५०. वजीरिथालच्या आरोग्य व्यवस्थेवर पसरला काळोख
जम्मू-काश्मीरच्या बांदीपूर जिल्ह्यातील एका दुर्गम गावात गरोदर महिलांना सार्वजनिक आरोग्य सुविधांची दुरवस्था आणि अनियमित वीज पुरवठा अशा दुहेरी संकटाला तोंड द्यावं लागतं. त्यामुळे गावातील एक वयोवृद्ध दाई ही त्यांची एकमेव आशा आहे
१७ नोव्हेंबर, २०२२ | जिग्यासा मिश्रा
४९. विड्या वळता वळता वठलं आयुष्य आणि आरोग्य
मुर्शिदाबाद जिल्ह्यात अत्यंत हलाखीत जगणाऱ्या बाया विड्या वळण्याचं कष्टाचं काम करतात पण मजुरी अगदी तुटपुंजी असते. तंबाखूशी सतत संपर्क आल्याने त्यांच्या एकूणच आरोग्यावर, विशेषतः प्रजनन आरोग्यावर गंभीर परिणाम होतात
३१ ऑक्टोबर, २०२२ | स्मिता खटोर
४८. पाळी नको गं बाई
उत्तराखंडच्या उधम सिंग नगरमधे पाळीच्या काळात आणि बाळंतपणानंतर आपल्याला कसा विटाळ सहन करावा लागतो त्याबद्दल jराजपूत समुदायाच्या मुली आणि बाया आपले अनुभव सांगतायत
१९ सप्टेंबर २०२२ । क्रिती अटवल
४७. धावती जीपच जेव्हा ‘लेबर रूम’ बनते…
हिमाचल प्रदेशातल्या ग्रामीण भागात महिलांना बाळंतपणात आपलं आरोग्य सांभाळण्यासाठी अनेक आव्हानं झेलावी लागतात. वैद्यकीय सोयी-सुविधा त्यांच्या जवळपास नसतातच. गावातलं सरकारी आरोग्य केंद्रही सुरू नसतं
२७ सप्टेंबर, २०२२ । जिग्यासा मिश्रा
४६. आसुंदीच्या वेशीवरच्या वेदनांचा आगडोंब
तुटपुंजी मजुरी आणि उपासमारीचं ‘डाएट’… हावेरी जिल्ह्यातल्या आसुंदी गावातल्या दलित महिलांच्या आरोग्यावर याचा खूप वाईट परिणाम होतो आहे. मासिक पाळीच्या वेदना सोसत राहाणार्या या महिलांच्या वस्तीतला स्वच्छतागृहांचा अभाव त्यांच्या यातनांमध्ये भर घालतो आहे.
२२ ऑगस्ट २०२२ । एस. सेन्थलीर
४५. ‘नसबंदी करण्यासाठी मी एकटीच घराबाहेर पडले’
घरच्या पुरुषमंडळींना रोजगारासाठी सुरत किंवा इतर ठिकाणी स्थलांतर करावं लागतं, पण उदयपूर जिल्ह्यातल्या गावी ‘मागे राहिलेल्या’ गमेती समुदायाच्या स्त्रिया आता गर्भनिरोधन किंवा आरोग्यासंबंधीचे निर्णय स्वतः घेऊ लागल्या आहेत
२९ जुलै २०२२ । कविता अय्यर
४४. ‘काहीही होवो, मलाआणखी एक मूल नको होतं’
सुनीता देवीला मूल नको होतं आणि त्यासाठी उपाय करण्याची तिची तयारी होती. पण तांबी निकामी ठरली, गर्भपात आणि नसबंदी करून घेण्यासाठी तिला दिल्ली आणि बिहारमधल्या सरकारी आणि खाजगी दवाखान्यांची वारी करावी लागली
१३ जुलै २०२२ । संस्कृती तलवार
४३. कलावतींच्या पोतडीतली गुपितं आणि गोष्टी
अमेठी जिल्ह्यातल्या टिकरी गावात महिलांच्या प्रजनन हक्कांचं रक्षण करण्यासाठी त्यांची धडपड सुरु आहे. गर्भनिरोधक आणि इतर काही गरजेच्या गोष्टींची पिशवी हाती घेतलेल्या कलावती सोनी त्यांच्या गावातल्या महिलांसाठी विश्वासू सहेलीचं काम करतायत
२४ जून २०२२ । अनुभा भोसले
४२. ‘पिशवी काढली आणि सगळा त्रास सुरू झाला’
बीड जिल्ह्यात ऊसतोडीला जाणाऱ्या महिलांमध्ये गर्भाशय काढून टाकण्याचं प्रमाण जास्त आहे, शस्त्रक्रियेनंतर चिंता, ताणतणाव, नैराश्य आणि शारीरिक तक्रारी सहन करणाऱ्या या स्त्रियांना वैवाहिक आयुष्यातही ताणाला सामोरं जावं लागत आहे
२५ मार्च २०२२ । ज्योती शिनोळी
४१. 'कुणालाच कळायला नकोय की माझा गर्भपात झालाय...'
