फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. तीन शेजारी होते - कॅथरीन कौर, बोधी मुर्मु आणि मोहम्‍मद तुलसीराम. कॅथी शेतकरी होती. बोधी तागाच्‍या गिरणीत काम करत असे आणि मोहम्‍मद गुराखी होता. ‘भारतीय संविधान’ नावाच्‍या एका जाडजूड ग्रंथाबद्दल शहरातले शिकले सवरलेले लोक बराच आरडाओरडा करत होते. पण या ग्रंथराजाचं काय करायचं, हे या तीन शेजार्‍यांना मात्र माहीत नव्‍हतं. कॅथी म्हणाली, काही उपयोग नाही त्‍याचा... बोधीला वाटलं, कदाचित तो दैवी ग्रंथ असेल... मोहम्‍मदला मात्र प्रश्‍न पडला होता, माझ्‍या मुलांना यामुळे दोन वेळचं जेवण मिळेल का?

एक दाढीवाला राजा निवडून आलाय याची या तिघांना खबरच नव्‍हती आणि त्‍यांना खरं तर काही फरकही पडत नव्‍हता. ‘‘आखिर इतना वक्‍त किसके पास है?’’ ते म्हणत. काही वर्षांतच पाऊस कमी झाला, डोक्‍यावरचा कर्जाचा बोजा वाढला आणि कॅथरीनने कीटकनाशकाची बाटली जवळ केली. पाठोपाठ तागाच्‍या गिरणीचंही दिवाळं निघालं. त्‍या विरोधात निदर्शनं करणार्‍या कामगारांवर पोलिसांनी अश्रूधूर फोडला आणि बोधी मुर्मुला अटक करत कामगारांचं नेतृत्‍व करणारा दहशतवादी असल्‍याचा आरोप त्‍याच्‍यावर लावला. शेवटी मोहम्‍मद तुलसीरामची पाळी आली. एके दिवशी गोरजवेळेला त्‍याच्या गायी घरी परतल्या. त्यांच्‍या मागे दोन पायाची वासरं धावत तलवार परजत येत होती. ‘‘गौ माता की जय! गौ माता की जय!’’

या आरोळ्या सुरू असतानाच कुठेतरी काही पानं फडफडत होती, निळा सूर्य उगवत होता आणि एक कुजबूज कानावर येऊ लागली होती...

आम्ही, भारताचे लोक, संकल्‍पपूर्वक निर्धार करतो की....

जोशुआ बोधिनेत्रा यांनी सादर केलेले हायकू ऐका



A constitutional lament

1.
Our land is sovereign ,
so is our thirst, trapped in a
cloud as red as rust.

2.
Socialist
bandish ,
why do we dream? Under the
sun our workers scream.

3.
Mandir, masjid, church,
and a tomb — tridents lodged in
a secular womb.

4.
O Democracy !
Just for a vote, 'Death is a
debt,' our pundits wrote.

5.
Once a republic
swears in a king, Buddhas fall
and bayonets sing.

6.
Under the eye-patch
justice wore, there are no eyes —
well, not anymore.

7.
Farm-fresh liberties
sold in a mall, packed in jars
of sweet folidol.

8.
Sacred cows and black
black steaks — that is a bread our
égalité bakes.

9.
Fraternity harks —
shudras sigh in a field of
rye, and brahman barks.


संवैधानिक रूदन

१.
देश सार्वभौम,
तशीच आपली तहानही, कैद झालेली
दाटलेल्‍या लाल ढगात

२.
समाजवादी बंदिश,
तळपत्‍या सूर्याखाली श्रमतायत श्रमिक
डोळ्यांतली स्‍वप्‍नं रंजीस

३.
धर्मनिरपेक्षतेची हत्‍या,
गर्भातच, निर्दयपणे, त्रिशूळाच्‍या टोकाने,
साक्षीने मंदिर-मशीद-चर्चच्‍या

४.
मतांपुरती लोकशाही!
नंतर मात्र तिच्‍याच मरणाचा सौदा
‘ऋणा’च्‍या मुलाम्‍याखाली

५.
एका गणराज्‍यात
राज्‍याभिषेक होतो, बुद्ध मारले जातात
संगीनी विजयगीत गातात

६.
पट्टी न्‍यायदेवतेच्‍या डोळी
पण अताशा तर दिसतच नाहीत
तिचे डोळे त्‍याखाली

७.
स्‍वातंत्र्य ताजं ताजं
चकचकीत मॉलमध्ये, कीटकनाशकाच्‍या बरणीत
रूप घेत मिठाईचं

८.
समानतेचा गोडवा
गोमाता आणि भाजलेल्‍या मांसाचे तुकडे निरखत
सर्वांनाच हवा हवा

९.
बंधुभावाचा धडा
शेतात शूद्र खपतायत, उसासतायत
ब्राह्मणाचा ओरडा

स्मिता खटोर यांचे आभार. ति च्‍यासोबत झालेल्‍या विचार प्रवृत्त करणार्‍या चर्चांमधून हे हायकू आकाराला आले आहेत.

Joshua Bodhinetra

जोशुआ बोधिनेत्र, पीपल्स आर्काइव ऑफ़ रूरल इंडिया के भारतीय भाषाओं से जुड़े कार्यक्रम - पारी'भाषा के कॉन्टेंट मैनेजर हैं. उन्होंने कोलकाता की जादवपुर यूनिवर्सिटी से तुलनात्मक साहित्य में एमफ़िल किया है. वह एक बहुभाषी कवि, अनुवादक, कला-समीक्षक और सामाजिक कार्यकर्ता भी हैं.

की अन्य स्टोरी Joshua Bodhinetra
Illustration : Labani Jangi

लाबनी जंगी साल 2020 की पारी फ़ेलो हैं. वह पश्चिम बंगाल के नदिया ज़िले की एक कुशल पेंटर हैं, और उन्होंने इसकी कोई औपचारिक शिक्षा नहीं हासिल की है. लाबनी, कोलकाता के 'सेंटर फ़ॉर स्टडीज़ इन सोशल साइंसेज़' से मज़दूरों के पलायन के मुद्दे पर पीएचडी लिख रही हैं.

की अन्य स्टोरी Labani Jangi
Translator : Vaishali Rode

Vaishali Rode is an independent journalist and a writer with prior experience in Marathi print media. She has penned the autobiography of a transgender, MI HIJDA MI LAXMI, which has been translated in many languages.

की अन्य स्टोरी Vaishali Rode