फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. एका आटपाट नगरात देव-राजा भयेंद्र नामी दडपशाहीने राज्‍य करत होता. तो काही खात नसे, कोणाला खाऊ देत नसे. त्‍यामुळे सगळ्यांची (अ)क्षमता वाढली होती. एक अक्षर हरवलंय का? अरे, ते तर लिलावात त्‍या पश्चिमेच्‍या बुटकबैंगण राजाने, उत्तम गडामीने घेतलं!

एक दिवस राजाच्‍या दुष्‍ट पुजार्‍याला, Dत माहीला एक भीतीदायक स्‍वप्‍न पडलं, डोंगरचा कुणी एक नकुल राही राजाचं सिंहासन बळकावण्‍याच्‍या तयारीत आहे. खूपच भयंकर गोष्ट होती ही. हा नकुल राही अशा एका जमातीचा होता, जे लोकशाही आणि तिच्‍यासारख्या खूप भयानक प्रथा आणि परंपरा पाळत. ताबडतोब राज्‍यातल्‍या जादुगारांची सभा बोलावण्‍यात आली. आणि काय सांगता! त्‍यांनी या नकुल राहीच्‍या कर्तृकावर जादुई उपाय शोधला… धार्मिक सौहार्द आणि सामंजस्‍याचं प्रतीक असलेली, देवीइतकी पवित्र असलेल्‍या मोगातेच्‍या अत्‍यंत पवित्र अशा शेणापासून १०८ फूट लांबीची उदबत्ती तयार करायची!

मोगातेची आतडी स्‍वच्‍छ केली गेली. सर्व आवश्‍यक सामुग्री एकत्रित केली गेली आणि शेवटी अगरबत्ती लावली गेली. पण तिचा सुगंध! शेतकर्‍यांच्‍या तिरस्‍काराचा आणि जुमलाप्रेमाचा मधुर गंध होता तो! असं सांगितलं जातं की, त्‍यानंतर त्‍या उदबत्तीचा धूर भुकेने ढगाळलेल्‍या आकाशात पसरला आणि राजा भयेंद्र नामी, सहित माही आणि उत्तम गडामी यांच्‍यासह आनंदाने नाचला. यामुळे अपशकुन टळला… किंवा नसेलही टळला, काय सांगावं? आपल्‍या सर्वांनाच माहिती आहे, आटपाट नगर त्‍यानंतर सु(दुः)खाने राहू लागलं.

जोशुआच्‍या आवाजात कविता ऐका

Long Live the King!

1)
What rhymes with kām and ends with a kick?
An ode? A dirge? Or a fun limerick?
It's made of dung,
On an EVM hung,
A hundred and eight foot incense stick.

2)
With a billion aye-s and a handful nay-s
It'll burn and burn for forty-five days
For a god unsure,
With a faith so pure
That Shambuka stays beheaded always.

3)
In Babri's tomb an empire grows
With WhatsApp, cows and bajrang bros,
But, what is that smell?
Is it heaven, or hell?
Hark, oh hark! The nation wants to know!

4)
Hundred and eight foot saffron rod —
We vote for a king, not a washed-up fraud.
He had a croc as a pet,
Cameras, get set!
Hundred and eight foot beefed-up bod.

5)
Starving farmers, fatwas and
Riots are a hoot in great LaLaLand,
Agar and a batti
Bulldoze the basti
Commies and congs, they ne'er understand.

राजाचा विजय असो!

१)
ऐकायला ‘काम’ आणि शेवटाला ‘तडी’
गीत? की कविता? की विनोदी लडी?
शेणाची बनलीय
ईव्‍हीएमवर तरलीय
एकशे आठ फुटाची उदबत्तीची काडी

२)
लाखोंची वाहवा, मोजक्‍यांची नाराजी
पंचेचाळीस दिवस ती जळतच राहीं
देवासाठी? कोण जाणे!
भक्‍तीचे हे ताणेबाणे
शंबुकाचा शिरच्‍छेद होतच राहातो दिसामाजी

३)
बाबरीच्‍या घुमटात सत्तेची शिडी
व्‍हॉट्‌सअपच्‍या पायर्‍यांवर गाय बघा खडी
कसला हा गंध?
नरक की स्‍वर्ग?
सांगा ओरडत, देशाचे प्राण कंठाशी!

४)
एकशे आठ फुटाचा भगवा दांडा
राजा निवडला होता, नाही हा खोटारडा
सुसर घरामध्ये
कॅमेरे मागेपुढे
एकशे आठ फुटाचा हा सोटा धट्टाकट्टा

५)
उपाशी शेतकर्‍यांच्‍या डोळ्यात पाणी
फतवे आणि दंगलींची वाजतायत नाणी
अगर आणि बत्ती
पाडून टाका वस्‍ती
काँग्रेस आणि डावे गातायत ‘नीरो’ची गाणी

Poems and Text : Joshua Bodhinetra

जोशुआ बोधिनेत्र, पीपल्स आर्काइव ऑफ़ रूरल इंडिया के भारतीय भाषाओं से जुड़े कार्यक्रम - पारी'भाषा के कॉन्टेंट मैनेजर हैं. उन्होंने कोलकाता की जादवपुर यूनिवर्सिटी से तुलनात्मक साहित्य में एमफ़िल किया है. वह एक बहुभाषी कवि, अनुवादक, कला-समीक्षक और सामाजिक कार्यकर्ता भी हैं.

की अन्य स्टोरी Joshua Bodhinetra
Editor : Pratishtha Pandya

प्रतिष्ठा पांड्या, पारी में बतौर वरिष्ठ संपादक कार्यरत हैं, और पारी के रचनात्मक लेखन अनुभाग का नेतृत्व करती हैं. वह पारी’भाषा टीम की सदस्य हैं और गुजराती में कहानियों का अनुवाद व संपादन करती हैं. प्रतिष्ठा गुजराती और अंग्रेज़ी भाषा की कवि भी हैं.

की अन्य स्टोरी Pratishtha Pandya
Illustration : Atharva Vankundre

अथर्व वानकुंद्रे, मुंबई के क़िस्सागो और चित्रकार हैं. वह 2023 में जुलाई से अगस्त माह तक पारी के साथ इंटर्नशिप कर चुके हैं.

की अन्य स्टोरी Atharva Vankundre
Translator : Vaishali Rode

Vaishali Rode is an independent journalist and a writer with prior experience in Marathi print media. She has penned the autobiography of a transgender, MI HIJDA MI LAXMI, which has been translated in many languages.

की अन्य स्टोरी Vaishali Rode