नदीचं खारं पाणी, लाहीलाही करणारा उन्हाळा आणि दूर दूर तक गायब असणारी सार्वजनिक आरोग्य सेवा... सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून सुंदरबनमधल्या स्त्रियांना आरोग्याच्या असंख्य समस्यांना सामोरं जावं लागतंय...
१८ एप्रिल २०२२ । ऊर्वशी सरकार
४०. ‘मला औषधं देताना कसले कसले चाळे करतात’
शोषण, अपमान, गोपनीयतेचा, खाजगीपणाचा भंग तसंच धंदा करणारी बाई म्हणून समाजाने ठेवलेला ठपका या सगळ्यामुळे या बायांना आरोग्यसेवांपर्यंत सहज पोचताच येत नाही, अगदी देशाच्या राजधानीतही
२१ फेब्रुवारी २०२२ । शालिनी सिंग
३८. मेळघाटातल्या अखेरच्या 'जन्मदात्या' सुइणी
महाराष्ट्रातल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या भोवती असलेल्या आदिवासी पाड्यांवर रोपी आणि चरकूसारख्या दाई किंवा सुइणी गेल्या अनेक दशकांपासून घरी बाळंतपणं करतायत. आता या दोघींचं वय झालंय आणि त्यांचा वारसा पुढे नेणारं मात्र कुणीच नाही
२८ जानेवारी २०२२ । कविता अय्यर
३७. ‘पुरुष नसबंदी? शक्यच नाही’, उत्तरप्रदेशातल्या स्त्रियांची व्यथा
उत्तर प्रदेशात मूसाहार स्त्रिया वर्षानुवर्षं अभावाचं जिणं जगत आल्या आहेत. आरोग्यसेवेचा लाभ नाही आणि समाजाने लावलेला कलंक यामुळे त्यांच्यासमोर फारसे पर्यायही सीमित आहेत
१० जानेवारी २०२२ । जिग्यासा मिश्रा
३६. मधुबनी: जिथे मुलींचे जन्म दाखलेच बनत नाहीत
बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातल्या गरीब कुटुंबातल्या स्त्रियांना आरोग्य सेवा मिळवण्यासाठी बरेच अडथळे पार करावे लागतात. त्यात ज्या थोड्या व्यवस्था त्यांना सेवा पुरवतात, त्यांच्यातही भ्रष्टाचार आढळला की त्या अधिकच असहाय होतात
२७ सप्टेंबर २०२२ । जिग्यासा मिश्रा
३५. ‘आमचं गाव वेगळ्याच जमान्यात जगतं’
सोनू आणि मीनाचं लवकरच लग्न होणार आहे. प्रयागराजच्या एका दलित बस्तीमधल्या किशोरवयात नुकतंच पाऊल टाकलेल्या पाळी सुरू झालेल्या त्यांच्यासारख्या अनेक मुलींची ही कहाणी
१५ ऑक्टोबर २०२१ । प्रीती डेव्हिड
३४. तीन मुली आहेत? आता दोन मुलगे तरी हवेत!
बिहारच्या गया जिल्ह्यातल्या स्त्रियांची स्थिती त्या कोणत्याही जातीच्या, कोणत्याही समाजाच्या, कोणत्याही वर्गातल्या असोत सारखीच आहे. प्रचंड दारिद्र्य, शिक्षणाची संधी नाही, आरोग्यच काय, संपूर्ण आयुष्य म्हणजेच जोखीम आहे
२४ मे २०२२ । जिग्यासा मिश्रा
३३. तांबीः 'अडथळ्यांची' शर्यत आणि वेदनेचं चक्रव्यूह
बाळंतपणानंतर दीपा दवाखान्यातून घरी आली तेव्हा आपल्या गर्भाशयात तांबी बसवलीये याची तिला सुतराम कल्पना नव्हती. दोन वर्षांनी रक्तस्राव तसंच वेदना सुरू झाल्या त्यानंतरही कित्येक महिने डॉक्टरांना तांबी सापडलीच नाही
२० सप्टेंबर २०२१ । संस्कृती तलवार
३२. ‘असं वाटतं कुणी तरी पुरुष सारखे टक लावून बघतायत...’
