाही!

Poem and Text : Moumita Alam

मौमिता आलम, पश्चिम बंगाल की कवि हैं. उनके दो कविता संग्रह प्रकाशित हो चुके हैं - ‘द म्यूज़िंग्स ऑफ़ द डार्क’ और ‘पोएम्स ऐट डेब्रेक’. उनके कविताओं का तेलुगु और तमिल में भी अनुवाद किया जा चुका है.

की अन्य स्टोरी Moumita Alam
Illustration : Antara Raman

अंतरा रमन, सामाजिक प्रक्रियाओं और पौराणिक कल्पना में रुचि रखने वाली एक इलस्ट्रेटर और वेबसाइट डिज़ाइनर हैं. उन्होंने बेंगलुरु के सृष्टि इंस्टिट्यूट ऑफ़ आर्ट, डिज़ाइन एंड टेक्नोलॉजी से स्नातक किया है और उनका मानना है कि कहानी और इलस्ट्रेशन की दुनिया सहजीविता पर टिकी है.

की अन्य स्टोरी Antara Raman
Editor : Pratishtha Pandya

प्रतिष्ठा पांड्या, पारी में बतौर वरिष्ठ संपादक कार्यरत हैं, और पारी के रचनात्मक लेखन अनुभाग का नेतृत्व करती हैं. वह पारी’भाषा टीम की सदस्य हैं और गुजराती में कहानियों का अनुवाद व संपादन करती हैं. प्रतिष्ठा गुजराती और अंग्रेज़ी भाषा की कवि भी हैं.

की अन्य स्टोरी Pratishtha Pandya
Translator : Medha Kale

मेधा काले पुणे में रहती हैं और महिलाओं के स्वास्थ्य से जुड़े मुद्दे पर काम करती रही हैं. वह पारी के लिए मराठी एडिटर के तौर पर काम कर रही हैं.

की अन्य स्टोरी मेधा काले