वस्तीतली कुलुपबंद सार्वजनिक शौचालयं, त्यामुळे दूरवर जावं लागणं, पडदे लावून केलेले आडोसे, अंघोळ करायला, पॅड्स बदलायला खाजगीपणच नाही, रात्री उशिरा रेल्वे ट्रॅकवरची परेड... पाटणाच्या झोपडपट्टीतल्या स्थलांतरित कुटुंबांमध्ये मुलींचे रोजच्या जगण्यातले हे अडथळे. अर्थात, ‘अडथळे’ इतरांसाठी, त्यांच्यासाठी मात्र ‘आदत’
२४ मे २०२२ । कविता अय्यर
३१. ‘पाण्यात कॅन्सर आहे हे आधीच कळलं असतं तर...’
बिहारमधल्या अनेक गावांत भूजलामध्ये अर्सेनिकचं प्रमाण जास्त असल्याने किती तरी कुटुंबात स्त्रिया आणि पुरुष मरण पावले आहेत. प्रीतीच्याही. आणि आता तिच्या छातीत गाठ सापडली आहे. स्त्रियांसाठी तर उपचार घेणंही मोठं आव्हानात्मक आहे
२६ ऑगस्ट २०२१ । कविता अय्यर
३०. बिहारच्या मूसाहारः सात बाळंतपणं घरीच, ३६ व्या वर्षी आजी
बिहारच्या शिवहर जिल्ह्यातल्या मूसाहार टोल्यावरच्या शांती मांझींची सातही मुलं घरीच जन्मली आहेत. इथले मोजकेच लोक आरोग्यसेवेपर्यंत पोचलेत, आणि बहुतेकांना गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, तिथे बाळंतपणं होतात याचा पत्ताच नाही
२२ ऑगस्ट २०२१ । कविता अय्यर
२९. ‘माझ्या मुलींची गत काही माझ्यासारखी होऊ नये’
बिहारमधल्या बाल आणि किशोरवयात लग्न झालेल्या मुलींना मुलगा जन्माला घालेपर्यंत बाळंतपणांचा फेरा काही चुकत नाही. त्यांच्या आयुष्यावर कायदा आणि जाहीरनाम्यांपेक्षा रुढी परंपरांचा प्रभाव अधिक प्रबळ आहे
२८ जुलै २०२१ । जिग्यासा मिश्रा
२८. काडुगोल्ला बाया दर महिन्यात विलगीकरणात
दैवी कोप आणि सामाजिक कलंकाच्या भीतीमुळे कर्नाटकातल्या काडुगोल्ला समाजात बाळंतिणी आणि पाळी सुरू असलेल्या बायांना झाडांखाली किंवा खोपटात मुक्काम करावा लागतो – कायदा, जाणीवजागृती अभियानं आणि वैयक्तिक विरोध होत असला तरी
१६ जुलै २०२१ । तमन्ना नसीर२७. ‘मी काही लग्नाजोगी बाई नाहीये’
बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातल्या चतुर्भुज स्थान कुंटणखान्यातल्या धंदा करणाऱ्या स्त्रियांना अनेकदा ‘कायमच्या’ गिऱ्हाइकांना खूश करण्यासाठी फार कमी वयात मुलं जन्माला घालावी लागतात. कोविड-१९ च्या टाळेबंदीचा या स्त्रियांना फार मोठा फटका बसलाय
१६ जून २०२१ । जिग्यासा मिश्रा
२६. मलकानगिरीत मृत्यूंजयच्या जन्माची गोष्ट
ओडिशाच्या मलकानगिरीमध्ये धरणाच्या जलाशय परिसरातल्या अनेक आदिवासी पाड्यांवर घनदाट जंगलं, उंच डोंगररांगा, सततचा राज्य आणि सशस्त्र गटांचा संघर्ष अशी स्थिती आहे. त्यामुळे ज्या काही आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत तिथे पोचण्यासाठी बेभरवशाची बोट सुविधा व नसल्यात जमा रस्त्यांशिवाय पर्याय नाही
५ जून २०२१ । जयंती बुरुडा
२५. ‘माझं लग्न करोनामध्ये झालं’ - मु.पो. बिहार
बिहारच्या गावांमध्ये गेल्या वर्षी टाळेबंदीच्या काळात अनेक किशोरवयीन मुलींची गावी परतलेल्या स्थलांतरित तरुणांशी लग्नं लावून देण्यात आली. यातल्या अनेक जणी आता गरोदर आहेत आणि पुढे काय या चिंतेत आहेत
१८ मे २०२१ । कविता अय्यर
२४. मधुबनीत बदलाचे वारे, कळत नकळत
दहा वर्षांपूर्वी बिहारच्या हसनपूर गावात कुटुंब नियोजन शक्यतो टाळलंच जायचं. पण सध्या इथल्या स्त्रिया सलाह आणि शमा या आरोग्य कार्यकर्त्यांकडे गर्भनिरोधक इंजेक्शन घेण्यासाठी येतायत. हा बदल झाला तरी कसा?
८ मे २०२१ । कविता अय्यर
२३. बिहारच्या ‘लेडी’ डॉक्टरः कामाचं ओझं, लोकांचा ओरडा
बिहारच्या किशनगंज जिल्ह्यात काम करणाऱ्या मोजक्या स्त्रीरोगतज्ज्ञांसाठी कामं संपत नाहीत, औषधांचा पुरवठा अपुरा आहे. रुग्णांची एकाहून अधिक बाळंतपणं आणि गर्भनिरोधकांना विरोध यांच्याशी कायमचेच दोन हात
१५ एप्रिल २०२१ । अनुभा भोसले
२२. 'मला नऊ मुली आहेत आणि हा दहावा – मुलगा '
मुलगा जन्माला घालण्याचा दबाव आणि कुटुंब नियोजनाचे मर्यादित पर्याय उपलब्ध असल्यामुळे गुजरातच्या ढोलका तालुक्यातील भारवाड पशुपालक समाजाच्या महिलांसाठी गर्भनिरोधन आणि प्रजनन अधिकार नावापुरतेच
२२ एप्रिल २०२१ । प्रतिष्ठा पंड्या
२१. 'ते म्हणतात, मी शिकतच राहिले तर माझ्याशी लग्न कोण करेल?'
बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात महादलित समाजाच्या तरुण मुलींना समाजाचा दबाव आणि कधीकधी बळजबरीमुळे आपलं शिक्षण सोडून, स्वप्नांचा त्याग करून लग्न करावं लागतं – काही जणी याचा विरोध करतात, अनेक तर हार मानतात
२२ एप्रिल २०२१ । अमृता ब्यातनाल
२०. ‘आमचं ऑफिस आणि निजायची खोली एकच’
जागेची अडचण आणि सोयीसुविधांचा अभाव यामुळे बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये, वॉर्डातल्या खाटांवर आणि कधी कधी चक्क जमिनीवर निजावं लागतंय
२९ मार्च २०२१ । लेखनः जिग्यासा मिश्रा , चित्रकारः प्रियांका बोरार
१९. ‘गर्भात दगावलेल्या’ बाळाच्या ‘जन्मा’चा दाखला
बिहारच्या वैशाली जिल्ह्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अल्ट्रासाउंड मशीनला जाळी लागलीयेत, तिथले कर्मचारी पैसे मागतायत आणि जन्माला येणारं बाळं पोटातच मृत झाल्याचं सांगतात – ज्यामुळे बराच खर्च करून खाजगी दवाखाना गाठावा लागतो
२५ फेब्रुवारी, २०२१ । जिग्यासा मिश्रा
१८. आरोग्य केंद्रांना अवकळा, ‘बिना-डिग्री’ डॉक्टर
पुरेसे कर्मचारी नसलेलं प्राथमिक आरोग्य केंद्र, जंगली प्राणी मोकाट फिरतायत, हॉस्पिटलबद्दल लोकांच्या मनात भीती, फोन लागत नाहीत – या सगळ्याचा परिणाम म्हणजे बिहाच्या बडगाव खुर्द गावातल्या गरोदर बाया घरीच बाळंतपण करतायत
१७ फेब्रुवारी, २०२१ ।
अनुभा भोसले
आणि
विष्णु सिंग
१७. अलमोडातली बाळंतपणाची बिकट वाट
गेल्या वर्षी उत्तराखंडच्या अलमोडा जिल्ह्यातली रानो सिंग हॉस्पिटलच्या वाटेवर अर्ध्या वाटेत रस्त्यातच बाळंत झाली. हा भागच खडतर आणि खर्चामुळे डोंगरातल्या अनेक पाड्यांमध्ये बाया घरीच बाळंत होतायत
१४ फेब्रुवारी २०२१ । जिग्यासा मिश्रा
१६. सक्तीची नसबंदी, हकनाक बळी
राजस्थानातल्या बन्सी गावची भावना सुतार वारली. गेल्या वर्षी एका ‘शिबिरा’त, नियम डावलून, तिला कोणतेही पर्याय न सुचवता केलेल्या नसबंदीनंतर. तिचा नवरा दिनेश अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे
२२ नोव्हेंबर, २०२० । अनुभा भोसले
१५. ‘नववा महिना भरला तरी गिऱ्हाइक केले’
चारदा गर्भ पडून गेला, नवरा दारुडा आणि कारखान्यातली नोकरीही गेली मग पाचव्यांदा गरोदर असलेली दिल्लीची हनी धंद्यात आली, तेव्हापासून तिला लिंगसांसर्गिक आजाराची लागण झालीये. आणि आता टाळेबंदीमध्ये तिचे कमाईचे वांदे झालेत
२० ऑक्टोबर २०२० । जिग्यासा मिश्रा
१४. ‘माझ्या बायकोला जंतुसंसर्ग झालाच कसा?’
नसबंदीनंतर जंतुसंसर्ग झाला आणि पुढची तीन वर्षं वेदना, हॉस्पिटलच्या चक्रावून टाकणारे हेलपाटे, कर्जाचा वाढता बोजा आणि अखेर गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया असं सगळं राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातल्या सुशीला देवींना भोगावं लागलं
२४ सप्टेंबर, २०२० । अनुभा भोसले आणि संस्कृती तलवार१३. ‘डॉक्टर म्हणतात माझी हाडं पोकळ झालीयेत’
आयुष्यभराची
आजारपणं आणि शस्त्रक्रियांनंतर पुणे जिल्ह्यातील हडशीच्या बिबाबाई लोयरे कंबरेतून
वाकून गेल्या आहेत. तरीही आपल्या आजारी पतीची काळजी आणि रानातलं घरातल्या कामाला
खंड नाही
४ जुलै, २०२० ।
मेधा काळे
१२. ‘माझी काट [गर्भाशय] सारखी बाहेर येते’
महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यातल्या भिल्ल बाया अंग बाहेर येत असलं तरी आरोग्यसेवांपर्यंत पोचू शकत नाहीत. रस्ते नाहीत, मोबाइल फोनची सेवा नाही, निरंतर काबाडकष्ट आणि असह्य वेदनांचा त्यांना सामना करावा लागतोय
२५ जून २०२० । ज्योती शिनोळी११. ‘डॉक्टर सांगायचे गर्भपिशवी काढून टाका’
मानसिक अपंगत्व असणाऱ्या महिलांचे लैंगिक व प्रजनन अधिकार कित्येकदा सक्तीच्या गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रिया करून हिरावून घेतले जातात. पण महाराष्ट्रातल्या वाडी गावची मालन मोरे मात्र आपल्या आईच्या पाठिंब्यामुळे नशीबवान ठरलीये
१७ जून, २०२० । मेधा काळे
१०. ‘बारा-बारा लेकरं झाली की आपोआपच पाळणा थांबतो’
हरयाणाच्या बिवान गावातल्या मिओ मुस्लिम समुदायात गर्भनिरोधकांचा वापर कऱणं तितकंसं सोपं नाही आणि त्याला कारणीभूत आहेत सांस्कृतिक घटक, उपलब्ध नसलेल्या आरोग्य सेवा आणि आरोग्यसेवादात्यांची अनास्था – परिणामी बायांची बाळंतपणांच्या चक्रातून सुटकाच नाही
१९ जून, २०२० । अनुभा भोसले आणि संस्कृती तलवार
९. टाळेबंदीत शालेय मुली मूलभूत गरजांपासून वंचित
शाळा बंद झाल्या आणि उत्तर प्रदेशातल्या चित्रकूट जिल्ह्यातल्या गरीब घरातल्या मुलींना मोफत सॅनिटरी पॅड मिळणं बंद झालं, आता त्या असुरक्षित पर्यायांकडे वळत आहेत. एकट्या उत्तर प्रदेशात अशा मुलींची संख्या लाखाच्या घरात जाते.
१ जून, २०२० । जिग्यासा मिश्रा
८. ग्रामीण आरोग्याचे निर्देशांक नाही, गायी मोजा
कामाचा अपुरा मोबदला, न संपणाऱ्या सर्वेक्षणं, अहवाल आणि इतर कामांच्या बोजामुळे हरयाणाच्या सोनिपत जिल्ह्यातल्या सीता रानी आणि इतर आशा कार्यकर्त्यांना ग्रामीण भागातल्या स्त्रियांच्या प्रजननाच्या गरजांकडे लक्ष पुरवणं अवघड होत चाललं आहे
१८ मे, २०२० । अनुभा भोसले आणि पल्लवी प्रसाद
७. नीलगिरीतलं वारसा हक्काचं कुपोषण
हिमोग्लोबिन नसल्यागत झालेल्या आया, दोन वर्षांची मुलं ज्यांची वजनं केवळ ७ किलो, दारूचं व्यसन, अपुरी कमाई आणि जंगलांपासून तुटत चालल्यामुळे तमिळ नाडूतल्या गुडलुरमधल्या आदिवासी स्त्रियांमध्ये कुपोषणाची पातळी वाढत चालली आहे.
११ मे, २०२० । प्रीती डेव्हिड
६. ‘एका नातवासाठी, आम्हाला चार लेकरं झाली’
दिल्लीहून ४० किलोमीटर लांब असणाऱ्या हरसाना कलान गावातल्या स्त्रिया पुरुषांचा रोष असला तरीही स्वतःच्या आयुष्य आणि प्रजननासंबंधी निर्णयांवर थोडं फार नियंत्रण ठेवण्याचा त्यांचा संघर्ष उलगडून दाखवतायत
२३ एप्रिल, २०२० । अनुभा भोसले आणि संस्कृती तलवार
५. ‘ही बोकरंच मुलासारखी आता’
महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव भागातल्या भिल्ल महिलांना सामाजिक कलंक, बहिष्काराचा समाना करवा लागतोच सोबत मूल न होण्याच्या समस्येवर प्रभावी उपचार करण्यात अपयशी ठरलेल्या ग्रामीण आरोग्य सेवांचाही
२५ मे, २०२० । ज्योती शिनोळी
७. ‘गेल्या वर्षी एकच जण नसबंदीला तयार झाला’
‘कुटुंब नियोजनामध्ये’ पुरुषांचा सहभाग हा परवलीचा शब्द असला तरी बिहारच्या विकास मित्र आणि आशा कार्यकर्त्यांना मात्र नसबंदीसाठी पुरुषांचं मन वळवण्यात फारसं यश येत नाहीये, त्यामुळे गर्भनिरोधनाची जबाबदारी स्त्रियांवरच येतीये
२९ मार्च, २०२० । अमृता ब्यातनाल
३. ‘त्यांना नुसती गोळी देऊन माघारी पाठवतात’
छत्तीसगडच्या नारायणपूरमधली सोयी-सुविधायुक्त आरोग्य केंद्रं आजही अनेक आदिवासी स्त्रियांच्या आवाक्यात नाहीत. आणि मग गर्भपात किंवा बाळंतपणांसाठी त्या अप्रशिक्षित सेवादात्यांचाच आधार घेतात
१४ मार्च, २०२० । प्रीती डेव्हिड
२. ‘कटकट मिटली’ – नेहाची नसबंदी
२०१६ सालच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नसबंदी शिबिरं बंद होऊन त्याऐवजी नसबंदी दिन घेतला जातो, पण आजही स्त्रियांची नसबंदीच सर्वाधिक होते – आणि उत्तर प्रदेशात आधुनिक गर्भनिरोधकांचे इतर पर्याय उपलब्ध नसल्याने आजही अनेक जणी नसबंदी करून घेतायत
५ मार्च, २०२० । अनुभा भोसले
१. कूवालपुरमचं आगळं गेस्टहाउस
कूवालपुरम आणि मदुराईच्या इतर चार गावांमध्ये आजही पाळी सुरू असताना बायांना ‘गेस्टहाउस’मध्ये वेगळं बसवलं जातं. देवाचा आणि माणसांचाही कोप होण्याच्या भीतीने कुणीही या भेदभावाला विरोध करत नाही
२१ फेब्रुवारी, २०२० । कविता मुरलीधरन